अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय ? | अफिलिएट मार्केटिंग कसे करावे | अफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कसे कमवावे | Affiliate Marketing In Marathi | How to do affiliate marketing in Marathi | How To Make Money From Affiliate Marketing
आजच्या आधुनिक युगात तंत्र ज्ञानाचा वापर इतका वाढला आहे कि तंत्रज्ञानाद्वारे पैसे कमवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. आता तुम्ही इंटरनेटचा वापर करून घर बसल्या पैसे कमवू शकता. बर्याच लोकांना अजूनही इंटरनेट वरून पैसे कमवण्याबद्दल माहिती नाही आणि काही लोकांचे असे मत आहे कि इंटरनेट वरून जास्त पैसे कमवता येत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग बद्दल सांगणार आहोत,ज्याच्या माध्यमातून आपण लाखो रुपये कमाऊ शकतो.
आज इंटरनेटच्या मदतीने पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत.परंतु माझ्या माहितीनुसार अफिलिएट मार्केटिंग मधून आपण जेवढे पैसे कमवू जे इतर कोणत्याही मार्गाने करणे कदाचित कठीण ठरेल. त्याकरिता योग्य मार्गदर्शन आणि माहितीची गरज आहे. म्हणूनच या लेखामधून आपण एफिलिएट मार्केटिंग काय आहे आणि कसे सुरू करावे आणि त्यामधून पैसे कसे कमवावे हे पाहणार आहोत. त्याकरिता हा लेख शेवटपर्यंत लक्षपूर्वक वाचा.
अफिलिएट मार्केटिंग खूप सोपे आहे कारण ते इंटरनेट वापरणारा प्रत्येक जण करू शकतो.विशेषतः ज्यांचा ब्लॉग आहे आणि तो ऍडसेन्स ने अप्रूव्ह होत नाही आहे तर आपण अफिलिएट मार्केटिंग हा पर्याय नक्कीच वापरू शकता. जे लोक अफिलिएट मार्केटिंग आपल्या ब्लॉगद्वारे करतात त्यांच्या म्हणण्यानुसार आपण गूगल ऍडसेन्स पेक्षा जास्त अफिलिएट मार्केटिंग मध्ये पैसे जास्त कमावू शकतो.
{tocify} $title={Table of Contents}
Affiliate Marketing म्हणजे काय ?
बर्याच प्रोग्राम आपले सामान ऑनलाइन पद्धतीने विकतात.अशा कंपन्या अफिलिएट मार्केटिंग हा प्रोग्राम चालवतात .जसे कि अमेझॉन, फ्लिपकार्ट, सॅनडिल, क्लिकबँक, ईबे इत्यादी,यांच्या अफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम मध्ये सामील होऊन, कोणतीही व्यक्ती त्या वेबसाइटची कोणतीही वस्तू विकू शकते.त्यानंतर त्याला कमिशन मिळते. हे कमिशन आपण ज्या वस्तूंची विक्री करून देऊ अशा वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगळे असते.या प्रक्रियेला अफिलिएट मार्केटिंग म्हणतात.
आज, जर आपल्याला असेच काही खरेदी करायचे असेल, तर आपल्याकडे ऑनलाइन आणि ऑफलाईन असे दोन पर्याय आहेत. आज ऑनलाईन खरेदीचा ट्रेंड आहे. कारण आज अनेकांना ऑनलाइन वस्तू खरेदी करणे आवडते आणि आजकालच्या जलद जीवनामध्ये लोकांकडे वेळेचा अभाव आहे त्याच प्रमाणे ऑफलाईन बाजाराच्या तुलनेत ऑनलाईन वस्तूंची किंमतही कमी असते. त्यामुळे लोक आजकाल ऑनलाईन खरेदी करणे जास्त सोयीस्कर समजतात.
म्हणूनच ज्या कंपनीला आपला व्यवसाय ऑनलाइन वाढवायचा आहे तो कंपनी अफिलिएट मार्केटिंग हा प्रोग्राम चालवते. जेणेकरून या माध्यमातून तो शक्य तितके आपले उत्पादन विकू शकेल. म्हणूनच ती अफिलिएट मार्केटिंग द्वारे लोकांना तिच्याशी जोडते. आणि त्या लोकांद्वारे वस्तूची विक्री झाल्यास त्या लोकांना कमिशन हि दिले जाते.
Affiliate Marketing कशा प्रकारे काम करते ?
अफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी, आपल्याला प्रथम अफिलिएट प्रोग्राम मध्ये सहभागी व्हावे लागते. त्यासाठी आपल्याला इंटरनेट वरती विविध कंपन्यांचे अनेक अफिलिएट प्रोग्राम मिळतील, आपण ज्या कंपनीचा अफिलिएट प्रोग्राम चांगला आहे त्याद्वारे चांगले कमिशन मिळत असेल त्या कंपनीचा अफिलिएट प्रोग्राम निवडून आपण अफिलिएट मार्केटिंग करू शकता.
त्यानंतर तुम्हाला त्या वेबसाईटवरील उपलब्ध असलेली कोणतीही वस्तू विकण्यासाठी त्या वस्तूची लिंक तयार करावी लागेल. आणि मग त्याचा ऑनलाईन प्रचार करावा लागेल आणि जेव्हा कोणी त्या लिंकवर क्लिक करून एखादे उत्पादन विकत घेईल तेव्हा आपल्याला कमिशन मिळेल.
ज्याप्रमाणे सेल्समनला उत्पादन विकण्यासाठी कंपनीकडून कमिशन दिले जाते, त्याचप्रमाणे एफिलिएट मार्केटिंग मध्ये उत्पादन विकण्यासाठी कमिशन मिळते. त्यामुळे जर आपल्याकडे कोणतेही उत्पादन विकण्याचे कौशल्य असेल तर आपल्यासाठी पैसे कमवण्यासाठी हे एक चांगले व्यासपीठ आहे.
अफिलिएट मार्केटिंग संबंधित काही महत्त्वाच्या संज्ञा
अफिलिएट मार्केटिंग मध्ये अशा काही संज्ञा वापरल्या जातात, ज्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती असणे अत्यंत महत्वाचे आहे. तर आपण अशा काही संज्ञाविषयी माहिती मिळवूया.
अफिलिएट (Affiliate)
अफिलिएट अशा व्यक्तींना असे संबोधले जाते जे, अफिलिएट प्रोग्राम जॉईन करतात आणि ब्लॉग किंवा वेबसाइट सारख्या स्त्रोतांवर त्यांच्या उत्पादनांचा प्रचार करतात.
अफिलिएट मार्केटप्लेस (Affiliate Marketplace)
ऑनलाईन व्यापार करणाऱ्या अशा काही कंपन्या आहेत ज्या त्यांच्या उत्पादनाच्या वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये अफिलिएट प्रोग्राम चालवत असतात त्याला अफिलिएट मार्केटप्लेस असे म्हणतात. या मध्ये कंपन्या त्यांच्या वेगवेगळ्या कॅटेगरी नुसार उत्पादन विक्रीचे कमिशनही वेगळ्या प्रमाणात असते.
अफिलिएट ID (Affiliate ID)
हि एक युनिक आयडी आहे जो साइन अप केल्यावर प्राप्त होते . प्रत्येक अफिलिएट प्रोग्राम मध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीला हि आयडी एका ओळख पत्राप्रमाणे काम करते, जी विक्रीमध्ये माहिती गोळा करण्यास मदत करते. या आयडीच्या मदतीने तुम्ही तुमच्या अफिलिएट खात्यात लॉग इन करू शकता.
अफिलिएट लिंक (Affiliate Link)
अफिलिएट लिंक हि प्रॉडक्ट्स चे प्रोमोशन करण्यासाठी अफिलिएट ला दिली जाते. या लिंक वरती क्लिक केल्यावर आपण एका विशिष्ट प्रॉडक्ट्स पर्यंत पोहचतो आणि ते प्रॉडक्ट आवडले तर आपण खरेदी करतो. या लिंक मुळे अफिलिएट मार्केटिंग करणारी कंपनी सेल्स ट्रॅक करते.
कमिशन (Commission)
आपण ज्या प्रॉडक्ट चा प्रचार केला आहे त्या प्रॉडक्ट च्या यशस्वी विक्री नंतर आपल्याला त्या प्रॉडक्ट च्या किमतीच्या काही प्रमाणात रक्कम दिली जाते त्यालाच अफिलिएट कमिशन असे म्हणतात.हे कमिशन वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स नुसार बदलत असते.
लिंक क्लोकिंग (Link Clocking)
जेव्हा आपण अफिलिएट लिंक तयार करतो तेव्हा ते लिंक मोठे आणि फारसे प्रभावी नसते.त्यामुळे अशा लिंक शॉर्टनर चा वापर करून छोट्या केल्या जातात त्यालाच लिंक क्लोकिंग असे म्हणतात.
अफिलिएट मैनेजर (Affiliate Manager)
काही एफिलिएट प्रोग्राम्समध्ये, काही लोकांना अफिलिएट ना मदत करण्यासाठी आणि त्यांना योग्य टिप्स देण्यासाठी नियुक्त केले जाते, त्यांना एफिलिएट मॅनेजर म्हणतात.
पेमेंट मोड (Payment Mode)
पेमेंट मिळवण्याच्या पद्धतीला पेमेंट मोड म्हणतात. याचा अर्थ असा की ज्या माध्यमातून तुम्हाला तुमचे कमिशन दिले जाईल ते. वेगवेगळे अफिलिएट प्रोग्राम वेगवेगळे पेमेंट मोड देतात. जसे Cheque, Wire Transfer, PayPal इ.
पेमेंट थ्रेशोल्ड (Payment Threshold)
अफिलिएट मार्केटिंग मध्ये, अफिलिएट ना काही प्रमाणात कमीतकमी विक्री केली जाते तेव्हा त्यांना काही कमिशन दिले जाते. ही विक्री केल्यानंतरच तुम्ही पेमेंट मिळवू शकता. याला पेमेंट थ्रेशोल्ड म्हणतात. वेगवेगळ्या प्रोग्रामच्या पेमेंट थ्रेशोल्डची रक्कम वेगळी आहे.
अफिलिएट मार्केटिंग पासून पैसे कसे कमवायचे ?
आज अनेक लोक संलग्न विपणनाद्वारे भरपूर पैसे कमवत आहेत.
तुम्हाला सुद्धा याद्वारे उत्तम उत्पन्न मिळवायचे आहे का मग जाणून घ्या… अफिलिएट मार्केटींग पासून पैसे कसे कमवायचे
अशा अनेक कंपन्या आहेत जिथे तुम्ही अफिलिएट मार्केटींग पासून पैसे कमवू शकता जसे - Affiliate Marketing Flipkart, Affiliate Marketing Amazon, Godaddy, Snapdeal इत्यादी कंपन्या अफिलिएट मार्केटींग प्रदान करतात.
एफिलिएट मार्केटींगमधून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर अकाऊंट बनवावे लागेल, तिथे तुम्हाला पैसे कसे घ्यायचे आहेत ते निवडावे लागेल.
जसे तुमच्या बँक खात्यात किंवा Paypal वरून किंवा इतर कोणत्याही प्रकारे, अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या कमिशन तुमच्या निवडलेल्या पद्धतीने मिळतात.
Affiliate Marketing कसे करावे ?
आता सर्वात मोठा प्रश्न येतो की अफिलिएट मार्केटिंग कसे करावे. कारण यासाठी तुम्हाला उत्पादनाचा प्रचार करावा लागेल. जेणेकरून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि तुम्ही ते उत्पादन विकू शकाल. तर आता आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही अफिलिएट मार्केटिंग करू शकता.
ब्लॉगिंग (Blogging)
ब्लॉगिंग हा अफिलिएट मार्केटिंग करण्याचा हा सर्वोत्तम पर्याय आहे, अनेक ब्लॉगर्स अफिलिएट मार्केटिंग करून पैसे कमवतात. तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लॉग तयार करून अफिलिएट मार्केटिंग देखील सुरू करू शकता.
आपल्या ब्लॉग निश नुसार आपण अफिलिएट प्रोग्राममध्ये सामील होऊन त्यांचा प्रचार करू शकता.
तुम्ही रिव्ह्यू लिहून एखाद्या उत्पादनाची जाहिरात करू शकता.
आपण आपल्या ब्लॉगच्या दर्शकांना ठराविक प्रॉडक्ट खरेदी करण्याची शिफारस करून प्रॉडक्ट जाहिरात करू शकता.
यु ट्यूब (YouTube)
अफिलिएट मार्केटिंग करण्याचा हा दुसरा सर्वोत्तम मार्ग आहे कारण आज लोकांना गुगल नंतर यूट्यूब पहायला आवडते. जिथे तुम्हाला खूप ट्रॅफिक मिळते, तिथे तुम्ही तुमच्या उत्पादनाचा प्रचार करू शकता.
व्हिडीओ बनवताना तुम्ही वापरत असलेल्या गोष्टींची संलग्न लिंक डिस्क्रिपशन बॉक्समध्ये दिली जाऊ शकते.
एखादे प्रॉडक्ट विकण्यासाठी तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवू शकता.
फेसबुक पेज आणि फेसबुक ग्रुप (Facebook Page And Facebook Group)
ही पद्धत ते लोक वापरू शकतात जे फेसबुकवर जास्त वेळ घालवतात. तसेच, ज्यांच्याकडे युट्यूब चॅनेल आणि ब्लॉग नाहीत ते स्वतःचे फेसबुक पेज आणि फेसबुक ग्रुप बनवून प्रॉडक्ट्स ची जाहिरात करू शकतात.
व्हाट्सअँप (WhatsApp)
जे लोक स्मार्टफोन वापरतात त्यांच्या फोनमध्ये नक्कीच व्हाट्सअँप असते. त्यामुळे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही व्हाट्सअँप वापरून अफिलिएट मार्केटिंग करू शकता.
ट्विटर (Twitter)
आपण ट्विटर वापरून अफिलिएट मार्केटिंग सुरू करू शकता. इथेही तुम्हाला खूप ट्रॅफिक मिळते. जर तुमच्या ट्विटरवर तुमचे चांगले फोल्लोवर्स असतील तर तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट्स च्या लिंकचा प्रचार तेथे करू शकता.
इंस्टाग्राम (Instagram)
अफिलिएट मार्केटिंग साठी इंस्टाग्राम हा देखील एक उत्तम मार्ग आहे. जर इंस्टाग्राम वरती आपले चांगले फोल्लोवर्स असतील तर इंस्टाग्राम मार्फत आपण अफिलिएट मार्केटिंग करून चांगले पैसे कमवू शकतो.
निष्कर्ष
आजच्या आधुनिक डिजिटल युगातील अफिलिएट मार्केटिंग हे पैसे कमविण्याचे एक उत्तम साधन आहे.अफिलिएट मार्केटिंग बद्दल थोडीफार माहिती आणि धैर्य जर आपल्यापाशी असेल तर आपण नक्कीच या मधून पैसे कमाऊ शकतो. आणि अफिलिएट मार्केटिंग हे करियर म्हणूनही निवडू शकता येईल.
