तुम्हाला माहिती आहे का भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे, ज्याच्याकडे संपूर्ण भारतात सर्वात जास्त संपत्ती आहे, नाही तर आज आम्ही तुम्हाला भारतातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींबद्दल Top 10 Richest Man in India 2022 In Marathi सांगणार आहोत.
कारण या जगातल्या प्रत्येक माणसाला श्रीमंत व्हायचे असते आणि त्यासाठी तो खूप मेहनत करतो पण श्रीमंत होणे आपल्याला वाटते तितके सोपे नसते, श्रीमंत होण्यासाठी आपल्याला आपले ध्येय केंद्रित करून सतत मेहनत करावी लागते.
त्यामुळे जर तुम्हालाही श्रीमंत व्हायचे असेल आणि तुमची मोठी स्वप्ने सत्यात उतरवायची असतील, तर तुम्ही श्रीमंत लोकांप्रमाणे विचार करा आणि त्यांच्याबद्दल जागरूक राहा.
तुम्ही अनेकदा टीव्ही आणि वृत्तपत्रांमध्ये जगातील सर्वात श्रीमंत लोकांबद्दल वाचले असेल आणि त्यांच्याबद्दल वाचल्यानंतर तुम्हीही विचार केला असेल की हे लोक इतके पैसे कसे कमावतात आणि कोणत्या संस्थेने त्यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची पदवी दिली आहे.
दरवर्षी फोर्ब्स नावाची संस्था जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जाहीर करते, याशिवाय प्रत्येक देशातील सर्वात श्रीमंत लोकांची स्वतंत्र यादी देखील जारी करते, यामध्ये आपला भारत देश देखील समाविष्ट आहे, आज आम्ही तुम्हाला भारतातील 10 श्रीमंत लोकांबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊया कोण आहेत ते लोक?
{tocify} $title={TABLE OF CONTENTS}
भारतातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?
भारतात करोडपती-अब्जाधीश अनेक असले तरी ज्याच्याकडे सर्वात जास्त संपत्ती आहे तो सर्वात श्रीमंत मानला जातो, म्हणजे अगदी श्रीमंतातील श्रीमंत. अशाच प्रमुख दहा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत ते आपण या आर्टिकल मधून पाहणार आहोत.
1) गौतम अडानी
गौतम अदानी हे भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि व्यापारी असून ते अदानी समूहाचे मालक आहेत. गौतम अदानी यांचा अदानी समूह हा कोळसा व्यापार आणि कोळसा खाण, वीजनिर्मिती, बंदरे, तेल आणि वायू उत्खनन, मल्टीमॉडल लॉजिस्टिक आणि गॅस वितरणाशी संबंधित आहे.
गौतम अदानी यांचा जन्म 24 जून 1962 रोजी भारताच्या गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात झाला, त्यांचे वडील कापड व्यापारी होते. गौतम अडानी यांची एकूण संपत्ती 121.7 अब्ज डॉलर आहे. त्याच मुळे गौतम अडानी हे भारतातील 2022 मध्ये सर्वात जास्त संपत्ती असणारे व्यक्ती आहेत.
2) मुकेश अंबानी
मुकेश अंबानींबद्दल माहिती नसलेली व्यक्ती भारतात क्वचितच असेल, जर तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती नसेल, तर तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन आहेत आणि ते फोर्ब्स च्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती 2022 च्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
मुकेश अंबानी यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी येमेनच्या एडन शहरात झाला आणि मुकेश अंबानी यांच्या पत्नीचे नाव नीता अंबानी आणि मुलाचे नाव अनंत अंबानी आहे, त्यांना एक लहान भाऊ देखील आहे ज्याचे नाव अनिल अंबानी आहे, त्यांचा स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय देखील आहे.
रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. मुकेश अंबानी या कंपनीचे सर्वेसर्वा आहेत. रिलायन्स व्यतिरिक्त मुकेश अंबानी इतर व्यवसाय करतात. ज्यामध्ये रिलायन्स मोबाईल, रिलायन्स हा फक्त रिलायन्स पेट्रोलियमचा मुख्य व्यवसाय आहे. सध्या मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 96.9 अब्ज डॉलर आहे.
3) शिव नादर
भारतामध्ये आयटी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या कंपनी पैकी एक एचसीएल (HCL) कंपनीचे शिव नादर हे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. शिव नाडर यांचा जन्म 18 जुलै 1945 रोजी तमिळनाडू राज्यातील तिरुचेंदूर येथे झाला. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगू इच्छितो की शिव नादर यांना 2018 साली भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कारही दिला आहे.
HCL कंपनीची स्थापना 1970 मध्ये झाली. शिव नादर याच्या मेहनत आणि अथक प्रयत्नातून ही कंपनी भारतातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे. 2022 मध्ये शिव नादर याची संपत्ती 20.04 अब्ज डॉलर इतकी असून ते भारतातील तिसरे श्रीमंत व्यक्ती आहेत.
4) राधाकिशन दमानी
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादी मध्ये राधाकिशन दमानी हे चौथ्या क्रमांकावर येतात. राधाकिशन दमानी यांचा जन्म 1954 मध्ये बिकानेर येथील मारवाडी कुटुंबात झाला.
राधाकिशन दमाणी हे डी मार्ट (D MART) कंपनीचे संस्थापक आहेत. जर तुम्हाला d-mart बद्दल माहिती नसेल तर तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की D-mart ही भारतातील आघाडीची शॉपिंग साखळी आहे जिथून तुम्ही घरगुती वस्तू खरेदी करू शकता.
राधाकिशन दमानी हे फेब्रुवारी 2021 पर्यंत भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. परंतु त्यांच्या कंपनीच्या स्टॉक मध्ये अचानक घसरण झाली त्यामुळे ते श्रीमंतीच्या यादीतून झाली आले.जर आपण त्यांच्या नेट वर्थ बद्दल बोललो तर राधाकिशन दमानी सध्या 15.4 अब्ज डॉलर चे मालक आहेत.
5) हिंदुजा ब्रदर्स
हिंदुजा ब्रदर्स या यादी मध्ये पाचव्या स्थानी आहेत. या कंपनीची स्थापना 1914 मध्ये परमानंद दीपचंद यांनी मुंबई येथे केली. आज या कंपनीचे मालक श्रीचंद हिंदुजा आणि त्यांचा भाऊ गोपीचंद हे हिंदुजा आहेत. एवढंच नाही तर हे अशोक लेलँड, इंडसइंड बँक अशा अकरा कंपन्यांचे हे मालक आहेत. त्यांच्या या कंपन्यांमध्ये जवळपास 40000 हून अधिक कर्मचारी काम करतात. या कंपनीचे मुख्यालय लंडन येथे आहे. हिंदुजा ब्रदर्स याचे नेट वर्थ 12.8 अब्ज डॉलर इतके आहे.
6) साइरस एस. पूनावाला
सायरस पूनावाला यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरात 1945 साली झाला. सायरस पूनावाला यांना भारताचे वॅक्सिन किंग म्हणून सुद्धा ओळखले जाते. कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी भारत सरकारने मंजूर केलेल्या दोन लसींपैकी कोवॅक्सिन ही त्यांच्या कंपनी भारत बायोटेकने बनवली आहे. साइरस एस. पूनावाला हे सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया चे अध्यक्ष सुद्धा आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.साइरस एस. पूनावाला यांचे 2022 मधील नेट वर्थ 12.8 अब्ज डॉलर इतके आहे. आणि त्यामुळेच ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या स्थानावर येतात.
7) पल्लोनजी मिस्त्री
जगातील एक छुपे खरबपती म्हणून ओळखले जाणारे पल्लोनजी मिस्त्री यांचा जन्म मलबार हिल, दक्षिण मुंबई, भारत येथे 1929 मध्ये झाला. पल्लोनजी मिस्त्री हे शहापुरजी पल्लोनजी ग्रुप चे चेरमन आहेत.भारतीय वंशाचा हा आयरिश रहिवासी आयर्लंडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.
पालोनजी हे भारतातील सर्वात यशस्वी आणि शक्तिशाली व्यावसायिकांपैकी एक आहेत, त्यांच्या नियंत्रणाखाली भारताच्या पश्चिम आशिया आणि आफ्रिकेपर्यंत विस्तारलेले बांधकाम साम्राज्य आहे. पल्लोनजी मिस्त्री यांची त्यांच्या मुलांसोबत त्यांची टाटा सन्समध्ये 18.5% हिस्सेदारी आहे. टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा हे निवृत्त झाल्यावर त्यांनी टाटा ग्रुपची सर्व सूत्रे पल्लोनजी मिस्त्री यांचा मुलगा साइरस मिस्त्री यांच्या हातात दिली आहेत. पल्लोनजी मिस्त्री यांचे नेट वर्थ 11.4 अब्ज डॉलर इतके आहे.
8) उदय कोटक
कोटक महिंद्रा बँक चे मालक उदय कोटक हे भारतातील आठवे श्रीमंत व्यक्ती आहेत. उदय कोटक यांनी आनंद महिंद्रा यांच्या मदतीने 1986 मध्ये एक फायनान्स कंपनी ची स्थापना केली. आणि त्यामुळेच उदय कोटक यांनी त्या फायनान्स कंपनीचे नाव कोटक महिंद्रा असे ठेवले. उदय कोटक यांचा जन्म 15 मार्च 1959 रोजी जन्म झाला. 2018 मध्ये, उदय कोटक यांना सीईओ वर्ल्ड मॅगझिनने “जगातील सर्वोत्कृष्ट सीईओ” ही पदवी प्रदान केली. उदय कोटक यांची संपत्ती 11.3 अब्ज डॉलर इतकी आहे.
9) गोदरेज कुटुंब
भारतातील एक सर्वांच्या ओळखीचे कंपनी गोदरेज. या कंपनीची मालकी गोदरेज कुटुंबाकडे आहे. गोदरेज ही कंपनी जवळपास 120 वर्ष जुनी कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय मुंबई मध्ये असून गोदरेज कंपनी रिअल इस्टेट, फर्निचर, रसायने आणि इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी उत्पादनांमध्ये व्यवसाय करते. गोदरेज कुटुंबाचे नेट वर्थ 11 अब्ज डॉलर इतके आहे. आणि म्हणूनच गोदरेज कुटुंब या यादीमध्ये नवव्या स्थानावर येते.
10) लक्ष्मी मित्तल
लक्ष्मी मित्तल यांना स्टील किंग देखील म्हटले जाते कारण त्यांची कंपनी जगातील सर्वात जास्त स्टील उत्पादने तयार करते, त्यांचा जन्म 15 जून 1950 रोजी भारतातील राजस्थान राज्यातील चुरू शहरात झाला.
लक्ष्मी मित्तल आर्सेलर मित्तल ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि मित्तलची यांची कंपनी आर्सेलर मित्तल ग्रुप ही स्टील आणि लोह उत्पादनाशी संबंधित काम करते लक्ष्मी मित्तल यांना 2008 मध्ये भारत सरकारने पद्मविभूषणने सन्मानित केले . 2018 मध्ये, लक्ष्मी मित्तल हे भारतातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. पण आता त्यांच्या संपत्तीत घसरण होऊन ते आता दहाव्या स्थानावर आले आहेत. लक्ष्मी मित्तल त्यांची 2022 मधील नेट वर्थ 10.3 अब्ज डॉलर येवढे आहे.
निष्कर्ष
मला आशा आहे की भारतातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत? Top 10 Richest Man in India 2022 हे आपल्याला वरील लेख वाचून समजलेच असेल. ही यादी दरवर्षी बदलत असते. त्यामुळे दरवर्षी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये बदल होत असतात. त्यामुळे 2022 मधील भारतातील श्रीमंत लोक कोण आहेत हे आपणास समजलेच असेल. हा लेख पूर्ण वाचक्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी पुन्हा आम्हाला भेट द्या. आणि तुमची मते नक्की आम्हाला कळवा.
FAQs
1) भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे 2022
Ans. गौतम अडानी हे 2022 मधील भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गौतम अडानी यांची एकूण संपत्ती 121.7 अब्ज डॉलर आहे.
2) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे 2022
Ans. एलोन मस्क हे जगातील 2022 मधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. एलोन मस्क याची 2022 मधील संपत्ती 212 अब्ज डॉलर आहे.
इतर महत्वपूर्ण लेख वाचा:










