रेशन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारने रेशन धारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, या निर्णयानुसार ज्यांच्या उत्पन्नात वाढ होऊनही जे लोक रेशन धान्य घेत आहेत अशा रेशांधराकांचे धान्य आता बंद होणार आहे.
1 सप्टेंबर पासून सरकारमार्फत शिधापत्रिकांची पडताळणी करण्यासाठी सुरावात होणार आहे. त्यानुसार ज्यांचे उत्पन्न वाढूनही जे लोक रेशन धान्याचा लाभ घेत आहेत अशा रेशन धारकांवर कारवाई होणार आहे.
कौटुंबिक परिस्थिती सुधारून सुद्धा अनेक लोक स्वस्त दरातील रेशन धान्य घेत आहेत. स्वस्त किमतीतील धान्य घेण्यासाठी अनेक लोक जुन्या रेशन कार्डचा वापर करत आहेत. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे अनेक लोक स्वस्तातील रेशन धान्य घेऊन ते धान्य खाजगी लोकांना विकतात. तसेच अनेक लोक स्वस्त दरातील धान्य घेऊन आपल्या जनावरांनाही ते घालतात. त्यामुळे जे गरजू लोक आहेत त्याच्यापर्यंत हे धान्य पोहचत नाही.
अशा प्रकारे हे लोक धान्य विकून किंवा त्याचा गैरवापर करून सरकारची फसवणूक करीत आहेत. त्यावरतीच आळा घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारने केलेल्या सर्वेक्षणातून जे लोक खरंच गरजू आहेत अशा लोकांपर्यंत हे स्वस्त दरातील रेशन धान्य पोहचण्यास मदत होईल.
जाणून घ्या: RBI चे बदललेले FD विषयक नियम
फौजदारी गुन्हे होणार दाखल
जे लोक आपले उत्पन्न वाढूनही स्वस्त दरातील रेशन धान्य घेत आहेत अशा रेशन धारकांवराती गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
1 सप्टेंबर पासून धान्य निरीक्षकांमार्फत गावोगावी शिधापत्रिकांची पडताळणी केली जाणार आहे. या मध्ये आढळणाऱ्या दोषी रेशन धाराकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील.
तसेच शासनाची फसवणूक केली म्हणून त्यांच्याकडून मागील धान्याची वसुली केली जाणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे स्वस्त दरातील रेशन धान्य योग्य आणि गरजू लोकांपर्यंत पोहचेल अशी आशा लोक व्यक्त करत आहेत. त्यामुळे हा निर्णय एक सरकारचा एक चांगला निर्णय असल्याचे अनेक लोकांचे म्हणणे आहे.
