सतत होणाऱ्या लोडशेडींग मुळे लोक त्रस्त आहेत. लोडशेडींग मुळे लोकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहे. यावरती उपाय म्हणून सरकारने एक योजना चालू केली आहे. त्या योजनेचे नाव आहे सोलर रूफटॉप योजना Solar Rooftop Yojana. या आर्टिकल मधून आपण सोलर रूफटॉप योजना काय आहे तसेच तुम्ही सोलर रुफटॉप योजने चा लाभ घेण्यासाठी कसा अर्ज करावा आणि सोलर रूफटॉप योजना पासून तुम्हाला काय लाभ मिळेल याची माहिती आपण घेणार आहोत. त्याच बरोबर आपण या आर्टिकल मधून सोलर रूफटॉप योजना (Solar Rooftop Subsidy Yojana) चे लाभ, उद्देश, पात्रता, अर्ज प्रक्रिया, आणि आवश्यक कागदपत्रे यांची सुद्धा माहिती आपण या आर्टिकल मधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला हा लेख पूर्ण वाचणे आवश्यक आहे.
{tocify} $title={TABLE OF CONTENTS}
सोलर रूफटॉप योजना काय आहे?
भारत सरकारच्या नवीनीकरण ऊर्जा मंत्रालय द्वारे सोलर रुफटॉप योजना सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत देशातील कोणताही नागरिक आपल्या घरावराती सोलर पॅनल मोफत लावू शकतो. कारण या योजनेअंतर्गत घरावरती सोलर पॅनल लावण्यासाठी सरकार 100% आर्थिक सहाय्य देणार आहे. जर आपणास सोलर पॅनल बसवायचे असेल तर 1 किलोवॅट सौर पॅनेल बसविण्यासाठी 10 चौरस मीटर जागा आवश्यक असते. आणि तुम्ही बसविलेल्या सोलर पॅनल चा लाभ जवळ जवळ 25 वर्षे सहज घेऊ शकता. सोलर पॅनल बसविण्यासाठी झालेला खर्च हा 5 ते 6 वर्षामध्ये सहज भरून जातो. त्यामुळे तुम्ही 19 ते 20 वर्ष मोफत वीज वापरू शकता. त्यामुळे हे सोलर पॅनल बसविण्याची जमेची बाजू आहे.
सोलर रूफटॉप योजनेचा उद्देश
सोलर रूफटॉप योजना (Solar Rooftop Yojana) चा मुख्य उद्देश हा लोकांना या योजनेअंतर्गत मोफत वीज पुरविणे हा आहे. या योजनेचा लाभ घेतल्याने लोकांच्या खर्चात बचत होणार आहे. सोलर रूफटॉप योजनेचा लाभ घेतल्याने लोकांच्या खर्चात जवळपास 30 ते 50 टक्के पर्यंत बचत होणार आहे. त्यामुळे लोकांच्या खर्चात बचत करून लोकांना आर्थिक स्थैर्य देणे हा सुद्धा या योजनेचा उद्देश म्हणता येईल.
सोलर रूफटॉप योजना पासून मिळणारे लाभ
सोलर रुफटॉप योजनेमुळे लोकांना मोफत वीज उपलब्ध होईल.
सोलर रुफटॉप योजनेमुळे लोकांचा विजेवर होणार खर्च जवळ जवळ 30 ते 50 टक्के पर्यंत कमी होईल.
सोलर रुफटॉप योजनेमुळे पर्यावरपूरक विजेची निर्मिती होईल. त्यामुळे पर्यावरण सुरक्षित राहण्यास मदत होईल.
जवळपास 25 वर्ष या योजनेचा लाभ घेता येईल. आणि या योजनेसाठी होणारा खर्च हा 5 किंवा 6 वर्षांत भरावा लागेल.त्यानंतर 19-20 वर्षांसाठी वीज मोफत मिळू शकते.
सोलर रूफटॉप योजना साठी आवश्यक कागदपत्रे
मोफत सौर पॅनेल योजनेची Solar Rooftop Subsidy Yojana नोंदणी करण्यासाठी, उमेदवारांना काही कागदपत्रे देखील आवश्यक आहेत, त्या सर्व कागदपत्रांची माहिती लेखात खाली दिली आहे. उमेदवारांना ही सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवावी लागतात. अर्जदाराकडे जर कोणतीही कागदपत्रे नसल्यास ते योजनेचा लाभ घेण्यास पात्र मानले जाणार नाहीत.
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- ज्या छतावर सोलर पॅनल बसवायचे आहेत त्या छताचे फोटो.
- उत्पन्न प्रमाणपत्र
- वीज बिल
- रेशन कार्ड
- पॅन कार्ड
- मोबाइल नंबर
- बँक खाते क्रमांक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
सोलर रूफटॉप योजना साठी आवश्यक पात्रता
मोफत सौर पॅनेल योजने करीत सर्व प्रकारचे शेतकरी पात्र ठरतात. जर तुमच्या परिसरात विजेची समस्या असल्यास तुम्ही सोलर पॅनलसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता. आर्थिकदृष्ट्या कमकुवत लाभार्थी योजनेचा लाभ घेऊ शकतात. थोडक्यात सर्व प्रकारचे लोक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतात.
सोलर रूफटॉप योजना अंतर्गत मिळणारी सबसिडी
या योजनेंतर्गत Solar Rooftop Yojana तुम्हालाही छतावर सोलर पॅनल बसवायचे असेल, तर 3 किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून 40 टक्के सबसिडी दिली जाते.
सोलर रुफटॉप सबसिडी योजनेंतर्गत 3 किलोवॅट ते 10 किलोवॅट क्षमतेचा सोलर रुफटॉप प्लांट उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून 20 टक्के सबसिडी दिली जाईल.
सोलर रूफटॉप योजना साठी आवश्यक बजेट कसे तपासावे?
सोलर रूफटॉप योजना साठी तुम्ही बजेट तयार करत असाल तर तुम्ही सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वरती जाऊन Solar Rooftop Calculator या लिंकवरती क्लिक करा.
त्यानंतर तुम्ही आपले राज्य निवडा.
त्यानंतर कस्टमर कॅटेगरी निवडा, जर तुम्हाला घरासाठी सोलर पॅनल हवा असेल तर RESIDENTIAL निवडा.
त्यानंतर तुमचे बजेट सेट करा आणि कॅल्क्युलेटर वरती कॅल्क्युलेट करा.
या मुळे तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील हे समजेल, त्यानंतरच तुम्ही अर्ज करा.
सोलर रूफटॉप योजनेची अर्जप्रक्रिया
जर आपणास सोलर रूफटॉप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. सोलर रूफटॉप योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
सर्व प्रथम अर्ज करण्यासाठी, तुम्हाला सोलर रूफटॉप सबसिडी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
👉 अधिकृत वेबसाईट 👈
वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुमच्यासमोर होमपेज ओपन होईल.
होम पेज ओपन झाल्यावर तुम्हाला Apply For Solar Rooftop या पर्यायावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल
या पेज वरती तुम्हाला तुमच्या राज्यानुसार अधिकृत वेबसाइट निवडावी लागेल. निवड केल्यानंतर, तुम्हाला Apply Online या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
Apply Online या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, नोंदणी फॉर्म तुमच्या समोर उघडेल.
तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमची महत्त्वाची कागदपत्रे जोडावी लागतील.
त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
अशा प्रकारे तुम्ही सोलर रूफटॉप योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकता.
सोलर रूफटॉप योजने अंतर्गत सोलर पॅनल कसे लावावे?
सोलर रूफटॉप सबसिडी योजना (Solar Rooftop Subsidy Yojana) घरामध्ये सोलर रूफटॉप बसवण्यासाठी प्रथम तुम्हाला स्थानिक वीज कंपन्यांकडून परवाना घेणे आवश्यक आहे.
या योजनेंतर्गत वीज कंपन्यांसोबत वीज खरेदी करार केल्यानंतर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रति किलोवॅटची एकूण गुंतवणूक 60-80 हजार रुपये असेल.
सोलर रूफटॉप सबसिडी योजनेत राज्य सरकार यासाठी विशेष ऑफरही देत आहे. सोलर पॅनल लावल्याने घरामध्ये विजेवर चालणारी उपकरणे वापरणे सोयीस्कर होईल. विजेवर होणार खर्च कमी होईल.
सोलर रूफटॉप योजनेचा हेल्पलाईन नंबर काय आहे?
सोलर रूफटॉप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी किंवा या योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही या हेल्पलाइन क्रमांक 1800 180 3333 वर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपर्क आवश्यक माहिती देखील मिळवू शकता आणि तुमची समस्या सहजपणे सोडवू शकता.
