भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र स्वाधार योजना 2021-22 संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना माहिती | महाराष्ट्र स्वाधार योजना माहिती | महाराष्ट्र स्वाधार योजना 2021-22 | स्वाधार स्कॉलरशिप योजना 2022 | Maharashtra Swadhar Yojana 2021



भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र स्वाधार योजना 2021-22 संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया


नमस्कार मित्रांनो, आज आम्ही महाराष्ट्र राज्यातील अशा एका योजनेचा उल्लेख करणार आहोत ज्या योजनेचे नाव आहे महाराष्ट्र स्वाधार योजना.या योजनेला डॉ बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र स्वाधार योजना असेही म्हटले जाते. राज्य शासनाने महाराष्ट्र स्वाधार योजना 2021 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी काम केले जाईल. महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे.


{tocify} $title={Table of Contents}


महाराष्ट्र स्वाधार योजना 2021


या योजनेअंतर्गत इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदविका आणि व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना सरकारी मदत म्हणून दरवर्षी 51,000/- रुपये मिळतील. ही मदत त्यांच्या निवास, बोर्डिंग सुविधा आणि इतर खर्चासाठी दिली जाईल.


या योजनेचा मुख्य उद्देश अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध समाजातील गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन प्रोत्साहित करणे आहे. ही योजना महाराष्ट्र समाज कल्याण विभागाचा अतिशय चांगला उपक्रम आहे.


आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता. अर्ज भरण्याविषयीची माहिती आणि योजनेशी संबंधित पात्रते विषयी संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात जागा मिळणे कठीण होत आहे अशा विध्यार्थ्यानी या योजनेसाठी अर्ज करून ते त्या लाभासाठी पात्र देखील होऊ शकतात. या योजनेमध्ये आपल्याला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असू शकते या संदर्भातील संपूर्ण माहिती आपणास या लेखामध्ये आपणास मिळेल.


महाराष्ट्र स्वाधार योजनेचा उद्देश 


आजकाल शिक्षण हा केवळ पैशाचा खेळ झाला आहे ज्यांच्यापाशी पैसे आहेत त्यांनाच जे हवे ते शिक्षण घेणे शक्य होत आहे. परंतु आपल्या समाजातील काही आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थांना पैशा अभावी क्षमता असूनही शिक्षण घेणे शक्य होत नाही. 


हीच शिक्षणामध्ये निर्माणा होणारी पैशाची अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने या स्वाधार योजनेची अंमलबजावणी केली.योजनेअंतर्गत इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदविका आणि व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना सरकारी मदत म्हणून दरवर्षी 51,000/- रुपये मिळतील. ही मदत त्यांच्या निवास, बोर्डिंग सुविधा आणि इतर खर्चासाठी दिली जाईल. 


त्यामुळे पैशाअभावी कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबता काम नये हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे असे म्हणता येईल. 


महाराष्ट्र स्वाधार योजनेतून मिळणारे फायदे 


केवळ महाराष्ट्र राज्यातील लोकांनाच योजनेचा लाभ मिळेल.


यामध्ये अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध समाजाचे विद्यार्थी यामध्ये अर्ज करू शकतात.त्यामुळे महाराष्ट्र स्वाधार योजनेचा लाभ केवळ अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध समाजाचे विद्यार्थीच घेऊ शकतात. 


अनुसूचित जाती आणि नव बौद्ध विध्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी हि योजना सुरू करण्यात आली आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र स्वाधार योजनांधून अनुसूचित जाती आणि नव बौद्ध विध्यार्थ्यांना दर वर्षी शिक्षणासाठी 51,000 रुपये दिले जातील. 


अनुसूचित जाती आणि नव बौद्ध विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी भाहेर जावे लागल्यास त्यांना राहण्याची आणि खाण्याची सुविधा . बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र स्वाधार योजने मधून केली जाईल. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र स्वाधार योजने अंतर्गत विद्यार्थयांना स्कॉलरशिप दिल्या जातील. 


महाराष्ट्र स्वाधार योजना पात्रता


अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.


केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थीच या योजनेत अर्ज करू शकतात.


महाराष्ट्र स्वाधार योजनेसाठी फक्त अनुसूचित जाती आणि नव बौद्ध विद्यार्थी अर्ज करू शकतात.


विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.


दहावी आणि बारावीच्या पुढील अभ्यासक्रमासाठी अर्ज करायचा आहे. त्याची वेळ मर्यादा 2 वर्षांपेक्षा कमी नसावी.


60 टक्के किंवा त्या पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विध्यार्थ्यानाच योजनेचा लाभ घेता येईल. 


जर विद्यार्थी अपंग असेल तर किमान 40% गुण असावेत. मग ते अर्ज करण्यास पात्र होऊ शकतात.


योजनेत मिळालेल्या रकमेसाठी विद्यार्थ्याला बँक खात्याची माहितीही द्यावी लागेल. दिलेली मदत त्यांच्या खात्यावर पाठवली जाईल.


महाराष्ट्र स्वाधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 


  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • बँक खाते
  • जातीचे प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • मोबाइल क्रमांक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो


महाराष्ट्र स्वाधार योजना नोंदणी प्रक्रिया


सर्व प्रथम, आपल्याला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. जिथे स्वाधार योजनेशी संबंधित सर्व माहिती दिली जाते.लिंकवर क्लिक केल्यानंतर होम पेज तुमच्या समोर उघडेल.आता स्वाधार योजना पीडीएफ पर्याय येथे देण्यात आला आहे.Pdf लिंकवर क्लिक करा. स्वाधार योजनेचा अर्ज तुमच्या समोर पीडीएफ स्वरूपात उघडला आहे. वर दिलेल्या डाउनलोड पर्यायावर क्लिक करून फॉर्म डाउनलोड करा. दिलेल्या माहितीनुसार तुमचा अर्ज भरा.तसेच या अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडा.आता हा अर्ज महाराष्ट्र समाज कल्याण विभागाकडे सबमिट करा.अशा प्रकारे तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल. 


अधिकृत वेबसाइट 


महाराष्ट्र स्वाधार योजना अर्ज (PDF) 


डॉ बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र स्वाधार योजनेसाठी मिळणार निधी 


सुविधा मिळणारे अनुदान (रुपये)
बोर्डिंग सुविधा 28,000
निवासी सुविधा 15,000
मेडिकल आणि इंजीनीरिंग अभ्यासक्रमासाठी 5,000 अतिरिक्त
इतर खर्च 8,000
इतर अभ्यासक्रम विभाग 2,000 अतिरिक्त
एकूण 51,000


अशा प्रकारे योग्य पद्धतीने अर्ज आपण या योजनेचा लाभ घेवू शकता. 

अशा आहे कि आपणास या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र स्वाधार योजनेची योग्य माहिती मिळाली असावी.तर अशाच नवनविन योजनांची माहिती मिळविण्यासाठी आपण आमच्या वेबसाइट ला नक्की भेट देत राहा.




हे सुद्धा नक्की वाचा :


महाराष्ट्र लेबर कार्ड


प्रधानमंत्री सौभाग्य योजना


Please do not enter any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने