१५ ऑगस्ट १९४७ एक अशी तारीख आहे जी आपल्या देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहली गेली आहे.कारण याच दिवशी भारत इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होऊन स्वतंत्र देश बनला होता. या दिवशी भारत दोनशे वर्षांच्या गुलामीतून मुक्त झाला होता.
भारत दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. स्वातंत्र्य दिन आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी भारताला ब्रिटिश राजवटीपासून मुक्त करण्यासाठी केलेल्या त्यागाची आठवण करून देतो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिश वसाहतवादापासून स्वतंत्र घोषित करण्यात आले आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली. स्वातंत्र्यदिना विषयीच्या या निबंधात, आपल्याला भारताच्या स्वातंत्र्य इतिहासाचे सर्व महत्वाचे तपशील सापडतील.
{tocify} $title={Table of Contents}
स्वातंत्र्य दिन निबंध
शाळा, महाविद्यालये, कार्यालये, सोसायटी कॉम्प्लेक्स, सरकारी आणि खाजगी संस्था या ठिकाणी ध्वजारोहण, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वज फडकवतात आणि भाषणाने राष्ट्राला संबोधित करतात. दूरदर्शन हा संपूर्ण कार्यक्रम दूरदर्शनवर थेट प्रसारित करतो.तसेच सर्व प्रसार माध्यमे सुद्धा हा कार्यक्रम प्रसारित करत असतात.१५ ऑगस्ट १९४७ रोजी जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचे पहिले पंतप्रधान बनले, ज्यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारतीय ध्वज फडकवल्यानंतर भारतीयांना संबोधित केले. ही प्रथा पुढे आलेल्या इतर पंतप्रधानांनी पुढे नेली, जिथे दरवर्षी या दिवशी ध्वजारोहण, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी आयोजित केले जातात. बरेच लोक कपडे, घरे आणि वाहनांवर झेंडे लावून हा सण साजरा करतात.
स्वातंत्र्यदिनाचा इतिहास
स्वतंत्र दिनाचा इतिहास हा फार मोठा आणि त्यामुळे तो नीट पणे समजून घेणे महत्वाचे आहे.कारण इंग्रज भारतात आल्यापासून ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा इतिहास हा थरारक आणि प्रेरणादाई आहे.आज आपण भारतीय स्वातंत्र्य दिवस निबंध विषयी सर्व माहितीचा आढावा घेणार आहोत.
इंग्रजांचे भारतात आगमन
भारताला सोन्याची चिडिया असे संभोधले जायचे.एके काळी भारतात सोन्याचा धूर यायचा असे सुद्धा म्हटले जायचे.कारण त्या काळी भारत एक संपन्न असा देश होता. याचा देशात काही ब्रिटिश कपडे आणि मसाले यांचा व्यापार करण्यासाठी आले होते त्यांनी इथली संपन्नता पहिली आणि ते इथेच राहिले.हळूहळू आपल्या साथीदारांना बोलावू लागले.व्यापाराच्या नावाखाली आलेले या इंग्रजानी भारतातील सर्व संपन्नता सर्व मौल्यवान गोष्टी आपल्या देशात नेण्यास सुरवात केली आणि कालांतराने हा संपन्न देश हळूहळू मागास व्हायला लागला.
भारताची गुलामीकडे वाटचाल
मागास झालेल्या या भारत देशात ४०० वर्ष्यापुर्वी ब्रिटीशानी स्थापन केलेली इस्ट इंडिया कंपनी भारतात व्यवसाय करण्यासाठी आली.हि त्या वेळची गोष्ट आहे जेव्हा पाकिस्तान आणि बांगलादेश हे भारताचे भाग होते.भातात हा मागास देश कारणाने येथे गरीब लोक राहत होते याचा फायदा इंग्रजानी घेतला.इंग्रजानी त्यांना कमी वेतन देऊन काम करून घ्यायला सुरवात केली. या गरिबांना जर पैसे पाहिजे असतील तर ते त्यांना कर्ज सुद्धा देत असत पण त्यांचा या मागचा हेतू हा वेगळा होता. भारतातील गरिबांना कर्ज द्यायच आणि ते कर्ज फेडू शकत नव्हते मग त्यांना गुलाम करायचं हा त्यांचा मुख्य उद्धेश्य होता. या इंग्रजानी भारतातील काही राजे लोकांना सुद्धा मदत करायला सुरवात किती आणि त्यांची मुस्कट दाबी केली. काही राजांना तर धोक्याने हरविले.हळूहळू इंग्रजानी भारतात आलेले सैन्य सुद्धा वाढविले आणि कालांतराने संपूर्ण भारतावर आपले साम्राज्य निर्माण केले. भारत हा गुलामीच्या ओझ्याखाली दबला गेला होता.
इंग्रजांचे भारतीयावरील अत्याचार
संपूर्ण देशात सत्ता स्थापन केल्यावर इंग्रजानी भारतातील लोकावरती अत्त्याचार करायला सुरवात केली. उगाचच लोकांपासून कर गोळा करणे, त्यांच्या जमिनी हडपणे, जबरदस्ती धान्य गोळा करणे असे अनेक अत्त्याचार ते करू लागले जर कोणी त्यांच्या विरोधात बोलला तर त्याच्यावर गोळ्या घातल्या जात.त्यामुळे भारतीय हे भीतीच्या छायेत होते.
इंग्रजांविरोधात भारतीयांचा राग
इंग्रजांचा भारतीयांवर केला जाणार अत्याचार हा असह्य होता. त्यामुळे हा अत्याचार मोडीत काढायचा अशी भावना भारतीयांमध्ये वाढू लागली होती. त्यामुळे आझादीच्या मागणीने जोर पकडला होता. यामुळे अनेक दंगली अनेक युद्ध झाली. यावेळी भारतातील नेत्यांनमध्ये दोन भाग पडले होते एक जहालवादी त्यामध्ये प्रामुख्याने लोकमान्य टिळक, सुभाष चंद्र बोस असे काही लोक शामिल होते ज्यांना हे स्वतंत्र केवळ हिंसाचारानेच म्हणजे जशाच तसे या मार्गानेच मिळेल असे मत होते तर दुसरीकडे मावळवादी नेते या मध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय काँग्रेस पार्टीतील काही नेत्याचा समावेशही होतो या मध्ये प्रथम नाव महात्मा गांधींजी यांचे येते. त्यांचा विश्वास अहिंसेवरती होता. शांतीच्या मार्गाने हि स्वातंत्र मिळाविता येईल असे त्यांचे मत होते.
स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांचे महत्त्वाचे योगदान
भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे, दादा भाई नौरोजी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या प्रसिद्ध नेत्यांनी ब्रिटिशांविरुद्ध निर्भयपणे लढा दिला. भारतातील ब्रिटिश राजवटीपासून मुक्त होण्यासाठी त्यांच्यापैकी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. यामध्ये भगत सिंग ,सुखदेव ,राजगुरू, शिरीषकुमार यांचा मोलाचा वाटा आहे.भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात त्यांचे योगदान आणि प्रयत्न कायम लक्षात ठेवले जातील.
भारताला स्वातंत्र्य प्राप्ती झाली
भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रयत्नांसमोर इंग्रजाना हार मानवी लागली. क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ मिळाले, शेवटी १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांना भारत सोडून जाण्यास भाग पाडले गेले. त्यामुळे दरवर्षी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.
आपण स्वातंत्र्य दिन का साजरा करतो ?
भारताने अनेक वर्षांच्या संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळवले. भारताला ब्रिटीशांपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळाले आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी पूर्ण स्वायत्तता प्राप्त झाली. म्हणूनच हा दिवस भारतात किंवा परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाच्या हृदयात खूप महत्वाचा आहे. १५ ऑगस्ट २०२१ रोजी भारताने स्वातंत्र्याची ७४ वर्षे पूर्ण केली.आणि या वर्षी हा स्वातंत्र्य दिवस ७५ वा स्वातंत्र्य दिवस (अमृत महोत्त्सव)आहे.हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या लढ्यांची आठवण करून देतो आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी बलिदान दिले. आपल्या वीरांनी ज्या वेदना सहन केल्या त्या आपल्याला आठवण करून देतात की आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो ते लाखो लोकांचे रक्त सांडून मिळवले आहे. तसेच भारतातील प्रत्येक नागरिकामध्ये देशभक्तीची भावना जागृत करते. हे वर्तमान पिढीला त्यावेळच्या लोकांच्या संघर्षांना जवळून समजून घेते आणि त्यांना भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांशी परिचित करते.
स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व
स्वातंत्र्य दिन लोकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करतो. हे लोकांना एकत्र करते आणि त्यांना असे वाटते की आपण अनेक भिन्न भाषा, धर्म आणि सांस्कृतिक मूल्ये असलेले एक राष्ट्र आहोत. विविधतेत एकता हे भारताचे मुख्य सार आणि सामर्थ्य आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो, जिथे सत्ता सामान्य माणसाच्या हातात आहे.
15 ऑगस्ट ही तारीख भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी का निवडली ?
तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी १५ ऑगस्ट हीच तारिख का निवडली गेली या विषयी अनेक मत मतांतरे आहेत. पण खरे पाहता १९४२ मध्ये गांधीजींनी भारत छोडो हे आंदोलन चालू होते. त्यांनी त्यावेळी एक नारा दिला होता करा किंवा मरा.त्यामुळे इंग्रजांवरती दबाव वाढला होता.त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन हा भारताचा शेवटचा व्हाइसरॉय होता त्यांनी ३० जून १९४८ पर्यंत भारताची सत्ता भारतीय लोकांच्या हाती सोपविण्याचे ठरविले होते.
१९४५ ऑगस्ट मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवरती बॉम्ब टाकले गेले होते त्यामुळे जपान हे मित्र राष्ट्रांना शरण आले होते. या घटनेला ऑगस्ट १९४७ ला दोन वर्ष पूर्ण होत होती तसेच माउंटबॅटन याच्या वरचा दबाव सुद्धा वाढ होता.दुसरीकडे गांधी आणि जिना यांच्यातील वाद सुद्धा शिगेला पोहचला होता. एकंदरीत हि परिस्तिती इंग्रजांसाठी दबाव पूर्ण होती त्यामुळे माउंटबॅटन याने एक वर्ष अगोदरच म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय लोकांच्या हाती भारताची सत्ता बहाल केली. या सर्व कारणांमुळे १५ ऑगस्ट हीच तारीख भारतीय स्वातंत्र्यासाठी निवडली गेली होती.
स्वातंत्र्यानंतर भारतातील परिस्थिती आणि राज्यघटनेची स्थापना
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाला पण भारतचा राज्य कारभार चालविण्यासाठी आवश्यक अशी घटना भारताकडे नव्हती. त्यामुळे भारत समोर अशी घटना तयार करण्याचा महत्वाचा प्रश्न होता.
भारतीय घटना तयार करण्यासाठी एक मसुदा समितीची स्थापना करण्यात आली.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली हि समिती घटनेचे काम करू लागली तब्बल २ वर्ष ११ महिने १७ दिवस या समितीने मेहनत करून एक आदर्श अशी राज्यघटना तयार केली. हि राज्य घटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आली म्हणून हा दिवस संविधान दिवस म्हणून ओळखला जातो. तसेच हि भारतीय राज्यघटना २६ जानेवारी १९५० पासून ती देशात अमलात आणली गेली. म्हणूनच हा दिवस प्रजाकसत्ताक दिन या नावाने ओळखला जातो.
हे सुद्धा नक्की वाचा :
