MPSC फुल फॉर्म मराठी मध्ये | MPSC Full Form In Marathi

मित्रानो आज आपण या लेखातून MPSC चा full फॉर्म in marathi (MPSC Full Form In Marathi) काय आहे ते पाहणार आहोत.जर आपण MPSC चा अभ्यास करत आहेत किंवा MPSC विषयी आपणास माहिती हवी आहे तर आपण योग्य ठिकाणी आहात. MPSC Full Form In Marathi बद्दल संपूर्ण माहितीसाठी हा लेख तुम्ही नक्की वाचा.


MPSC फुल फॉर्म मराठी मध्ये | MPSC Full Form In Marathi

{tocify} $title={Table of Contents}

MPSC म्हणजे काय ? 


MPSC म्हणजे Maharashtra Public service commission ज्याला मराठी मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग असे म्हणतात.केंद्रीय पातळीवरती जसे upsc म्हणजे Union public service commission असते तसेच महाराष्ट्र साठी MPSC हा आयोग आहे. हा आयोग घटनेने तयार झालेला आयोग आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 315 अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. 


MPSC चा FULL FORM IN MARATHI


MPSC - Maharashtra Public service commission


MPSC Full Form In Marathi

महाराष्ट्र लोकसेवा आयोग



MPSC आयोगाची कामे 


MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची) कामे पुढीलप्रमाणे सांगता येतील.


दरवर्षी एकूण किती पदांसाठी परीक्षा घ्यायला पाहिजे हे MPSC ठरवत नाही तर हे राज्य सरकार ठरवते. राज्य सरकार MPSC ला आदेश देतो आणि त्यानुसार MPSC आयोग वेवेगळ्या पदांसाठी जाहिरात काढते. 


 राज्य सरकारे दिलेल्या आवश्यक पदांकरिता परीक्षेचे आयोजन करणे.


 राज्य सरकारच्या अंतर्गत सेवा आणि विविध सरकारी पदांसाठी भरती नियम लिहून सुधारणा करणे.



MPSC आयोगाद्वारे द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा

 


राज्य सेवा परीक्षा (State Services Examination)


* महाराष्ट्र वनसेवा परीक्षा (Maharashtra Forest Services Examination)


* महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा (Maharashtra Agricultural Services Examination)


* महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा (Maharashtra Engineering Services, Gr-A Examination)


* महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा (Maharashtra Engineering Services, Gr-B Examination)


* दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा. Civil Judge (Jr. Div.) Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam



* सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा (Assistant Motor Vehicle Inspector Examination)


* सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -२, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब (Assistant Engineer (Electrical) Grade-2, Maha. Electrical Eng. Services, B)


* पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (Police Sub Inspector Examination)


* विक्रीकर निरीक्षक परीक्षा (Sales Tax Inspector Competitive Examintion)


* कर सहायक गट-क परीक्षा (Tax Assistant Examination)


* सहायक परीक्षा (Assistant Examination)


* लिपिक-टंकलेखक परीक्षा (Clerk typist Examination)



MPSC साठी आवश्यक पात्रता


MPSC ची परीक्षा देणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. 


MPSC परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवासाचं प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मिळवावं लागतं.


कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणारा उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो. या परीक्षेसाठी पदवीची टक्केवारी आवश्यक नाही.


वयाची 19 वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही शाखेचे पदवीधर उमेदवार राज्यसेवा परीक्षेला बसू शकतात.


खुल्या गटातील उमेदवार 38 वर्षांच्या वयापर्यंत या परीक्षेला बसू शकतात.आणि आरक्षित गटातील विद्यार्थ्यांना 43 वयापर्यंत हि परीक्षा देता येते. 


 

MPSC परीक्षेचे स्वरूप (MPSC Exam Pattern In Marathi) 



महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगच्या परीक्षा UPSC प्रमाणे, तीन टप्प्यांत घेतल्या जातात.


पूर्व परीक्षा (Prelims Exam) 

मुख्य परीक्षा (Mains Exam)

मुलाखत (Interview)


पुढील टप्प्यासाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक टप्पा क्लिअर करावा लागतो, जर उमेदवारांनी पूर्व परीक्षा (Preliminary Exam)केली तर ते मुख्य परीक्षा (Mains एक्साम) देऊ शकतात, तेव्हाच त्यांना अंतिम टप्प्यासाठी बोलावले जाईल म्हणजेच MPSC परीक्षेची मुलाखत (Interview).


पूर्व परीक्षा (Prelims Exam)


MPSC च्या या पहिल्या टप्प्यात दोन पेपर असतात. पहिला पेपर हा गेनेरळ स्टडीयूएस चा असतो जो 200 गुणांचा असतो.ज्यामध्ये 100 प्रश्न प्रत्येकी 2 गुणांसाठी विचारले जातात. आणि या पेपर साठी 2 तसंच वेळ दिला जातो. या पेपर मध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, तसेच अर्थशास्त्र, पर्यावरण , चालू घडामोडी , सामान्य विज्ञान या सारख्या काही घटकांचा समावेश केला आहे.तुम्हाला या विषयी आणखी माहिती हवी असल्यास तुम्ही आयोगाची अधिकृत वेब्सिते पाहू शकता. 


या नंतरचा पेपर हा CSAT (Civil Services Aptitude Test) चा असतो. हा सुद्धा 200 गुणांचा पेपर असतो. परंतु या मध्ये 80 प्रश्न असतात. आणि प्रत्येक प्रश्न हा अडीच गुणांचा असतो. या मध्ये सगळ्या पेपर साठी निगेटिव्ह मार्किंग पद्धती आहे. आणि 1/3 मार्किंग पद्धती आहे. म्हणजे प्रत्येक 3 चुकीच्या प्रश्नासाठी 1 प्रश्नाचे गुण कमी केले जातील. 


मुख्य परीक्षा (Mains Exam)

 

परीक्षेचा दुसरा टप्पा आहे तो मुख्य परीक्षाचा ((Mains Exam).या टप्प्यात 6 पेपर असतात. 6 पेपर पैकी पहिला आणि दुसरा पेपर हा भाषेचा असतो. यातील पहिला पेपर भाषा मराठी आणि इंग्लिश दोन्ही वर्णनात्मक पद्धतीचा असतो. आणि हा 100 गुणांचा पेपर असतो. या मध्ये 50 गुणांसाठी मराठी पेपर असतो तर 50 गुणांसाठी मराठी पेपर असतो. तसेच या साठी स्वतंत्र उत्तर पत्रिका दिली जाते. या मध्ये निबंध लेखन करावे लागते, तसेच भाषनंतर करावे लागते, शिवाय सारांश लेखन हे दोन्ही भाषांमध्ये करावे लागते. 


त्यानंतरचा दुसरा पेपर सुद्दा भाषेचाच असतो. परंतु हा बहुपर्यायी असतो आणि यामध्ये सुद्धा मराठी साठी 50 गुण आणि इंग्लिश साठी 50 गुण असतात. असे एकूण 100 गुणांचा हा पेपर असतो. यामध्ये 100 प्रश्न हे 100 गुणांसाठी विचारले जातात. म्हणजे 1 प्रश्न हा 1 गुणांसाठी असतो.

 

त्यानंतरचा तिसरा पेपर त्याला General Studies 1 (सामान्य अभ्यास 1)असे म्हणतात. हा पेपर 150 गुणांचा पेपर असतो.या मध्ये इतिहास, भूगोल, शिवाय कृषी या घटकाचा समावेश असतो. 


त्यानंतरचा चौथा पेपर General Studies 2 (सामान्य अभ्यास 2) हा पेपर हि 150 गुणांचाच पेपर असतो. आणि यामध्ये राज्यशास्त्र, भारतीय संविधान आणि राजकारण तसेच कायदे या घटकांचा या पेपर मध्ये समावेश असतो.


MPSC परीक्षेतील पाचवा पेपर हा General Studies 3 (सामान्य अभ्यास 3) म्हणून ओळखला जातो.हा पेपर सुद्धा 150 गुणांचा पेपर असतो. आणि यामद्ये HR (मानवाधिकार) आणि HRD (मानव संसाधन विकास) या विषयांचा समावेश केलेला असतो. 


MPSC परीक्षेतील मुख्य परीक्षा (Mains Exam) शेवटचा पेपर याला General Studies 4 (सामान्य अभ्यास 4) म्हणतात.यामध्ये अर्थशास्त्र, कृषी अर्थशास्त्र, आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकांचा समावेश केलेला असतो. आणि हा सुद्धा 150 गुणांचा पेपर असतो.आणि यामध्ये 150 प्रश्न असतात. 

 

या मुख्य परीक्षातही पूर्व परीक्षा प्रमाणे निगेटिव्ह मार्किंग(Negative Marking) पद्धती आहे. आणि हि 1/3 मार्किंग पद्धती आहे.मुख्य परीक्षा ((Mains Exam) हि एकूण 800 गुणांची असते आणि यामधून निवडलेले उमेदवार हे मुलाखतीसाठी पात्र ठरतात. 


मुलाखत (Interview)


MPSC साठी घेतलेली मुलाखत हि एकूण 100 गुणांची असते. इथे पात्र उमेदवारांचे व्यक्तिमत्व, विचार करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता इत्यादी तपासल्या जातात आणि त्यानुसार तुम्हाला गुण दिले जातात.


पुढे मुख्य परीक्षा (Mains Exam) आणि interview या दोन्हींचे गुण एकत्र करून रँकिंग केली जाते. आणि त्यानुसार final result घोषित केला जातो.  

Please do not enter any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने