मित्रानो आपण या लेखामधून डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing In Marathi) बद्दल जाणून घेणार आहोत. डिजिटल मार्केटिंग हि सध्या वेगाने वाढणारी इंडस्ट्री आहे. आणि आजच्या आधुनिक युगामध्ये जर डिजिटल मार्केटिंग बद्दल आपणास काही माहित नसेल तर आपण खूप मागे आहेत. पण तुम्हाला आज या लेखामधून डिजिटल मार्केटिंग बद्दल संपूर्ण माहिती मिळणारे आहे त्यासाठी तुम्ही हे आर्टिकल शेवट पर्यंत नक्की वाचा.
{tocify} $title={Table of Contents}
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?
जर आपणास आपले प्रॉडक्ट्स किंवा सर्विसेस भरपूर लोकांपर्यंत पोहचवायचे असतील तर आपण जास्तीत जास्त लोकांना या बद्दल माहिती देण्यासाठी मार्केटिंग करतो तर अशाच प्रॉडक्ट्स आणि सर्विसेस ची मार्केटिंग डिजिटली करणे म्हणजे डिजिटल माध्यमांचा वापर करून ओंलीने करणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय.यालाच ऑनलाईन मार्केटिंग (Online Marketing) किंवा इंटरनेट मार्केटिंग (Internet Marketing) सुद्धा म्हणतात.
मार्केटिंग म्हणजे योग्य वेळेत योग्य लोकांपर्यंत पोहचणे.म्हणूनच आजच्या युगात आपल्याला आपल्या ग्राहकांशी अशा जागी कनेक्ट व्हावे लागेल जिथे ते जास्त वेळ घालवतात. आणि ती जागा आहे इंटरनेट.भारतात लगभग सगळ्या वयाचे लोक इंटरनेट चा वापर करतात. आणि दिवसेंदिवस यांची संख्या वाढतच आहे.मोठी कंपनी असो किंवा छोटी कंपनी प्रत्येक जण इंटरनेट वरून डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी उत्सुक आहे. ज्या प्रकारे मोठ मोट्या कंपन्या आपल्या प्रॉडक्ट्स ची जाहिरात मोठ मोठे पोस्टर्स, बॅनर, आणि पॅम्प्लेट च्या माध्यमातून करतात त्याच प्रमाणे अशा जाहिराती ऑनलाईन मार्केटिंग किंवा डिजिटल मार्केटिंग च्या माध्यमातून सुद्धा करता येते.
ऑफलाईन मार्केटिंग (Ofline Marketing) असो कि ऑनलाईन मार्केटिंग (Online Marketing) दोघांचाही मुख्या उद्देश्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे हा असतो. परंतु ऑफलाईन मार्केटिंग मध्ये प्रॉडक्ट्स च्या जाहिरातीसाठी जास्त खर्च करावा लागतो.परंतु ऑनलाईन मार्केटिंग मध्ये आपणास कमी पैशाच्या लागतीमध्ये जास्त लोकांपर्यंत पोहचता येते.
डिजिटल मार्केटिंगची गरज का आहे
डिजिटल मार्केटिंग किंवा ऑनलाईन मार्केटिंग डिजिटल माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा एक सोपा मार्ग आहे.जेव्हा स्मार्टफोन अस्तित्वात नव्हता तेव्हा लोक TV, वर्तमानपत्र, रेडिओ चा वापर जास्त करत होते.तेव्हा या ठिकाणी अनेक कंपन्या आपला प्रॉडक्ट्स च्या जाहिराती देऊन प्रचार करत असत. आणि लोक त्याच जाहिरातींना बघून बाजारातून वस्तू खरेदी करत असत.
परंतु आजच्या स्मार्टफोन च्या युगात अधिकतर लोक जास्त करून तरुण पिढी आपला पूर्ण वेळ फेसबुक, व्हाट्सअँप, ट्विटर, इंस्टाग्राम यावरती घालवतात. TV च्या बदली You Tube वरती विडिओ बघतात, रेडिओ च्या जागी वेगवेगळ्या अँप्स वरती गाणी ऐकतात आणि वर्तमानपत्राऐवजी ऑनलाईन ब्लॉग वाचतात.हेच कारण आहे कि अनेक कंपनी आपल्या प्रॉडक्ट्स च्या जाहिराती डिजिटल माध्यमातून करतात.आणि अशा जागी प्रचार करतात जिथे जास्त प्रमाणात इंटरनेट वापरकर्ते आहेत.
डिजिटल मार्केटिंग च्या माध्यमातून कंपनीला अधिक ग्राहकांपर्यंत आपला प्रॉडक्ट्स पोहचवणे शक्य होते.पूर्वी लोकांचे बाजारात जाऊन सामान पसंत करणे आणि ते सामान खरेदी करण्यासाठी जेवढा वेळ लागायचा आता त्यापेक्षाहि कमी वेळेत लोक घरी बसून इंटरनेट च्या माध्यमातून आपल्याला आवडलेल्या वस्तूंची खरेदी करतात.
डिजिटल मार्केटिंग पासून केवळ ग्राहकांनाच नाही तर व्यापाऱ्यांनाही व्यापार करण्यासाठी फायदा होत आहे.कारण यामुळे कमी वेळेत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचणे शक्य होत आहे.ज्यामुळे त्यांच्या वस्तू विक्रीमध्ये वाढ होत आहे. डिजिटल मार्केटिंग ची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे कारण डिजिटल मार्केटिंग मध्ये कमी खर्चात जास्त फायदा होतो.
डिजिटल मार्केटिंगचा वापर कुठे आणि कसा केला जातो.
मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कि डिजिटल मार्केटिंगचा वापर कुठे आणि कशा प्रकारे केला जातो.
1) ब्लॉगिंग (BLOGGING)
ब्लॉगिंग हा ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग करण्याचा सगळ्यात चांगला प्रकार आहे.यामध्ये आपणास आपल्या कंपनीच्या नावाने ब्लॉग बनवायचा असतो ज्यामध्ये आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून देत असणाऱ्या सेवा आणि सुबिधा च्या बद्दल माहिती देऊ शकता. आणि जेव्हा जेव्हा आपल्या कंपनीचे नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च होतील तेव्हा त्याची माहितीसुद्धा आपण या मध्ये ऍड करु शकता. आणि आपण अनेक ग्राहकांना याच्या माध्यमातून आकर्षित करू शकता.
2) कन्टेन्ट मार्केटिंग (CONTENT MARKETING)
कन्टेन्ट मार्केटिंग द्वारे आपण आपल्या कंपनीने बनविलेल्या प्रॉडक्ट्स ची माहिती कन्टेन्ट स्वरूपात लिहू शकता.आपल्याला हिलण्यासाठी योग्य आणि आकर्षक शब्दांचा वापर करावा लागेल. ज्यामध्ये कंपनीचे डील्स आणि ऑफर्स सुद्धा लिहावे लागतील. यामध्ये वाचणाऱ्याला आपली माहिती चांगली वाटेल आणि आपल्या व्यवसायाची लोकप्रियता सुद्धा वाढेल आणि यामुळे प्रॉडक्ट्स ची विक्री सुद्धा वाढेल.
3) सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO)
जर आपण सर्च इंजिन द्वारे आपल्या ब्लॉगवरती भरपूर ट्रॅफिक किंवा ग्राहक पाहिजे असतील तर आपणास सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन विषयी माहिती असणे गरजेचे आहे. यूजर ला काही पण माहिती हवी असते तेव्हा तो गूगल चा वापर करतो आणि गूगल सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन चा वापर करून हवी असलेली माहिती यूजर ला देतो.जर आपली वेबसाइट सर्च रिझल्ट मध्ये टॉप वरती असेल तर जास्त लोकांना तुमच्या ब्लॉग किंवा व्यवसायाबद्दल माहिती मिळेल त्यामुळेच आपल्याला गूगल ने दिलेल्या SEO गाईड लाईन नुसार वेबसाइट बनवावी लागेल कारण त्यामुळेच चांगली ऑरगॅनिक ट्रॅफिक आपल्याला आपल्या वेबसाइट साठी मिळेल.
4) सोसिअल मीडिया मार्केटिंग (SOCIAL MEDIA MARKETING)
सोसिअल मीडिया डिजिटल मार्केटिंग चा महत्वाचा भाग आहे.सोसिअल मीडिया वरती व्यापारी ना केवळ आपल्या प्रॉडक्ट्स ची विक्री करू शकतो तर तो हे हि जाणून घेऊ शकतो कि यूजर त्यांच्या प्रॉडक्ट्स विषयी काय विचार करतात. सोसिअल मीडिया मार्केटिंग आपल्या व्यापारासाठी फायदेमंद असते. सोसिअल मीडिया मार्केटिंग मध्ये आपण Facebook, Twitter, Linkdin, Instagram, Snapchat, Pinterest सारख्या असंख्य माध्यमांवरती आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात देऊ शकता.
5) गुगल अडवर्ड्स (GOOGLE ADWORDS)
आपण जेव्हा एखादा ब्लॉग किंवा वेब्सिते ला भेट देता तेव्हा तिथे भरपूर जाहिराती पाहता त्यातील अधिकतर जाहिराती या गुगल मार्फत दाखवल्या जातात.गुगल अडवर्ड च्या मदतीने कोणताही व्यापारी आपल्या व्यवसायाची जाहिरात सहजपणे करू शकतो. हि एक पेड सर्विस आहे या साठी आपल्याला गुगलला पैसे द्यावे लागतात.गुगळे आपल्या व्यवसायाच्या जाहिराती चांगल्या प्रकारच्या वेबसाइट वरती दाखवतो ज्यामुळे आपण आपला व्यापार आपल्या टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहचवू शकता.गुगल अडवर्डस च्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे जाहिराती प्रसिद्ध करू शकता. जसे कि
- Taxt Ads
- Image Ads
- GIF Ads
- Match Content Ads
- Video Ads
- Pop Up Ads
- Sponsored Search
- Web Banner Ads
6) अप्स मार्केटिंग (APPS MARKETING)
इंटरनेट वरती भरपूर कंपन्या अप बनवून लोकांपर्यंत पोहचणे आणि त्यावरती आपल्या प्रॉडक्ट्स चा प्रचार करण्याला अप्स मार्केटिंग म्हणतात. हा डिजिटल मार्केटिंग चा एक महत्वपूर्ण हिस्सा आहे. आजकाल मोठ्या प्रमाणात लोक आपल्या स्मार्टफोन मध्ये वेगवेगळ्या अप्स चा वापर करतात.त्यामुळे आपण लाखो लोकांपर्यंत आपला व्यापार पोहचवण्यासाठी यामध्ये आपल्या जाहिराती देऊ शकता. ज्यामध्ये यूजर ने क्लिक केल्यावरती आपल्या वेबसाइट सहज पोहचवले जाते.
7) अफिलिएट मार्केटिंग (AFFILIATE MARKETING)
अफिलिएट मार्केटिंग हे आजच्या काळातील एक बेस्ट डिजिटल मार्केटिंग माध्यम आहे.या मध्ये अनेक शॉपिंग आणि प्रॉडक्ट्स सेल कंपन्या स्वतःचे अफिलिएट प्रोग्राम चालवतात, ज्यामध्ये या कंपन्यांचे आपण कोणतेही प्रॉडक्ट्स विकू शकतो आणि त्या बदल्यात आपल्याला काही प्रमाणात मोबदला दिला जातो.म्हणजेच आपल्याला कमिशन दिले जाते.
8) यु ट्यूब चॅनेल मार्केटिंग (YOUTUBE CHANNEL MARKETING)
यु ट्यूब आजच्या काळातील दुसरा मोठा आणि प्रसिद्ध सर्च इंजिन आहे.ज्यामुळे यु ट्यूब वरती भरपूर ट्रॅफिक असतं.हे एक असं माध्यम आहे ज्यामध्ये आपण आपलं प्रॉडक्ट्स व्हीडिओ च्या माध्यमात प्रमोट करू शकता.आपण पाहिलं असेल कि जेव्हा आपण यु ट्यूब वरती व्हीडिओ बगत असतो तेव्हा मध्येच आपणास जाहिरात दिसते हि व्हीडिओ खरं तर कोणत्यातरी कंपनीची व्हीडिओ जाहिरात असते. आणि ती जाहिरात लोक पाहतात आणि आकर्षित होतात.यु ट्यूब वरती मोठ्या प्रमाणावर व्हिवर्स असतात त्यामुळे पैसे कमविणे सोपे होते. त्यामुळेच यु ट्यूब हे प्रभावी डिजिटल मार्केटिंग चे माध्यम आज.
9) ई-मेल मार्केटिंग (EMAIL MARKETING)
ई-मेल मार्केटिंग मध्ये कंपनी ई-मेल च्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना ई-मेल पाठवून आपल्या प्रॉडक्ट्स ची जाहिरात करते.तसेच या ई-मेल मध्ये प्रॉडक्ट्स चे सर्व डील्स आणि ऑफर्स यांची माहिती पुरवली जाते. प्रॉडक्ट्स च्या माहिती बरोबर त्या प्रॉडक्ट्स ची लिंक सुद्धा दिले जाते ज्यामुळे ग्राहकांना वस्तूची खरेदी करणे सोयीचे होते. ई-मेल मार्केटिंग मध्ये आपण एका क्लिक वरती लाखो ग्राहकांपर्यंत पोहचू शकतो.
डिजिटल मार्केटिंग हा लोकांपर्यंत पोहचण्याचा अगदी सोपा आणि प्रभावी माध्यम आहे. यामुळे आपण आपला व्यवसाय जास्त लोकांपर्यंत अगदी सहजपणे पोहचवू शकतो.
डिजिटल मार्केटिंगचे फायदे
डिजिटल मार्केटिंग चे अनेक फायदे आहेत. ते पुढील प्रमाणे सांगता येतील.
आदर्श ग्राहकांना लक्ष्य करू शकता येते (You Can Target Your Ideal Buyers)
डिजिटल मार्केटिंग च्या मदतीने आपण आपल्या आदर्श ग्राहकांना लक्ष करू शकतो. जर आपण वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत तर आपण त्या क्षेत्रातील ग्राहकांना लक्ष करू शकता.तसेच आपण जर शैक्षणिक क्षेत्रशी संबंधित आहेत तर आपण त्या संबंधित ग्राहकांना लक्ष करू शकतो.त्याच प्रमाणे आपण वय, शहर, देश, शिक्षण, कामाचे स्वरूप, व्यवसाय, ग्राहकांचा कल अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन आपणास पाहिजे त्या क्षेत्रातील ग्राहकांना लक्ष करून आपले प्रॉडक्ट्स विकू शकतो.आणि योग्य ग्राहक मिळाल्यामुळे वस्तू विक्रीचे प्रमाण वाढून व्यवसायाची वाढ होण्यास मदत होते.
कमी खर्च (Cost Effective)
डिजिटल मार्केटिंग हे इतर मार्केटिंग माध्यमांपेक्षा स्वस्त आणि कमी खर्चिक असते.जर आपण पाहिलं तर ज्या दूरदर्शन वरती आपण जाहिराती पाहतो त्यांचा खर्च हा लाखाच्या घरात असतो.परंतु डिजिटल मार्केटिंग मध्ये आपण आपल्या बजेटनुसार आपल्याला पाहिजे त्या ग्राहकांना लक्ष करून आपल्या प्रॉडक्ट्स ची जाहिरात प्रभावीपणे करू शकतो.
ग्राहकांच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवणे शक्य होते. (Measurable)
डिजिटल मार्केटिंग मध्ये आपण ज्या ग्राहक वर्गास लक्ष केले आहे तो ग्राहक काय करतो आहे हे जाणून घेऊ शकतो. उदा. जर आपण बॅनर, पोस्टर किंवा पॅम्प्लेट वाटून जाहिरात करत असाल तर ती जाहिरात कोणी पहिली असेल, कोणी वाचली असेल हे सांगणे कठीण असते परंतु डिजिटल मार्केटिंग मध्ये आपण आपला लक्ष ग्राहक आपली जाहिरात वाचतो का, किंवा कोण कोण आपल्या वेबसाइट ला भेट देतो, क्लिक करतो, लाइक करतो शेअर करतो हे सर्व आपण जाणू करू शकतो.
एवढेच नाही तर आपल्या वेबसाइट वरती कोणत्या देशातील लोक भेट देतात, ते कितीवेळ आपल्या वेबसाइट वरती थांबतात तसेच कोणत्या शहरातून कोणत्या वेळेस हे सर्व आपण डिजिटल मार्केटिंग मध्ये मोजू शकतो.
जागतिक पोहोच (Global Reach)
डिजिटल मार्केटिंग चा सगळ्यात मोठा हा फायदा आहे कि जर आपला व्यवसाय छोटा आहे तरी सुद्धा तो जागतिक बाजारात आपले प्रॉडक्ट्स पोहचवून त्यामध्ये वाढ करू शकतो. जर आपण भारत आहात तर येथे बसून अमेरिकेमध्ये आपला व्यवसाय चालवू शकता.त्यामुळे व्यवसाय वाढीस मदत होते.
ग्राहकांची माहिती मिळविणे शक्य होते. (Customer Information)
जर आपल्या वेबसाइट वरती यूजर्स येत असतील तर आपण त्यांची माहिती गोळा करू शकतो. यामध्ये ग्राहकांचा ई-मेल, मोबाइल नंबर, नाव, इत्यादी, आणि या माहितीचा उपयोग करून आपण त्यांना वैयक्तिक मेसेज करू शकतो.तसेच वेगवेगळ्या ऑफर्स, डिल्स इत्यादींची माहिती आपण त्यानां देऊ शकतो आपले प्रॉडक्ट्स खरेदी करण्यास प्रवृत्त करू शकतो.
कन्व्हर्जन रेट मध्ये सुधार करत येणे शक्य होते. (Improve Conversion Rate)
जर आपल्या वेबसाइट वरती 100 लोक येत असतील परंतु त्यामधील केवळ 10 जण प्रॉडक्ट्स खरेदी करत असतील आणि उरलेले 90 जण खरेदी करत नसतील तरीही त्या 90 जणांचा डेटा आपल्याकडे असतो.त्यामुळे त्या माहितीचा उपयोग करून विविध मार्गांनी आपण त्या ग्राहकास आपले प्रॉडक्ट्स खरेदी करण्यास परावृत्त करू शकतो. त्यामुळे आपला कन्व्हर्जन रेट वाढून अधिक नफा होतो.
सोसिअल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing)
आपण सोसिअल मीडिया चा वापर करून आपले प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस ची जाहिरात करू शकतो. आपणास माहीतच आहे कि लोक आपला भरपूर वेळ हा सोसिअल मीडिया वरती घालवतात.त्यामुळे अशा ठिकाणी जास्त ग्राहक असल्याने या ठिकाणी मार्केटिंग करणे फायदेशीर ठरते.त्यामामुळे सोसिअल मीडिया हे मार्केटिंग चे प्रभावी साधन आहे.ज्याचा उपयोग करून आपण आपले प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस यांची जाहिरात करून विक्रीमध्ये वाढ करू शकता.
डिजिटल मार्केटिंग मध्ये येणारे अडथळे (तोटे)
जसे डिजिटल मार्केटिंग चे फायदे आहेत तसे काही तोटे सुद्धा आहेत.
कौशल्ये आणि प्रशिक्षण (Skills And Training)
जर आपण डिजिटल मार्केटिंग करणार असाल तर आपणास डिजिटल मार्केटिंग चे प्रशिक्षण घेऊन कौशल्य निर्माण करावे लागेल. जर विना प्रशिक्षण आणि कौशल्याशिवाय आपण डिजिटल मार्केटिंग मध्ये सफल होऊ शकणार नाही.जर आपल्याला टूल्स वापरता येत नसेल, मार्केटिंग स्टाटर्जी करता येत नसेल, प्लांनिंग करता येत नसेल, लॅपटॉप वापरता येत नसेल तर आपण डिजिटल मार्केटिंग करू शकणार नाही त्यासाठीच आपल्याकडे कौशल्य असणे गरजेचे असते.म्हणून डिजिटल मार्केटिंग मध्ये सफल व्हायचे असेल तर कौशल्य आणि प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.
वेळखाऊ प्रक्रिया (Time Consuming)
डिजिटल मार्केटिंग हि एका दिवसात सफल होणारी प्रक्रिया नाही आहे.त्यासाठी वेळ द्यावा लागतो.त्यासाठी आपणास आपले कौशल्य वाढवावे लागेल तसेच धैर्य ठेवावे लागेल आणि सातत्याने काम करावे लागेल तरच आपण डिजिटल मार्केटिंग मध्ये सफल होऊ शकता.
उच्च स्पर्धा (High Competitions)
डिजिटल मार्केटिंग मुळे आपण जागतिक पातळीवर आपला व्यवसाय आणू शकता पण त्याच बरोबर आपणास जागतिक पातळीवरील उच्च स्पर्धेला सामोरे जावे लागेल.परंतु आपली मार्केटिंग स्ट्रॅटर्जी वापरून प्लांनिंग करून या स्पर्धेला अगदी सहजपणे सामोरे जाऊ शकता.
तक्रार आणि अभिप्राय (Complain And Feedback)
जर आपले सोसिअल मीडिया खाते आहे आणि त्यावरती आपण जर आपल्या प्रॉडक्ट्स ची जाहिरात करत असाल आणि जर आपल्या प्रॉडक्ट्स मध्ये काही प्रॉब्लेम क्रीयेट झाला किंवा आपण जे ग्राहकांना सांगितले आहे तसे झाले नाही तर ग्राहक आपल्या सोसिअल मीडिया खात्यावरती आपला निगेटिव्ह अभिप्राय देऊ शकतात किंवा त्या प्रॉडक्ट्स विषयी तक्रार सुद्धा करू शकतात आणि हे सर्व आपल्या प्रॉडक्ट्स च्या विक्रीवर परिणाम करू शकेल.
कारण एखादा नवीन ग्राहक जेव्हा नवीन प्रॉडक्ट्स खरेदी करतो तेव्हा त्या प्रॉडक्ट्स बद्दल इतर लोकांचे अभिप्राय बघत असतो.त्यामुळे आपल्याला आपल्या प्रॉडक्ट्स ला सतत इम्प्रोव्ह करावे लागेल काही प्रॉब्लेम असेल तर तो लगेच सॉल्व्ह करावा लागेल त्यामुळे ग्राहकांचे आपल्या प्रॉडक्ट्स प्रति नेगेटिव्ह कंमेंट्स येणार नाहीत परिणामी नवीन ग्राहकांमध्ये वाढ होईल आणि आपली ब्रँड व्हॅल्यू (Brand Value) सुद्धा वाढेल. याचा फायदा आपल्या व्यवसायाला होईल.
डिजिटल मार्केटिंग ची व्याप्ती आणि भविष्य (Digital Marketing Scope And Future)
डिजिटल मार्केटिंग ही डिजिटल माध्यमे वापरून वस्तू/सेवांना प्रोत्साहन देणारी विपणन क्रिया आहे. आणि आज जवळजवळ प्रत्येकजण ऑनलाइन आहे. स्वस्त डेटा आणि किफायतशीर स्मार्टफोनच्या प्रवेशामुळे, जगभरातील इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि त्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.
व्यवसाय जागतिक पातळीवर पोहचविण्यासाठी डिजिटल मार्केटिंग ही गुरुकिल्ली आहे. डिजिटल मार्केटींगचे महत्त्व ओळखून, डिजिटल मार्केटिंगवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कंपन्या खूप सक्रिय होत आहेत आणि म्हणूनच डिजिटल मार्केटिंग कौशल्यांना बाजारपेठेत त्याची व्याप्ती वाढवण्याची मोठी मागणी आहे. उच्च वेतन आणि अनेक करिअरचे पर्याय हे डिजिटल असण्याचे मुख्य फायदे आहेत.अलीकडे कोरोना काळामध्ये डिजिटल मार्केटिंग ला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
अलीकडच्या काळात, करियरची सर्वाधिक मागणी असलेले क्षेत्र म्हणजे डिजिटल मार्केटिंग हे बनले आहे. आकडेवारी दर्शवते की डिजिटल मार्केटिंग हा उद्योग जगभरात मोठया प्रमाणात वाढत आहे.कोरोना काळात ओटीटी प्लॅटफॉर्मची प्रचंड वाढ झाली आहे ज्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म भारतातील सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ बनली आहे. लॉकडाऊनने ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सामग्रीचा वापर 181 अब्ज मिनिटांवरून गेल्या 365 दिवसांमध्ये जवळजवळ 204 अब्ज मिनिटांवर नेला.त्यावरून असे लक्षात येते कि कोरोना नंतर डिजिटल मार्केटिंग प्रचार आणि प्रसार अजून आणखी वाढला आहे. त्यामुळे एकंदरीत डिजिटल मार्केटिंग चे भवितव्य हे उज्वलच आहे असे म्हणता येईल.
निष्कर्ष
शेवटी असेच म्हणता येईल कि कोणताही व्यवसाय वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये आणण्यासाठी डिजिटल मार्केटिंग हे एक योग्य व्यासपीठ बनले आहे.उत्पादक आणि ग्राहक यांच्यात चांगले आणि विश्वासार्ह संबंध निर्माण करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग अत्यंत उपयुक्त असल्याचे सिद्ध होत आहे.डिजिटल मार्केटिंग व्यवसायाच्या विस्तार आणि प्रचारासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे. कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग देखील महत्वाची भूमिका बजावत आहे. म्हणूनच डिजिटल मार्केटिंगमुळे व्यापारी आणि ग्राहक यांच्यात चांगली व्यावसायिक संबंध निर्माण झाले आहेत.
नक्की वाचा
