वीज बिल जास्त आल्यावरती काय करावे | वीज बिल कमी करण्याचे उपाय

मित्रांनो आजच्या या लेखामधून आपण जाणून घेणार आहोत की वीज बिल जास्त आल्यावरती काय करावे. त्याच बरोबर वीज बिल जास्त का येते आणि वीज बिल कमी करण्याचे उपाय सुद्धा या आर्टिकल मधून आपण पाहणार आहोत. असे आढळून आले आहे की इतर ऋतुंच्या तुलनेत जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा वीज बिल हे अधिक येत असते मग अनेकांच्या मनात एक विचार येतो की आपले वीज बिल जास्त का येते? तर मित्रांनो घाबरु नका या आर्टिकल मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा.


वीज बिल जास्त आल्यावर काय करावे | वीज बिल कमी करण्याचे उपाय


वीज बिल जास्त येण्याची कारणे


चला तर जाणून घेऊया की वीज बिल जादा येण्याची कारणे काय आहेत ते. वीज बिल जास्त का येते हे जवळपास सगळ्याच घरातील लोकांना माहित नसते. चला तर मग या लेखातून आपण जाणून घेऊया अशी कोणती कारणे आहेत त्यामुळे आपल्या घरातील वीज बिल जास्त का येते?


1. विजेचा मीटर खराब असणे 


मित्रांनो जर तुमच्या घरातील वीज बिल जास्त येत असेल तर त्यामागचे मुख्य कारण हे तुमचा विजेचा मीटर खराब असू शकतो. बहुसंख्य लोकांच्या घरामध्ये हा वीज मीटर खराब असल्यामुळेच वीज बिल जास्त येत असते. 


विजेचा मीटर खराब असल्यामुळे त्यामधील रीडिंग हे चुकीचे दाखवले जाते परिणामी तुमचे येणारे बिल हे जादा आकारले जाते. जर तुम्हाला ही आपल्या विजेच्या वापरा पेक्षा वीज बिल अधिक येत आहे असे वाटत असेल तर तुम्ही तुमचा वीज मीटर तपासून घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला कळू शकेल की तुमचा विजेचा मीटर खराब आहे की नाही.



2. घरामध्ये वापरणारी उपकरणे खराब असणे.

 

जर तुम्ही तुमचा विजेचा मीटर तपासून घेतला आणि त्यामध्ये तुम्हाला समजले की तुमचा विजेचा मीटर तर चांगला आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची खराबी नाही आहे तर त्यामागचे दुसरे कारण हे आपण घरामध्ये जी वेगवेगळी उपकरणे वापरतो त्यामध्ये असणारी खराबी असू शकते.


कधी कधी आपण आपल्या घरामध्ये अनेक वर्ष जुने झालेले उपकरणे वापरत असतो. ही जुनी झालेली उपकरणे परिणामी नवीन उपकरणांच्या तुलनेत अधिक वीज वापरतात. त्यामुळे विजेच्या अधिकच्या खपतीमुळे रीडिंग वाढून अधिक वीज बिल येते. त्याच बरोबर तुमच्या घरात असलेली उपकरणे जर खराब झाली असतील तर नक्की वीज बिल वाढू शकते.



वीज बिल जास्त येत असेल तर काय करावे?


मित्रांनो तुमच्या घरातील वीज बिल जास्त येत आहे आणि तुम्हाला असे वाटते की तुमच्या विजेच्या मीटर मध्ये खराबी असल्यामुळेच वीज बिल जास्त येत आहे तर तुम्ही या संबंधीची तक्रार वीज नियंत्रण कार्यालयात करू शकता आणि तुमचा विजेचा मीटर बदलून घेऊ शकता. पण अशी तक्रार करायची कुठे आणि कशी करावी हा प्रश्न सगळ्यांना पडत असतो या माहितीच्या अभावामुळे अनेक लोक वीज बिल जास्त येण्याची समस्या न सोडवता जास्तीचे बिल भरत राहतात. पण आपण या संबंधीची तक्रार कशी आणि कुठे करावी या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 



वीज बिल संबंधीची तक्रार कशी आणि कोठे करावी?


मित्रांनो तुम्ही जास्तीच्या वीज बिल आकारणीने त्रस्त असाल तर तुम्हाला जास्त चिंता करण्याची गरज नाही. कारण वीज नियंत्रण विभागामार्फत वीज उपभोक्ता साठी एक हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आला आहे. ज्यावरती आपण वीज संबंधित कोणतीही तक्रार करू शकता. आणि तात्काळ तुमच्या तक्रारीवरती समधान मिळवू शकता.


जर तुमची विजेच्या संबंधित कोणतीही अडचण असेल किंवा तुमचे वीज बिल जास्त येत असेल तर तुम्ही 9450963851 या हेल्पलाईन नंबर वरती संपर्क करू शकता. कारण हा वीज विभागाचा हेल्पलाईन नंबर आहे. त्यामुळे तुमच्या वीज संबंधित ज्या काही तक्रारी असतील त्या तुम्ही या वरील दिलेल्या नंबर वरती संपर्क साधून सोडवू शकता. 



वीज बचत करण्याचे मार्ग |विजेची बचत कशी करावी?


तुम्ही सीलिंग फॅन वापरत असाल तर रेग्युलेटर नक्की लावा. काही वेळा थंडी पडल्यानंतरही पंखा त्याच वेगाने चालवला जातो, ज्यामध्ये विजेचा वापरही जास्त होतो.


शक्य असल्यास जुना पंखा काढा आणि नवीन लावा कारण जुने पंखे 75 वॅट्सचे असायचे, पण आता नवीन बाजारात उपलब्ध असलेले 35 वॅटचे पंखे खूपच कमी वीज वापरतात.


गरज नसल्यास मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉपसह इतर गोष्टींचे चार्जर अनप्लग करा. त्यामुळे विजेची बचत होण्यास मदत होईल.


ज्या ठिकाणी लाईट जी गरज नसेल तर त्या ठिकाणची लाईट बंद करा. आणि शक्य तो रात्रीच्या वेळी टेबल लॅम्प चा वापर करा.


दिवसा जास्त प्रमाणात सूर्यप्रकाशाचा वापर करा. घरामध्ये हलक्या शेडचे रंग वापरा ज्यामुळे घरात जास्त प्रकाश येतो आणि लाईट लावावी लागत नाही.


कधी कधी बल्ब, ट्यूब लाईट, सीएफएल ई. वरती धूळ जमा होते त्यामुळे त्याचा प्रकाश हा कमी होतो कमी प्रकाशामुळे तुम्हाला दुसरा दिवा लावावा लागतो त्यामुळे विजेचा जास्त वापर होतो. परिणामी जास्त वीज बिल येते. त्यामुळे अशी प्रकाशदर्शी वीज उपकरणे वेळीच साफ करा.


जुने बल्ब किंवा ट्यूब लाईट ऐवजी एलईडी वापरा. कारण जुना 100 वॅटचा बल्ब जेवढा प्रकाश देतो तेवढाच प्रकाश 15 वॅटचा एलईडी बल्ब देतो.


जुन्या कॉपर चोकऐवजी नवीन इलेक्ट्रॉनिक चोक किंवा एलईडी असलेली ट्यूबलाइट वापरा.


जर तुम्ही इलेक्ट्रिकल किटली किंवा वॉटर हीटर वापरत असाल तर ते नियमितपणे स्वच्छ करा. काही वेळा सॉल्ट साचल्यामुळे वीज अधिक खर्च होते.


गिझर नेहमी चालू ठेवू नका. गिझरचे तापमान जास्त ठेवू नका. तसेच, शक्य असल्यास गॅस गिझर वापरा.


संगणक, टीव्ही, म्युझिक सिस्टीम इत्यादी काम करत नसेल तर मेन स्वीच बंद करा, असे केल्याने विजेच्या वापरात बचत होईल. याशिवाय संगणक किंवा लॅपटॉप एनर्जी सेव्हिंग मोडमध्ये चालवल्याने विजेची बचत होते.


रेफ्रिजरेटरचा दरवाजा वारंवार उघडल्यानेही जास्त वीज लागते. याशिवाय फ्रीजमध्ये जास्त गरम वस्तू ठेवणे टाळा. कारण त्यामुळे विजेचा वापर वाढतो.


अशी इलेक्ट्रिक आयरन घ्या ज्याचे तापमान वाढताच आपोआप बंद होईल. इस्त्री करताना ओले कपडे इस्त्री करू नका. तसेच कपड्यांवर जास्त पाणी शिंपडू नये. त्यामुळे वीजही जास्त लागते.


अशा प्रकारे थोडीफार काळजी आणि जबाबदारीने वागले की आपोआप विजेमध्ये बचत होते. आणि परिणामी वीज बिल कमी येण्यास मदत होते.



निष्कर्ष


आजच्या लेखात आपण पाहिले की जर आपल्या घराचे वीज बिल जास्त येत असेल तर आपण त्याचे निराकरण कसे करू शकतो आणि याबद्दल तक्रार कशी करू शकतो, जर तुमच्या घरातही वीज बिल येत असेल, तर तुम्ही वर दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता, आणि तुम्ही ती लवकरात लवकर सोडवू शकता. जेणेकरून तुम्ही जास्त वीज बिल होण्यापासून वाचू शकता. तसेच आपण या लेखामधून वीज बचत कशी करावी याची माहिती सुद्धा घेतली.


तर आता तुम्हाला माहित असेलच की वीज बिल जास्त आल्यावर काय करावे, जर तुम्हाला आमच्या आजच्या या लेखात दिलेली माहिती आवडली असेल तर हा लेख जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लोकांना कळेल की जर त्यांच्या घरी जास्त वीज बिल येत असेल तर त्यांनी काय केले पाहिजे आणि अशाच नवनवीन माहितीच्या पोस्ट वाचत राहण्यासाठी तुम्ही आम्हाला तुमच्या ब्राऊझर मध्ये बुकमार्क करून ठेवा.



हे सुद्धा वाचा


महिलांसाठी घरगुती व्यवसाय कल्पना

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? 

अफिलियेट मार्केटिंग म्हणजे काय?

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

Please do not enter any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने