महिलांसाठी घरगुती व्यवसाय कल्पना | Housewife Business Ideas In Marathi

आजकाल असे कोणतेही क्षेत्र उरले नाही की जेथे महिलांनी आपला डंका वाजविला नसेल. आजच्या काळात महिला जवळपास सर्वच क्षेत्रात आपले नाव उंचावत आहेत. अशा काही महिला सुद्धा आहेत ज्या आपले घराचे काम सांभाळून स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी करीत आहेत. काही महिलांचे तर असेही स्वप्न असते की अगोदर त्या एक यशस्वी व्यवसाय किंवा नोकरी करून स्थैर्य मिळवतील आणि मगच लग्न करून आपला संसार करतील.


आज आपण त्या महिलांबद्दल बोलणार आहोत ज्या घरी बसून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत परंतु त्यांना कोणत्या क्षेत्रात जावे हे समजत नाही. त्या महिलांच्या मदतीसाठी आज आम्ही ही पोस्ट तयार केली आहे जेणेकरून त्यांना काही मदत मिळावी आणि त्यांनाही घरी बसून चांगले उत्पन्न मिळावे.


या आर्टिकल च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला महिलांसाठी घरगुती व्यवसाय कल्पना (Housewife Business Ideas In Marathi ) काय आहेत याची संपूर्ण माहिती देणार आहोत. आमची ही पोस्ट वाचल्यानंतर, तुमच्यासाठी कोणता व्यवसाय सर्वात फायदेशीर आहे हे तुम्ही सहजपणे ठरवू शकाल. त्यामुळे आमचा हा लेख पूर्ण वाचा.


{tocify} $title={अनुक्रमणिका}


महिलांसाठी घरगुती व्यवसाय कल्पना | Housewife Business Ideas In Marathi



महिलांसाठी घरगुती व्यवसाय यादी


यामध्ये आम्ही तुम्हाला सर्व प्रकारचे घरगुती व्यवसायांची माहिती दिली आहे. Home Business for Women in marathi या पैकी कोणत्याही व्यवसाय निवडून आपण आपली व्यवसाय जर्नी चालू करू शकता आणि पैसे कमवू शकता. तर या काही सर्वात फायदेशीर व्यवसाय कल्पना आहेत ज्या तुम्ही घरापासून सुरू करू शकता.



1) शिवणकाम


अशा अनेक महिला आहेत की ज्यांना शिवण काम आवडते. आणि त्या महिला शिवण कामात अतिशय माहिर असतात. जर आपण शिवण कामात कुशल असाल तर तुम्ही ही हा व्यवसाय नक्की करू शकता. जर तुम्हाला शिवण काम हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही अतिशय कमी भांडवलात हा व्यवसाय करू शकता. 


शिवणकाम करण्यासाठी केवल एका शिलाई मशीन ची गरज असते. ही शिलाई मशिन बाजारामध्ये 4000 ते 15000 पर्यंत सहज मिळू शकते. ही शिलाई मशिन घेऊन तुम्ही हा व्यवसाय सहज सुरू करू शकता. माझ्या मते घरी बसून व्यवसाय करायचा असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. हा व्यवसाय करून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. त्याच बरोबर तुम्ही शिवणकाम शिकवणी सेंटर सुरू करूनही सहज पैसे कमवू शकता. 



2) होम ट्यूशन


अनेक महिलांच्या मनात प्रश्न असतो की कमी पैशात किंवा अगदी पैसे न गुंतवता कोणता व्यवसाय करावा? तर अशा महिलांसाठी सुद्धा आम्ही एक व्यवसाय सांगणार आहोत ज्याद्वारे एकही पैसा न गुंतवता व्यवसाय करणे शक्य आहे. आणि हा व्यवसाय घरी बसून सुद्धा करता येतो. तो व्यवसाय म्हणजे होम ट्यूशन. हा असा एक व्यवसाय आहे जो तुम्ही कोणत्याही पैशाची गुंतवणूक न करता तुमच्या घरापासून सुरू करू शकता.


जर तुम्हाला या व्यवसाय पासून अधिक जास्त पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला जास्त मुलांना शिकवायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या कडे अधिक मुलांना आकर्षित केले पाहिजे. हे जर करायचे असेल तर तुम्ही काही दिवस मुलांना मोफत ट्यूशन देवू शकता. त्यामुळे तुमच्याकडे अधिक विद्यार्थी आकर्षित होतील. जर जास्त मुले तुमच्या ट्यूशन मध्ये असतील तर तुम्ही भाड्याने जागा घेवून ट्यूशन घेवू शकता पण जर तुमच्या घरामध्ये जास्त जागा असेल तर उत्तमच.


जर मुलांना बसण्यासाठी टेबल, खुर्ची हव्या असतील तर तुम्हाला थोडी इंवेस्टमेंत करावी लागेल पण सुरवातीला हे गरजेचे नाही. कारण एकदा ट्यूशन घेवून पैसे आले की तुम्ही पुढे ते साहित्य घेऊ शकता. पण त्याकरिता तुम्हाला पैसे बचत करून ठेवावे लागतील. मला वाटतं की Business Ideas For Housewife In Marathi महिलांसाठी घरगुती व्यवसाय कल्पना यामधील हा व्यवसाय एक चांगली कल्पना आहे.



3) डान्स क्लास


जर तुम्हाला डान्स चांगला करता येतो आणि तुम्हा डान्स करायला आवडते तर तुम्ही घरा मध्ये डान्स क्लास सुरू करू शकता. गेल्या काही वर्षापासून डान्स भारतामध्ये भरपूर प्रसिद्ध झाला आहे. प्रत्येक जण डान्स शिकण्यासाठी क्लास चालू करीत आहेत. अनेक पालक आपल्या मुलांना शिक्षणासोबच डान्स क्लास सुद्धा चालू करत आहेत. त्यामुळे डान्स क्लास चालू करणे हा आज चांगला घरगुती व्यवसाय होऊ शकतो. यामध्ये तुम्ही अगदी शुलक्क पैशात हा व्यवसाय करू शकता.


डान्स क्लास चालू करायला आपल्याला एक चांगला साऊंड सिस्टीम घ्यावा लागेल त्याच बरोबर जर जागेचा प्रश्न असेल तर भाड्याने जागा घेवून सुद्धा आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो. त्यामुळे डान्स क्लास सुरू करण्यासाठी जास्त भांडवलाची गरज नसते. हळूहळू तुमच्याकडे पैशाची बचत झाली की तुम्ही अजून सोयी सुविधा तुमच्या क्लास मध्ये देवू शकता. त्यामुळे डान्स क्लास हा व्यवसाय महिलांसाठी कमी भांडवलात सुरू करणारा एक चांगला व्यवसाय आहे. तुम्ही नक्कीच हा व्यवसाय करून सहज पैसे कमवू शकता.



4) केक व्यवसाय


जर तुम्ही केक बनवण्यात एक्स्पर्ट असाल तर अगदी कमी पैसे गुंतवून तुम्ही हा व्यवसाय घरबसल्या सुरू करू शकता. केक बनवण्यासाठी तुम्हाला फक्त ओव्हनची गरज लागेल. याशिवाय केक बनवण्यासाठी जे काही पदार्थ वापरले जातात ते तुम्हाला बाजारात सहज मिळू शकतात.


तुम्ही फक्त 10000 ते 15000 रुपये गुंतवून केक व्यवसाय सुरू करू शकता आणि दरमहा 15000 ते 20000 रुपये सहज कमवू शकता. आजकाल अनेक महिला घरबसल्या हा व्यवसाय करून भरपूर कमाई करत आहेत. जर तुम्हाला या व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला सुरवातीला जास्त ग्राहक शोधावे लागतील त्याकरिता तुम्हाला मार्केटिंग वरती जास्त जोर द्यावा लागेल. मार्केटींग साठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतींचा वापर करू शकता. एकदा लोकांना समजले की तुम्ही केक बनविण्याचा व्यवसाय करता त्यांनतर तुम्हाला जास्त मार्केटिंग ची गरज लागणार नाही.


मार्केटिंगसाठी तुम्हाला थोडे पैसे गुंतवावे लागतील पण त्यातून मिळणारा मोबदला ही अधिक असेल. त्यामुळे मार्केटिंग मध्ये तुमचे गुंतलेले पैसे तुम्ही सहज मिळवू शकता. मार्केटिंग केल्यामुळे तुमचे ग्राहक वाढण्यात मदत होईल त्यामुळे तुमचा मोबदला ही वाढेल परिणामी तुमचा व्यवसाय वाढेल. त्यामुळे पैसे सहजपणे पैसे कमविण्यासाठी महिलांसाठी केक व्यवसाय हा उत्तम मार्ग आहे. या व्यवसाय करून Housewife Business Ideas In Marathi हा तुमचा प्रश्न नक्की मिटेल.



5) ब्यूटी पार्लर


आपण सुंदर दिसावं असे महिलेला वाटतं असते. त्याकरिता महिला खूप खर्च करीत असतात. आजकाल मुलंही ब्युटी प्रोडक्ट्सवर खूप पैसा खर्च करतात.अशा वेळी ब्युटी पार्लरमध्ये कोणते काम केले जाते आणि ते कसे होते हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही घरातूनच ब्युटी पार्लर सुरू करू शकता.


जर तुम्हाला ब्यूटी पार्लर विषयी माहिती नसेल तर तुम्ही ब्यूटी पार्लरचे क्लास लावून ब्यूटी पार्लर काय आहे आणि मेकप कसा करावा हे शिकू शकता. त्यासाठी तुम्हाला थोडेफार पैसे खर्च करावे लागतील. जर तुम्ही ब्यूटी पार्लर सुरू करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला 25000 ते 30000 रुपये खर्च करावे लागतील. त्यामुळे थोडेफार पैसे खर्च करून तुम्ही हा व्यवसाय घर बसल्या सहज करू शकता. आणि आपला इन्कम सुरू करू शकता.



6) मेणबत्ती बनवणे


विशेषतः गावातील महिलांसाठी मेणबत्ती बनविण्याचा व्यवसाय एक उत्तम पैसे कमावण्याचा मार्ग ठरू शकतो. कारण हा व्यवसाय अतिशय कमी भांडवलात होतो. त्यामुळे आपल्याला जास्त पैसे गुंतवावे लागत नाही. 


घरगुती महिलांसाठी (गृहिणी) ही मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय अतिशय सोपा आणि फायदेशीर आहे. जर तुम्ही गृहिणी असाल आणि घरी बसून एक चांगला व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर तुम्ही ही मेणबत्ती बनवण्याची व्यवसाय कल्पना वापरून पाहू शकता.


बाजारातील मेणबत्त्यांची मागणी पाहता, आम्ही तुम्हाला सुचवतो की जर तुम्ही हे काम तुमच्या घरी बसून करू शकत असाल, तर मेणबत्ती बनवण्याचा लघु उद्योग अनेक महिलांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.


मनाबत्ती बनविण्यासाठी लागणारे साहित्य बाजारामध्ये सहज उपलब्ध असते तसेच मेणबत्ती बनविण्याचा खर्च ही जास्त नसतो शिवाय महिला मेणबत्ती बनविण्याचे काम अगदी सहजपणे करू शकतात. त्यामुळे हा व्यवसाय महिलांसाठी अगदी उत्तम पर्याय आहे.


आपण जर हा व्यवसाय सुरू केला तर बनविलेल्या मेणबत्या तुम्ही तुमच्या जवळच्या दुकानदारांना सहजपणे विकू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही Amazon विक्रेता बनून आपली मेणबत्ती ऑनलाइन विकू शकता. अशा प्रकारे मेणबत्ती व्यवसायात महिलांना प्रगती करण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत.



7) लोणचे आणि पापड व्यवसाय


पापड आणि लोणचे बनवण्याचा व्यवसाय सुरू करणे खूप सोपे आहे आणि जर तुम्ही एक महिला असाल तर तुम्ही हा व्यवसाय अगदी कमी गुंतवणुकीत घरबसल्या सुरू करू शकता. बाजारात पापड आणि लोणचे यांना नेहमीच मागणी असल्याने हा व्यवसायही चांगला आहे. लोणचे आणि पापड हे असे पदार्थ आहेत जे सगळ्यांनाच आवडीने खायला आवडतात. विशेषत: सण आला की त्याची मागणी खूप वाढते. लोणचे व पापड कसे बनवायचे हे कोणतीही महिला सहज शिकू शकते.


तुम्ही पापड,लोणची बनवायला सुरुवात केलीत की तुमचा प्रॉडक्ट बाजारात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तुम्ही तुमच्या परिसरातील सर्व दुकानदारांची मदत घेऊ शकता आणि त्यांना तुमच्या व्यवसायाबद्दल सांगू शकता. यासोबतच तुम्ही तुमचा पापड आणि लोणची अमेझॉन वरती ऑनलाइन विकू शकता.अशाप्रकारे, असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचा व्यवसाय अतिशय चांगल्या पातळीवर नेऊ शकता.



8) किराणा दुकान


जरी आज लोक ऑनलाइन खरेदी करणे अधिक पसंत करत असले तरी आजही सगळीकडे किराणा दुकानाची गरज आहे. किराणा दुकानांना ठिकठिकाणी ही खूप मागणी आहे, कारण लोक छोट्या छोट्या गोष्टी खरेदी करण्यासाठी लोक प्रत्येक वेळेस ऑनलाइन खरेदी करू शकत नाहीत.


आजच्या काळात किराणा दुकान सुरू करणे किती सोपे झाले आहे हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे, जर तुम्ही ते योग्य पद्धतीने सुरू केले तर तुम्हाला फार कमी वेळात चांगली कमाई सुरू होईल. घरगुती महिला सहसा अशा व्यवसायाच्या कल्पनेच्या शोधात असतात जी कमी खर्चात सुरू करता येईल. त्यांच्यासाठी किराणा दुकान हा उत्तम मार्ग आहे. 


किराणा दुकान सुरू करणे यासाठी सुद्धा उत्तम मार्ग आहे की लोक नेहमी अशा वस्तूंची खरेदी करत असतात जे लोकांच्या दैनंदिन गरजेच्या आहेत. जसे दूध, बिस्कीट, मसाला, डाळ, तांदूळ. इ. यासारख्या वस्तू लोक ऑनलाइन मागवू शकत नाही पण आजकाल तेही शक्य आहे म्हणा पण लोकांना या वस्तू त्वरित हव्या असतात त्यामुळे लोक ऑनलाइन पर्याया ऐवजी ऑफलाईन म्हणजे किराणा दुकानातून वस्तू घेणे जास्त योग्य समजतात. अशा वेळी. किराणा व्यवसाय सुरू करणे फायद्याचे ठरू शकते.


अशाप्रकारे तुम्ही हा व्यवसाय तुमच्या घरी बसून सुरू करू शकता, जर तुम्ही विचार करत असाल की किराणा दुकान उघडण्यासाठी किती पैसे लागतील? तर आम्ही तुम्हाला सांगतो की एक लहान किराणा दुकान उघडण्यासाठी तुम्हाला किमान 50 हजार ते 1 लाख रुपये गुंतवावे लागतील.


याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हा किराणा व्यवसाय महिला घरी बसून सुद्धा करू शकतात. जेव्हा एखादा ग्राहक काही खरेदी करण्यासाठी येतो तेव्हा तुम्ही त्यांना वस्तू देऊ शकता आणि तुमचे घरातील इतर कामेही करू शकता. याशिवाय या व्यवसायाचा आणखी एक फायदा म्हणजे अनेक महिलांना घरी बसून कंटाळा येतो. त्यामुळे त्यांच्यासाठी हा व्यवसाय खूप फायदेशीर ठरू शकतो. कारण यामध्ये त्यांचा वेळही जाईल आणि त्याचबरोबर त्यांना रोजगाराचे साधनही मिळेल.



9) बेकरी व्यवसाय 


बेकरीमध्ये अशी अनेक उत्पादने आहेत, जी लोकांना खूप आवडतात. तुम्‍हाला बेकरी व्यवसायात रुची असल्‍यास तुम्‍ही घरबसल्या अगदी कमी गुंतवणुकीत हा व्‍यवसाय सुरू करू शकता.


लोकांना गोड पदार्थ खायला जास्त आवडतात. त्यामुळे बेकरी पदार्थांना जास्त मागणी असते. बेकरी वस्तूंमध्ये चॉकलेट, बिस्किटे, केक, कपकेक, कुकीज, पेस्ट्री इ पदार्थांचा समावेश होतो. जर लोकांची बेकरी पदार्थांना असलेली मागणी ओळखून जर तुम्ही का व्यवसाय सुरू केला तर तुम्ही घरबसल्या चांगले पैसे कमवू शकता.


हा व्यवसाय खूप फायदेशीर आहे आणि इतर व्यवसायांप्रमाणे बेकरी व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतींची मदत घेऊ शकता.



10) टिफिन पॅकिंग व्यवसाय


जर तुमचे घर बाजाराच्या मध्यभागी किंवा शहराजवळ असेल तर तुम्ही टिफिन पॅकिंगचा व्यवसाय सुरू करू शकता. विशेषत: शहरांमध्ये टिफिनची मागणी खूप जास्त आहे, याचे कारण अनेक लोक नोकरी किंवा अभ्यासाच्या उद्देशाने घरापासून दूर येत असतात.


अशा लोकांसाठी स्वयंपाकाचे काम खूप कंटाळवाणे असते. याशिवाय नोकरदार लोकांचे जीवन खूप धकाधकीचे आणि धावपळीचे असते आणि असे लोक स्वतःचा स्वयंपाक करण्यापेक्षा त्यांचा वेळ वाचवण्यासाठी टिफिन पॅक सर्व्हिस सुरू करणे पसंत करतात.


अशा लोकांना तुम्ही तुमचा स्वतःचा टिफिन पॅकिंग व्यवसाय सुरू करून मदत करू शकता. हा व्यवसाय कोणत्याही महिलेसाठी खूप फायदेशीर आहे आणि तो खूप चांगल्या पातळीवर नेला जाऊ शकतो. कारण यामध्ये तुमचे जे काही ग्राहक आहेत ते तुमचे रेगुलर ग्राहक असतात. कारण ते ग्राहकच तुमच्याकडून रोज टिफीन घेत असतात. त्यामुळे ग्राहक शोधण्यासाठी तुम्हाला एकदाच मेहनत घ्यावी लागेल. त्यानंतर मिळालेले ग्राहक हे तुमचे रेगुलर ग्राहक बनून जातील.


अशा प्रकारे, तुमच्या ग्राहकांची संख्या जसजशी वाढत जाईल, तसतसे तुम्ही तुमच्या व्यवसायात गुंतवणूक करू शकता आणि तो आणखी वाढवू शकता. अशा प्रकारे, या व्यवसायातील तुमची गुंतवणूक वाया जाण्याची भीती कमी असते.



11) एफिलिएट मार्केटिंग


भारतात इंटरनेटचा वापर एवढा वाढला आहे की, तुम्ही याचा अंदाज यावरून लावू शकता की, बहुतांश तरुण त्यांच्या संपूर्ण दिवसातील निम्म्याहून अधिक वेळ इंटरनेटवर घालवतात. इंटरनेटवरून पैसे कमावणारे लोक याचा चांगलाच फायदा घेत आहेत.


इंटरनेटवरून ऑनलाइन पद्धतीने पैसे कमविण्यामध्ये पुरुषांबरोबर महिला देखील पैसे कमवत आहेत.इंटरनेटवरून पैसे कमावण्याचा विचार केला तर त्यात एक नाव नक्कीच आहे आणि ते म्हणजे एफिलिएट मार्केटिंग. एफिलिएट मार्केटिंगच्या मदतीने तुम्ही आजच्या काळात घरात बसून लाखो रुपये कमवू शकता.


जाणून घ्या: एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय?


तुम्हाला एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय हे माहित नसेल तर? तर मी तुम्हाला सांगतो की अनेक कंपन्या त्यांच्या वस्तूंच्या प्रचारासाठी एफिलिएट प्रोग्राम ऑफर करतात. ज्यामध्ये तुम्ही त्यांचा माल विकलात, तर त्या बदल्यात तुम्हाला काही टक्के कमिशन मिळते, ज्याला आपण एफिलिएट मार्केटिंग म्हणतात.


तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात ज्ञान असेल, त्याच क्षेत्रातील इतर लोकांना वस्तू विकून तुम्ही चांगले कमिशन मिळवू शकता. अनेक मोठ्या ऑनलाइन शॉपिंग साइट्स एफिलिएट प्रोग्राम ऑफर करतात. ते एफिलिएट प्रोग्राम जॉईन करून तुम्ही खूप पैसे अगदी घर बसल्या कमवू शकता.



12) ब्लॉगिंग


तुम्हाला लिहायला आवडते आणि तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात चांगले ज्ञान आहे, तर तुम्ही अगदी कमी गुंतवणूक करून घरी बसून ब्लॉगिंगचे काम सुरू करू शकता. ब्लॉगिंग म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून कोणतीही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे.


ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी, तुम्हाला दोन प्लॅटफॉर्म मिळतात, पहिले Blogger.com जे पूर्णपणे मोफत आहे, तुम्ही फक्त डोमेन खरेदी करून तुमचा स्वतःचा ब्लॉग सुरू करू शकता आणि दुसरे म्हणजे वर्डप्रेस, येथे तुम्हाला होस्टिंग आणि डोमेन खरेदी करावे लागेल.


ब्लॉगर प्लॅटफॉर्म च्या तुलनेत वर्ड प्रेस वरती जास्त फीचर मिळतात. जर तुम्ही थोडे जास्त पैसे गुंतवून ब्लॉगिंग करू इच्छित आहेत तर तुम्ही वर्ड प्रेस हा प्लॅटफॉर्म निवडू शकता पण तुम्ही कमी पैशात ब्लॉगिंग करणार आहात तर ब्लॉगर हा प्लॅटफॉर्म बेस्ट आहे. तुम्ही ब्लॉगर आणि वर्डप्रेस या दोन्हीही प्लॅटफॉर्म चा वापर करून ब्लॉगिंग च्या साह्याने पैसे कमवू शकता. त्यामुळे ब्लॉगिंग हा सुद्धा एक पैसे कमविण्याचा उत्तम मार्ग आहे.



13) कंटेंट राइटिंग


कंटेंट राइटिंग म्हणजे कोणत्याही विषयावरील आपल्याला अवगत असलेली माहिती लिखाण स्वरूपात देणे. कंटेंट राइटिंग करतेवेळी अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात जसे जो कंटेंट लिहला आहे ती किती उपयोगी आहे बरोबर आहे तसेच आपल्या कंटेंट मध्ये योग्य कीवर्ड वापरून कंटेंट आकर्षक बनविणे. ह्या सर्व गोष्टी एक चांगल्या कंटेंट राइटिंग मध्ये आवश्यक असतात.


अनेक कंपन्या आहेत ज्या वेबसाइट और ब्लॉग कंटेंट राइटर यांना पगारावर नियुक्त करीत असतात. जर तुम्ही कंटेंट राइटिंग चे काम करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही घरी बसून लाखो रुपये कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रथम कंटेंट राइटिंग शिकावं लागेल.


जर तुम्हाला कंटेंट राइटिंग शिकायचे असेल तर तुम्ही दुसऱ्यांचे ब्लॉग आणि वेबसाईट तुम्ही वाचू शकता आणि त्यांनी आपले ब्लॉग कसे लिहले आहेत कसे कीवर्ड वापरले आहेत याचे निरीक्षण तुम्हाला करावे लागेल. जर तुम्हाला कंटेंट राइटिंग बद्दल आधिक जास्त शिकायचं असेल तर तुम्ही कंटेंट राइटिंग चे कोर्स सुद्धा जॉईन करू शकता.


कंटेंट राइटिंग शिकल्यानंतर, तुम्हाला ज्या विषयाचे ज्ञान असेल त्यावर कंटेंट लिहून तुम्ही भरपूर कमाई करू शकता. शिकल्यानंतर, तुम्हाला ज्या विषयाचे ज्ञान असेल त्यावर कंटेंट लिहून तुम्ही भरपूर कमाई करू शकता.तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कोणत्याही कंपनीत कंटेंट रायटरच्या नोकरीसाठी अर्ज करू शकता. त्याच बरोबर तुम्ही हे काम फ्रीलान्सर म्हणूनही करू शकता. आणि पैसे कमवू शकता.



14) फ्रीलान्सिंग


इंटरनेटमध्ये गुंतवणुकीशिवाय महिलांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असल्या तरी, गृहिणी घरी बसून फ्रीलान्सिंग करून लाखो रुपये कमवू शकते.


फ्रीलान्सिंग व्यवसाय आजकाल झपाट्याने वाढणारा व्यवसाय बनत आहे कारण या व्यवसायामध्ये घरी बसून काम करणे शक्य असते त्यामुळे लोक 8 तासाच्या नोकरी ऐवजी फ्रीलांसिंग करणे जास्त सोयीस्कर समजतात. या मध्ये घरी बसूनच लाखो रुपये कमावले जाऊ शकतात.


फ्रीलन्सिंग मध्ये ऑनलाइन पद्धतीने काम मिळवायचे असते. ते काम पूर्ण करून दिल्यावरती आपल्याला त्या कामाचा मोबदला मिळत असतो. आपण ज्या क्षेत्रात चांगले काम करू शकतो असे काम आपण ऑनलाइन पद्धतीने फ्रीलन्सिंग साईट्स वरती मिळवावे. आणि ते काम पूर्ण करावे आणि त्याचा चांगला मोबदला घ्यावा.


फ्रीलान्सिंग व्यवसाय करण्यासाठी अनेक वेबसाइट्स आहेत, जसे की: Upwork, Fiverr, Freelancer.com, Guru, Toptal, People per Hour इत्यादी ज्यावर तुम्ही फ्रीलान्सिंग व्यवसाय सुरू करू शकता. 



15) यू ट्यूब


महिलांनो, तुमच्याकडे कोणत्याही क्षेत्रातील माहिती असेल, तर तुम्ही व्हिडिओद्वारे लोकांपर्यंत माहिती पोहोचवू शकता. आजच्या काळात YouTube बद्दल कोणाला माहिती नाही असा एकही माणूस नसावा. तुम्हीही तुमचा काही वेळ YouTube वरही घालवत असालच. अशा परिस्थितीत तुम्ही घरी बसून YouTube वर व्हिडिओ अपलोड करून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता हे तुम्हाला माहीत आहे का?


होय तुम्ही ते अगदी बरोबर वाचले आहे. तुम्हाला कोणत्याही क्षेत्रातील ज्ञान असेल, त्या क्षेत्रातील व्हिडिओ बनवून तुम्ही YouTube वर व्हिडिओ अपलोड करू शकता आणि अनेक मार्गांनी पैसे कमवू शकता.


जर तुम्हाला स्वयंपाक करायला आवडत असेल तर तुम्ही यू ट्यूब वरती कुकिंग चॅनेल सुरू करू शकता. त्याचप्रमाणे अनेक महिलांना शिकवायला आवडते, त्यामुळे अशा वेळी तुम्ही एक एज्युकेशनल चॅनल सुरू करून तिथे मुलांना शिकवू शकता.


यासाठी तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करण्याची गरज नाही, कारण आजच्या काळात जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल फोन आहे आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच YouTube चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करू शकता. अशा प्रकारे यू ट्यूब वरती व्हिडिओ बनवून तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकता.



16) फोटो कॉपी स्टोअर


आजच्या काळात कोणत्याही कामात जवळपास सर्वच कागदपत्रांच्या फोटोकॉपी मागवल्या जातात आणि त्यामुळेच अनेकजण घरातून फोटोकॉपीचे दुकान सुरू करत आहेत. फोटोकॉपी शॉप सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे गुंतवण्याची गरज नाही.


जर तुम्ही हा व्यवसाय योग्य मार्गाने सुरू केला तर तुम्हाला चांगले पैसेही मिळू शकतात. फोटोकॉपी स्टोअरमध्ये फोटो कॉपी करण्यासोबतच तुम्ही लोकांना लॅमिनेशन, मोबाईल रिचार्ज सेवाही देऊ शकता. यासोबतच जर तुम्हाला कॉम्प्युटरची चांगली समज असेल तर तुम्ही तुमच्या दुकानातून सरकारी नोकरीचे फॉर्म भरण्याचे कामही सुरू करू शकता.


फोटो कॉपी आणि लॅमिनेशन सेवेचा व्यवसाय घरापासून अगदी सहज सुरू करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.



17) मेहंदी डिझायनर


आपल्या देशात मेहंदी लावणे खूप शुभ मानले जाते, ही अशी प्रथा आहे की ती प्रत्येक शुभ प्रसंगी मेहंदी लावली जाते, जर तुम्ही चांगली मेहंदी डिझाईन असाल तर तुम्ही घरी बसून मेहंदी लावण्याचा व्यवसाय सुरू करू शकता, 


आपल्याकडे लग्न असो वा घरी कोणता कार्यक्रम असो महिलांना त्यांच्या हातावर मेहंदी हवी असते. त्यामुळे मेहंदी डिझायनिंग हा व्यवसाय खूप प्रसिद्ध झाला आहे. मेहंदी डिझायनिंग चे बाजारात क्लासेस सुद्धा उपलब्ध आहेत या वरून तुम्ही समजू शकता की याला बाजारात किती मागणी आहे.


हा व्यवसाय करण्यासाठी कोणतीही गुंतवणूक करण्याची गरज नसते. जर तुमच्याकडे मेहंदी काढण्याची कला असेल तर तुम्ही अगदी सहजपणे हा बिझिनेस सुरू करू शकता. जर तुमच्याकडे ही कला नसेल तर वर सांगितल्या प्रमाणे बाजारात मेहंदी डिझायनिंग चे क्लास उपलब्ध आहेत. ते जॉईन करून तुम्ही ही कला अवगत करू शकता.आणि हा व्यवसाय करू शकता.



18) महिलांसाठी जिम आणि योगा सेंटर


आजकाल प्रत्येकजण आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे. जेणेकरून एक निरोगी आयुष्य जगता येईल. आजकाल असे दिसून आले आहे की महिलांमध्ये वजन वाढण्याची समस्या खूप वाढली आहे आणि स्त्रिया जिममध्ये जाण्यास टाळाटाळ करतात कारण बहुतेक जिममध्ये पुरुष प्रशिक्षक असतात, त्यामुळे जर तुम्ही महिलांसाठी एक छोटी जीम उघडली तर महिला नक्की कंफर्टेबल होऊन तुमच्या जिम मध्ये येतील.


त्यामुळेच तुम्ही महिलांसाठी जिम आणि योगा सेंटर उघडून त्यांना फिटनेस आणि मेडीटेशन चे धडे देऊ शकता आणि त्याच बरोबर हा एक उत्तम व्यवसाय देखील होऊ शकतो. ज्या लोकांना फिटनेस आणि मेडीटेशन मध्ये इंटरेस्ट आहे त्या लोकांना ट्रेन करून तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही हा व्यवसाय करून चांगले पैसे सहजपणे कमावू शकता.



19) रेडिमेड कपडे विकणे


घरबसल्या रेडिमेड कपडे विकणे खूप सोपे आहे. महिलांना कपड्यांची खरेदी करणे खूप आवडते आणि त्यांना याबद्दल चांगले ज्ञान देखील आहे. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर तुम्ही घरबसल्या रेडिमेड कपडे विकून चांगले पैसे कमवू शकता.


हा व्यवसाय घरबसल्या सुरू करायचा असेल तर आधी तुम्हाला कपडे कसे विकायचे हे ठरवावे लागेल. कारण रेडिमेड कपडे सर्व वयोगटातील लोकांसाठी येतात आणि त्यातही तुम्ही पुरुषांचे कपडे विकायचे की फक्त महिलांचे कपडे हे तुम्हाला नीट ठरवावे लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दोघांचेही कपडे विकू शकता.


तुम्हाला घरून कुठलेही कपडे विकायचे असतील तर ते घाऊक बाजारातून विकत घ्यावे लागतात. जर तुम्ही घाऊक बाजारात काम करणाऱ्या एखाद्याला ओळखत असाल तर हे आणखी चांगले आहे. त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही सर्व रेडिमेड कपडे खरेदी करू शकता.


या व्यवसायातून कमाईची मर्यादा नाही. तुम्ही जितके जास्त कपडे विकाल तितकी तुमची कमाई वाढेल. लक्षात ठेवा की हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, तुम्हाला एक चांगली व्यवसाय योजना बनवावी लागेल. आणि तरच तुम्ही हा व्यवसाय उत्तम पणे करू शकता .



20) आर्टिफीसियल दागिन्यांचे दुकान


भारतातील महिलांना दागिन्यांची खूप आवड आहे. पण आजकाल सोन्या-चांदीचे दागिने खूप महाग झाले आहेत. त्यामुळे बहुतांश महिलांना आर्टिफिशियल ज्वेलरी आवडू लागली आहे. आर्टिफिशियल दागिने स्वस्त, टिकाऊ आणि वापरण्यास सुरक्षित असतात.


याच गोष्टीचा वापर करून आणि लोकांच्या गरजा ओळखून तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. आर्टिफिशियल दागिन्यांना मागणी जास्त असल्यामुळे तुम्ही हा व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने करू शकता. तुम्ही आर्टिफिशियल दागिने होलसेलमध्ये खरेदी करू शकता आणि घरबसल्या विकू शकता.


भविष्यात, तुम्ही अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या वेबसाइटवर आर्टिफिशियल ज्वेलरी ऑनलाइन विकू शकता किंवा तुमचे स्वतःचे दुकान सुरू करू शकता.


निष्कर्ष


या आर्टिकल मधून आम्ही महिलांसाठी घरगुती व्यवसाय कल्पना Housewife Business Ideas In Marathi यांची यादी तुमच्या समोर मांडण्याची प्रयत्न केला आहे. महिलांसाठी व्यवसाय करण्याचे अनेक मार्ग किंवा अनेक व्यवसाय प्रकार आहेत. पण या आर्टिकल मधून आम्ही आपणास कमी खर्चामध्ये आणि अगदी घरामध्ये राहून सुद्धा व्यवसाय सुरू करता येतील असे काही व्यवसाय यादी सांगितली आहे. जर तुम्हाला घरी राहूनच व्यवसाय करायचा असेल आहे तोही अगदी कमी खर्च करून तर तुम्ही या वरती दिलेल्या व्यवसाय पैकी कोणतेही व्यवसाय करून तुम्ही सफल होहू शकाल. त्यासाठी नक्कीच तुम्हाला थोडी मेहनत घ्यावीच लागेल. मेहनती विना तुमचा व्यवसाय सफल होणार नाही. 


आम्ही दिलेली माहिती तुमच्या फायद्याची असेल तर नक्की आम्हाला कळवा. आणि अशाच नवनवीन माहिती विषयक लेख वाचण्यासाठी आपला ब्लॉग बुकमार्क करून ठेवा. त्याच बरोबर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.


FAQs


व्यवसाय म्हणजे काय?

व्यवसाय ही वस्तू आणि सेवांचे निरंतर उत्पादन आणि ग्राहकांपर्यंत त्यांचे वितरण करण्याची आर्थिक प्रक्रिया आहे. त्याच बरोबर व्यवसायाचा उद्देश वस्तू आणि सेवांचे उत्पादन करून मानवी इच्छा पूर्ण करून नफा मिळवणे आहे.


व्यवसाय कोण करू शकतो?

व्यवसाय कोणी करावा याचे प्रमाण नाही आहे. कोणीही व्यक्ती व्यवसाय करू शकतो मग तो पुरुष असो किंवा महिला.


व्यवसाय का करावा?

व्यवसाय करण्याचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक परिस्थिती म्हणजेच पैसे कमविणे. कोणताही व्यवसाय त्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुरू केला जातो.


महिला घरी बसून कोणता व्यवसाय करू शकतात?

घरी बसून तुम्ही ऑनलाइन ब्लॉगिंग, यूट्यूब चॅनल आणि एफिलिएट मार्केटिंग करू शकता. तसेच शिवणकाम किंवा मेणबत्त्या बनवण्याचा व्यवसाय करू शकता.

 

हे सुद्धा वाचा.


स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे फायदे आणि तोटे

विनायक मेटे यांचा जीवन परिचय

फेसबुक चा शोध कोणी आणि कधी लावला

भारतातील श्रीमंत व्यक्ती कोण आहेत

Please do not enter any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने