माझी आई मराठी निबंध | Mazi Aai Marathi Nibandh
या लेखाच्या माध्याद्वारे आपण माझी आई मराठी निबंध Mazi Aai Marathi Nibandh कसा लिहायचा हे माहीत करून घेणार आहोत. अनेक शाळांमध्ये आणि परीक्षेमध्ये माझी आई या विषयावर निबंध लेखन विचारला जातो. हा लेख वाचून तुम्ही परीक्षे मध्ये चांगल्या प्रकारे निबंध लेखन करू शकाल. आणि जास्तीत जास्त गुण मिळवू शकाल. {tocify} $title={TABLE OF CONTENT} माझी आई मराठी निबंध 1 ली आणि 2 री मी माझ्या आईवर खूप प्रेम करते. आई ही नेहमी आपल्या सुख-दुःखात सोबती असते आणि संपूर्ण जगात सर्वात जास्त आपल्यावर प्रेम करते. माझी आई माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. ती मला समजून घेते आणि माझ्या समस्या सोडवण्यास मला मदत करते. आई ही आपली पहिली गुरू असते. आपल्या खाण्यापासून ते पिण्यापर्यंत सर्व गोष्टींची काळजी आई घेते. आईलाही कळतं की तिचं मूल कधी दु:खी असतं आणि कधी नसतं. ती आपल्याला जन्म देते आणि आपल्याला या सुंदर पृथ्वीवर आणते. आईच आपल्याला चांगल्या-वाईटाचे ज्ञान देते. आपल्या पुराणात आईची तुलना देवाशी केली आहे. आई आपल्यासाठी पूजनीय आहे. आपण सर्वांनी आपल्या आईचा आदर केला पाहिजे. कारण वाईट प्रसंगी सर्वजण आपली साथ सोडून जातात त...