मित्रांनो जर तुम्ही ITI Full Form In Marathi तसेच आयटीआय म्हणजे काय?, आयटीआय कोण करू शकतं, त्याच बरोबर आयटीआय चा अभ्यासक्रम काय असतो?, आयटीआय करण्यासाठी किती फी लागते?, आयटीआय ची एडमिशन प्रक्रिया काय आहे? आयटीआय करण्याचे फायदे काय? त्याच प्रमाणे आयटीआय केल्यावरती नोकरी मिळते काय? ITI Full Information In Marathi यांसारख्या प्रश्नांची उत्तरे जर तुम्ही शोधत असाल तर या लेखामध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील.
जर तुम्ही 10 वी किंवा 12 वी पास झाला असाल आणि तुम्हाला नेमके कोणते करियर निवडावे ज्यामुळे आपले जीवन सुकर होईल असा प्रश्न पडला असेल. आणि हा प्रश्न सोडवत असताना तुम्ही अनेक लोकांना विचारलं सुद्धा असेल तर बहुतांशी लोक आयटीआय आणि पॉलिटेक्निक असे कोर्स करा असे सल्ले देतात. परंतु जर तुम्ही पॉलिटेक्निक चा विचार केला तर हा एक थोडा खर्चिक कोर्स आहे. परंतु जर तुम्ही आयटीआय चा विचार केला तर हा कोर्स कमी खर्चिक आणि सर्वांना परवडणारा सुद्धा आहे.
त्याच बरोबर जर तुम्ही पॉलिटेक्निक कोर्स चा कालावधी पाहिला तर तो 3 वर्ष इतका आहे. आणि दुसरीकडे आयटीआय या कोर्स हा 6 महिने ते 2 वर्ष या कालावधीत पूर्ण करता येतो. त्यामुळेच सध्या आयटीआय हा कोर्स चर्चेत सुद्धा आहेत. आणि अनेक विद्यार्थी हा कोर्स करण्यासाठी एडमिशन घेत आहेत. जर तुम्हाला ही ITI या कोर्स करण्यासाठी इच्छुक असाल आणि तुम्हाला आयटीआय विषयी संपूर्ण माहिती ITI Information In Marathi हवी असेल तर तुम्ही हा लेख पूर्ण वाचा.
{tocify} $title={अनुक्रमणिका}
आयटीआय (ITI) म्हणजे काय?
आयटीआय हा एक औद्योगिक अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना औद्योगिक स्तरावर कसे काम करावे या दृष्टिकोनातून हा कोर्स बनवलेला आहे. आयटीआय (ITI) कोर्स केल्यामुळे विद्यार्थी हा औद्योगिक क्षेत्रात काम करण्यास किंवा स्वयं रोजगार करण्यास सक्षम होतो. कारण या कोर्स मध्ये विद्यार्थांना थ्योरी पेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज दिले जाते. ज्यामुळे त्याच्या अंगामध्ये अशा काही कला उत्पन्न झाल्या पाहिजेत की त्याचा वापर करून विद्यार्थी त्यांचे जीवन सुकर करू शकतील. आयटीआय मध्ये अनेक ट्रेड असतात. आपण आपल्या आवडीनुसार किंवा ज्या मध्ये आपल्याला काम करायला आवडते असे ट्रेड निवडावा ज्यामुळे त्यामध्ये मन लागून तो अभ्यासक्रम अगदी सहजपणे शिकू शकता.
आयटीआय चा फूल फॉर्म काय? (ITI Full Form In Marathi)
ITI Full Form In Marathi हा Industrial Training Institute आहे. ज्याला मराठी मध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे म्हटले जाते. आयटीआय हा भारतातील एक प्रसिद्ध कोर्स आहे. 10 वी किंवा 12 वी नंतर हा कोर्स करून तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा प्रायव्हेट कंपनी मध्ये नोकरी मिळवू शकता. जर तुम्हाला नोकरी करायची नसेल तर तुम्ही डिग्री घेऊन स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकता. जर तुम्हांला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर आपले सरकार सुद्धा स्वयं रोजगारासाठी लोन उपलब्ध करून देते. ज्याचा उपयोग करून अगदी सहजपणे तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता.
आयटीआय एडमिशन प्रक्रिया काय आहे? (ITI Admission Process)
एकदा तुम्ही ठरविले की तुम्हाला आयटीआय करायचे आहे तर मग पुढे प्रश्न निर्माण होतो की आयटीआय साठी एडमिशन कसे घ्यायचे किंवा आयटीआय एडमिशन प्रक्रिया काय आहे? चला तर मग आपण जाणून घेऊ की आयटीआय साठी एडमिशन कसे घ्यायचे.
तुम्ही आयटीआयमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने प्रवेश घेऊ शकता. जर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीचा वापर करून एडमिशन घ्यायचे असल्यास तुम्ही पुढील पद्धतीचा वापर करू शकता. तुम्हाला भारतातील कोणत्याही राज्यात आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला त्या राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आणि ऑनलाइन फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करून सबमिट करावी लागेल. त्यानंतर काही कालावधीत तुमची प्रवेश परीक्षा (entrance exam) घेतली जाईल आणि थोड्या दिवसांनी त्याचा निकाल जाहीर केला जातो.
जर तुम्ही प्रवेश परीक्षेत चांगल्या मार्क्स मिळवून मेरिट मध्ये आला तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या सरकारी आयटीआय कॉलेज मध्ये एडमिशन घेण्यास पात्र होता. त्यानंतर तुम्ही सरकारी आयटीआय कॉलेज मध्ये प्रवेश मिळवू शकता.
जर तुमचे सरकारी कॉलेज मध्ये एडमिशन झाले नाही तर निराश होऊ नका. तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारी कॉलेज व्यतिरिक्त अनेक आयटीआय कॉलेज असतात ज्यांना सरकारची मान्यता मिळालेली असते. अशा कॉलेज मध्ये सुद्धा तुम्ही एडमिशन मिळवू शकता. यामधील काही महाविद्यालये थेट प्रवेश प्रक्रिया करतात. जी संपूर्ण प्रक्रिया ही ऑफलाईन असते. यामध्ये तुम्ही कॉलेजचा अधिकृत फॉर्म भरून आणि त्या फॉर्मला आवश्यक कागदपत्रे लावून तुम्ही कॉलेज मध्ये सबमिट करून प्रवेश मिळवू शकता. तर काही कॉलेज प्रवेश परीक्षांचे आयोजन करून एडमिशन करत असतात. अशा पद्धतीने तुम्ही प्रायव्हेट कॉलेज मध्ये सुद्धा एडमिशन करून तुम्हाला आवडणाऱ्या ट्रेड मध्ये एडमिशन मिळवू शकता.
आयटीआय प्रवेश पात्रता काय आहे?
आयटीआय मध्ये जर एडमिशन मिळवायचे असेल तर त्यासाठी काही प्रवेश पात्रता आहेत. त्या मापदंड च्या आधारावर आयटीआय मध्ये प्रवेश दिला जातो. त्यामुळे जर आयटीआय मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर खाली दिलेल्या पात्रता पूर्ण करणे गरजेचे असते.
- जर तुम्हाला आयटीआय मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर तुम्ही मान्यता प्राप्त बोर्डातून 8 वी, 10 वी किंवा 12 वी पास असणे गरजेचे असते. ही शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या ट्रेड वर अवलंबून असते.
- आयटीआय मध्ये असे अनेक ट्रेड आहेत ज्यासाठी शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी 10 वी पास आहे.
- 12 वी पास झालेले विद्यार्थी कधीही आयटीआय मध्ये एडमिशन घेऊ शकतो.
- आयटीआय मध्ये अनेक असे ट्रेड आहेत जिथे प्रवेश घेण्यासाठी कमीत कमी वयाची 14 वर्ष पूर्ण होणे गरजेचे असते. ही वयोमर्यादा ट्रेड नुसार बदलत असते.
- आयटीआय मध्ये प्रवेश घेण्यासाठीची सर्वाधिक वयोमर्यादा ही 40 वर्ष इतकी आहे. परंतु कॅटेगरी नुसार ही वयोमर्यादा बदलत असते.
- प्रत्येक राज्यात एडमिशन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा आयोजित केल्या जातात. त्यानुसार आवश्यक मिरिट निश्चित करून विद्यार्थांना प्रवेश दिला जातो.
आयटीआय मध्ये प्रवेश मिळवण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे
आयटीआय मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी खाली देलीली कागदपत्रे आवश्यक असतात.
- 8 वी, 10 वी किंवा 12 वी चे मार्क्स शीट
- Admit card/ Entrance Certificate (जर तुम्ही प्रवेश परीक्षा दिली असेल तर)
- Result किंवा merit list
- Migration Certificate (स्थलांतर प्रमाणपत्र)
- जात प्रमाणपत्र (जर तुम्ही SC, ST आणि OBC असाल तर)
- Domicile certificate (अधिवास प्रमाणपत्र)
- ओळख पत्र ( Voter ID card, Aadhar Card, Driving Licence, etc.)
- आणि इतर काही आवश्यक डॉक्युमेंट्स जे कॉलेज किंवा इन्स्टिट्युट कडून मागितले असेल.
आयटीआयमध्ये असलेले अभ्यासक्रम (ITI Courses List)
आयटीआय मधील काही महत्त्वाचे कोर्स जाणून घेण्या अगोदर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की आयटीआय मधील कोर्स हे मुख्यतः दोन भागांमध्ये विभागले आहेत. या मध्ये पाहिला Engineering Courses हा आहे तर दुसरा भाग हा Non-Engineering Courses आहे. विशेष म्हणजे Engineering Courses या विभागामध्ये 80 पेक्षा जास्त कोर्स उपलब्ध आहेत तर Non – Engineering Courses मध्ये 50 पेक्षा जास्त कोर्स उपलब्ध आहेत.
Engineering Courses किंवा Non-Engineering Courses कोर्स मध्ये कोणता कोर्स निवडावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सर्वप्रथम हे समजले पाहिजे की तुमची आवड कशा मध्ये आहे. जर तुम्हाला टेक्निकल विषयामध्ये आवड असेल तर तुम्ही Engineering Courses निवडू शकता पण जर तुम्हाला टेक्निकल मध्ये रुची नसेल तर तुम्ही Non-Engineering Courses निवडू शकता.
ITI मध्ये लोकप्रिय असलेले काही महत्त्वाचे कोर्स यादी खालीलप्रमाणे आहेत.
| फिटर | ड्राफ्ट्समन |
|---|---|
| इलेक्ट्रिकल मेंटेनन्स | पेंटर जनरल |
| मोल्डर | मेकॅनिक डिझेल |
| टर्नर | आर्किटेक्चरल शिप |
| प्लंबर | हेयर आणि स्किन केयर |
| वायरमन | अडवान्स वेल्डिंग |
| मशिनिस्ट | टूल अँड डाय मेकर |
| कारपेंटर | नेटवर्क टेकनिशियन |
| इलेक्ट्रिशियन | शीट मेटल वर्कर |
| बुक बाईंडर | स्पा थेरपी |
| पॅटर्न मेकर | कटिंग अँड सेविंग |
| कंप्युटर टेकनिशियन | ऍग्रो प्रोसेस |
| अडवांस अँड टूल डाय मेकिंग |
फायर टेक्नॉलॉजी |
| मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स |
वेब डिझायनिंग अँड कंप्युटर ग्राफिक्स |
| मेकॅनिक कंप्युटर हार्डवेयर | ट्रॅव्हल अँड टुरिझम |
| मेसन बिल्डिंग कन्स्ट्रक्टर | हॉस्पिटल हाऊस कीपिंग |
| वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक | हेल्थ सेफ्टी अँड इंवायरमेंट |
| ड्राफ्ट्समन मेकॅनिकल | फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी |
| बेकर आणि कन्फेक्शनर | हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट |
| फाउंड्री मॅन | स्टेनोग्राफी इंग्लिश |
आयटीआय कोर्स करण्यासाठी येणारा खर्च
आयटीआय साठी लागणारी फी ही सरकारी कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज मध्ये वेगवेगळी असते. सरकारी कॉलेज हे प्रत्येक राज्यांची राज्य सरकार द्वारा चालविले जातात त्यामुळे सरकारी कॉलेज मधील आयटीआय साठीची फी ही अतिशय कमी किंवा नगण्य असते. परंतु जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेज मध्ये एडमिशन घेतले असेल तर तिथे आयटीआय साठी 25 हजार ते 50 हजार इतकी फी आकारली जाऊ शकते. परंतु या फी मध्ये ही कमी जास्त पणा असू शकतो कारण तुम्ही घेतलेल्या ट्रेड नुसार ही फी बदलत असते.
आयटीआय कोर्स पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी
आयटीआय मध्ये वेगवेगळे कोर्स असतात या कोर्स साठी लागणार कालावधी हा वेगवेगळा असतो. साधारण पणे आयटीआय कोर्स पूर्ण करण्यासाठी जवळ पास 1 ते 2 वर्ष लागतात. परंतु असेही काही कोर्स आहेत जे केवळ सहा महिन्यातच पूर्ण करता येतात. हा कालावधी पूर्णपणे ट्रेड वरती अवलंबून असतो.
आयटीआय केल्यानंतर नोकरी कशी मिळेल?
आपण जर कोणता कोर्स पूर्ण केला तर आपल्याला नोकरी कशी मिळेल ही चिंता असते. त्याच प्रमाणे जर तुम्ही आयटीआय कोर्स पूर्ण केला असेल तर तुम्हाला सुद्धा नोकरी मिळण्याची चिंता असेल. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही आयटीआय केला असेल तर तुमच्यासाठी नोकरीचे अनेक पर्याय उपलब्ध होतात.
सध्याच्या काळात आयटीआय प्राप्त विद्यार्थ्यांची सरकारी आणि प्रायव्हेट क्षेत्रात मोठी मागणी आहे. त्यामुळे काही कंपन्या योग्य उमेदवार सोडण्यासाठी कॉलेज मध्येच जॉब इंटरव्ह्यू करत असतात आणि जॉब ऑफर करतात. त्यामुळे काही वेळेस तुम्ही कोर्स पूर्ण ही केलेला नसतो आणि तुमच्याकडे जॉब ऑफर लेटर असते.
त्याच बरोबर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने सुद्धा जॉब शोधू शकता. इंटरनेट वरती अनेक वेबसाईट आहेत ज्या तुम्हाला नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करत असतात. अशा वेबसाईट वर तुम्ही रजिस्टर करून तिथे तुमचा रेसुमे अपलोड करू शकता. त्यामुळे ज्या कंपनीला तुमचा रेसूमे आवडला असेल ती कंपनी तुम्हाला मेल किंवा मोबाईल वर संपर्क करू शकतील. त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळण्यास मदत होईल.
तसेच अनेक राज्य सरकारे किंवा केंद्र सरकार अनेक जॉब नोटिफिकेशन काढत असते. ज्यामध्ये अनेक जागांवराती भरती केली जाते. या जागांच्या भरतीसाठी आयटीआय कोर्स गरजेचा असणाऱ्या अनेक जागा असतात अशा जागा शोधून आवश्यक त्या जागेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. आणि अशा जागांसाठी तुम्ही पात्र असाल तर नक्की तुम्हाला नोकरी मिळू शकते.
आयटीआय करून तुम्ही नोकरी करण्यास इच्छुक नसाल तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकता. राज्य सरकारे आणि केंद्र सरकार स्वयं रोजगार करणाऱ्यांसाठी कर्ज सवलतीने देत असते. अशा योजनांचा लाभ घेऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय करून चांगले इन्कम मिळवू शकता.
आयटीआय केल्यानंतर किती पगार मिळतो?
तुम्ही आयटीआय कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला सुरवातीला 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत पगार सहज मिळू शकतो. पण हे या सुद्धा गोष्टीवर अवलंबून असते की तुम्ही कोणत्या कंपनी मध्ये काम करत आहात आणि कोठे करत आहात. त्याच बरोबर तुमचा पगार हा तुम्ही ज्या ट्रेड चा अभ्यास करून त्या क्षेत्रात काम करत आहात त्यावरही ठरत असतो. त्याच बरोबर जसे तुमच्याकडे अनुभव येत जातो तसा तुमचा पगार ही आपोआप वाढत जातो.
आयटीआय करून मिळणारे फायदे
आयटीआय करण्याचे अनेक फायदे आहेत. तर ते जाणून घेऊया पुढील प्रमाणे
पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे आयटीआय हा कोर्स तुम्ही 8 वी, 10 वी, 12वी नंतर कधीही करू शकता.
आयटीआय कोर्स मध्ये थिओरी पेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज वरती जास्त भर दिला जातो.
अजून महत्त्वाचा फायदा म्हणजे आयटीआय कोर्स यांचा कोर्स पूर्ण होण्याचा कालावधी हा कमी असतो. केवळ 6 महिने ते 2 वर्ष मध्ये तुम्ही हा कोर्स पूर्ण करू शकता.
आयटीआय कोर्स मध्ये इतर कोर्स च्या तुलनेत कमी फी आकारली जाते. आयटीआय च्या सरकारी कॉलेज मध्ये हा कोर्स मोफत दिला जातो.
नोकरीमध्ये आयटीआय या कोर्सला सद्ध्या मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
आयटीआय कोर्स करून सहजपणे स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकतो.
आयटीआय संबंधित सतत विचारले जाणारे प्रश्न (Faqs)
आयटीआय चा फुल फॉर्म काय आहे?
ITI चा फुल फॉर्म Industrial Training Institute हा आहे. ज्याला मराठी मध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे म्हटले जाते.
आयटीआय कोर्स किती वर्षाचा असतो?
आयटीआय कोर्स चा कालावधी हा 6 महिने ते 2 वर्ष इतका असतो.
12 वी नंतर आयटीआय करता येते काय?
12 वी पूर्ण केल्या नंतर आयटीआय करता येते.
आयटीआय मध्ये सर्वात चांगला कोर्स कोणता आहे?
इलेक्ट्रिशियन हा आयटीआय मधील प्रसिद्ध कोर्स आहे. त्याच बरोबर फिटर हा कोर्स सुद्धा प्रसिद्ध आहे. आयटीआय मधील अनेक कोर्स पैकी तुम्ही तुमच्या आवडी नुसार कोर्स निवडू शकता.
आयटीआय करण्यासाठी किती वय असणे गरजेचे आहे?
आयटीआय करण्यासाठी पात्र उमेदवाराचे वय हे कमीत कमी 14 आणि जास्तीत जास्त 40 असणे गरजेचे आहे.
आयटीआय करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?
आयटीआय साठी अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असावा.
निष्कर्ष
मित्रांनो या आर्टिकल च्या माध्यमातून आम्ही आपणास ITI Full Form In Marathi काय आहे तसेच आयटीआय म्हणजे काय? ITI Information In Marathi यासंबंधी संपूर्ण माहिती दिली आहे. आम्हाला अशा आहे की तुम्हाला आयटीआय संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखातून मिळाली असतील.
जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा. त्याच बरोबर ही माहिती तुमचे मित्र आणि गरजुंपर्यंत नक्की पोहचवा. त्याच बरोबर अशाच नवनवीन माहितीसाठी आमचे नोटिफीकेशने ऑन करा किंवा आमचा ब्लॉग बुकमार्क करून ठेवा. धन्यवाद!
हे सुध्दा नक्की वाचा
👉 वीज बिल जास्त आल्यावर काय करावे
