विनायक मेटे मृत्यूची बातमी पाहिल्यानंतर आणि संपूर्ण देशभर हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील प्रत्येकाच्या मनात एक चांगला नेता गमाविल्याची भावना आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण विनायक मेटे यांचे निधन कसे झाले आणि विनायक मेटे यांचा जीवन परिचय Vinayak Mete Biography In Marathi याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्याच बरोबर आपण या लेखामधून आपण विनायक मेटे यांचा परिवार Vinayak Mete Family, विनायक मेटे यांचा राजकीय प्रवास या विषयी सुद्धा माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा.
{tocify} $title={अनुक्रमणिका}
विनायक मेटे कोण आहेत? (Who is Vinayak Mete?)
विनायक मेटे हे भारतीय राजकारणातील एक मोठे राजकीय नेते आहेत. महाराष्ट्रातील शिवसंग्राम या पक्षाचे विनायक मेटे हे प्रमुख होते. तसेच मराठा आरक्षण आंदोलनात भाग घेणाऱ्या नेत्यांपैकी मेटे हे एक प्रमुख नेते होते. त्याच प्रमाणे मुंबई मध्ये अरबी समुद्रात होत असलेल्या शिवस्मारक समितीचे विनायक मेटे हे अध्यक्ष होते.
विनायक मेटे यांचे बालपण (Childhood of Vinayak Mete)
विनायक मेटे यांचा जन्म 30 जून 1970 साली एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे पूर्ण नाव विनायक तुकाराम मेटे असे आहे. समाजातील दीन दुबळ्या लोकांबद्दल त्यांना लहानपणापासून कळवळा होता. ज्यांच्यावर अन्याय होतो आहे आणि त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमी धडपडत असत.आणि हे आपल्याला त्यांच्या राजकीय कामावरून सुद्धा लक्षात येते. केज तालुक्यातील राजेगाव या छोट्याशा गावात जन्मलेल्या विनायक मेटे यांचा भाजी विक्रेता, पेंटर, शिपाई ते राजकारणी हा प्रवास प्रेरणादायी आहे.
विनायक मेटे यांचे शिक्षण (Vinayak Mete Education)
केज तालुक्यात राजेगावातच मेटे यांचे प्राथमिक शिक्षण झाले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्या नंतर पुढचे शिक्षण विनायक मेटे यांनी नाहोलीत घेतले. विशेष म्हणजे विनायक मेटे दहावीत असताना संपूर्ण शाळेत केवळ दोनच विद्यार्थी पास झाले होते. त्या दोन विद्यार्थ्यांनपैकी विनायक मेटे हे एक होते. दहावी पास झाल्या नंतर पुढील महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी विनायक मेटे यांनी बीडच्या केएसके महाविद्यालयात प्रवेश घेतला.विनायक मेटे यांनी बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
विनायक मेटे यांचा परिवार (Vinayak Mete Family)
विनायक मेटे यांचे वडील तुकाराम मेटे हे एक शेतकरी होते. विनायक मेटे यांच्या परिवारात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. विनायक मेटे यांच्या पत्नीचे नाव ज्योती मेटे असे आहे. त्यांच्या मुलाचे नाव आशुतोष विनायक मेटे तर मुलीचे नाव आकांक्षा विनायक मेटे असे आहे. तसेच विनायक मेटे यांनी दीन भाऊ देखील आहेत. त्यांचे नाव रामहरी तुकाराम मेटे आणि त्र्यंबक तुकाराम मेटे असे आहे.
विनायक मेटे यांचा राजकीय प्रवास (Vinayak Mete Political Career)
पैशाची कमतरता दूर करण्यासाठी मुंबईत आलेल्या विनायक मेटे यांचा संबंध मराठा महासंघाशी आला आणि तेथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरवात झाली.
1995 साली प्रथमच त्यांनी विधान परिषदेवर संधी मिळाली. त्यानंतर विनायक मेटे यांच्या नावे पाच वेळा विधान परिषदेचे सदस्यत्व मिळविण्याचा रेकॉर्ड आहे.
विनायक मेटे हे 1996 साली भाजपच्या सरकारमध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त झाले.
दरम्यानच्या काळात त्यांनी महाराष्ट्र लोकविकास पार्टी या पक्षाची स्थापना केली. त्यावेळी त्यांचा संबंध शरद पवार यांच्याशी आला.पुढे त्यांनी आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षात विलीन केला.
राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना उपाध्यक्ष पद मिळाले होते. त्याच दरम्यान त्यांनी विधान परिषदेवर दोन वेळा आपली उमेदवारी कायम केली होती. 2014 पर्यंत ते राष्ट्रवादी पक्षाशी जोडले होते.
2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळी ते भाजपशी जोडले गेले. त्या वेळी पक्षांतरामुळे त्यांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द झाले होते. परंतु त्यांचे काम आणि लोकांमध्ये असलेली त्यांची ओढ बघून भाजपने पुन्हा त्यांना संधी दिली.
2001 मध्ये विनायक मेटे यांनी शिसंग्राम ही संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षण संदर्भात लढाई देण्याकरिता त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र भर फिरून आपल्या कार्यकर्त्यांची एक मजबूत संघटन तयार केले.
मराठा आरक्षणाचा मुद्धा सर्व देशभर चर्चेचा विषय आहे. या संदर्भात अनेक आंदोलन झाली. विनायक मेटे हे मराठा आरक्षण आंदोलनातील एक प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने झाली.
तसेच अरबी समुद्रात होत असलेले भव्य शिवस्मारक समितीचे विनायक मेटे हे अध्यक्ष होते.
विनायक मेटे यांचा अपघात (Vinayak Mete Accident)
विनायक मेटे हे मराठा आरक्षण संदर्भातील बैठकीसाठी बीड हून मुंबईला जात होते पण सकाळी साडेपाच च्या सुमारास मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. याच अपघातात विनायक मेटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि देशातील एक मोठा नेता हरपला.
एकंदरीत विनायक मेटे यांचं 52 वर्षाचं आयुष्य हे प्रत्येक माणसाला प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या आयुष्यातून प्रत्येकाला चागलं शिकता येईल. त्यासाठी त्यांच्यातील समाजाप्रती तळमळ, निष्ठा, आणि सतत लढण्याची जिद्द आणि चिकाटी प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे हीच त्यांच्यासाठी आदरांजली ठरेल.
FAQs
1) विनायक मेटे कोण होते?
विनायक मेटे हे भारतीय राजकारणातील एक राजकीय नेते होते.
2) विनायक मेटे यांचे वय किती होते?
विनायक मेटे यांचे वय 52 वर्ष होते.
3) विनायक मेटे यांच्या गावाचे नाव काय?
केक तालुक्यातील राजेगावं हे विनायक मेटे यांचे गाव आहे.
4) विनायक मेटे यांच्या पत्नीचे नाव काय?
ज्योती मेटे या विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत.
5) विनायक मेटे यांच्या मुलांची नावं काय?
विनायक मेटे यांच्या मुलाचे नाव आशुतोष विनायक मेटे तर मुलीचे नाव आकांक्षा विनायक मेटे असे आहे.
