मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण या लेखामधून मानवी शरीराशी संबंधित काही रोचक तथ्य जाणून घेणार आहोत. हा लेख वाचला की तुम्हाला समजेल की Facts About Human Body in Marathi मानवी शरीर हे किती क्लिष्ट आणि मनोरंजक आहे.
मानवी शरीर हे पृथ्वीवरील इतर जीवनापेक्षा अगदी वेगळे आहे. कारण मानवी शरीरात असलेली बौद्धिक क्षमता आणि विचार करण्याची शक्ती ही इतर अन्य जीवनापेक्षा वेगळी आहे. आणि याच बुद्धिमत्तेच्या जोरावर मानवाने पृथ्वी बरोबरच ब्रम्हांडावरती सुद्धा आपला ठसा उमटविला आहे.
या जगामध्ये मानवी शरीर आणि मानवाला तर महत्त्वाचे स्थान आहे. याचे कारण हे मानवी शरीरामध्ये असे काही वैशिष्टय आढळतात जी कोणत्याही जिवाच्या शरीरात आढळत नाहीत. चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊया की मानवी शरीराबद्दल रोचक तथ्य काय आहेत?
{tocify} $title={अनुक्रमणिका}
मानवी शरीराबद्दल काही मजेदार तथ्ये (Intersting Facts about Human Body)
- मानव अन्नाशिवाय 8 आठवडे जगू शकतो. पण त्यासाठी पाणी पित रहावे लागेल.
- मानवी शरीरात सरासरी 60% पाणी असते. मानवाच्या रक्तात जवळपास 72% पाणी आढळते. माणूस हा पाण्याशिवाय 3 ते 5 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो.
- माणूस हा न झोपता 11 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो.
- मानवाच्या शरीरात जेव्हा 1% पाणी कमी असते तेव्हा त्याला तहान लागते. जेव्हा पाण्याची कमतरता मानवी शरीरात 5% तेवढी होते तेव्हा माणूस बेशुद्ध होतो. पण मानवी शरीरात पाण्याची कमतरता ही 10% किंवा जास्त असेल तर अशा परिस्थिती मध्ये माणूस जिवंत राहू शकत नाही.
- मानवाच्या शरीरातील रक्त हे त्याच्या वजनाच्या केवळ 8% येवढे असते.
- मानवाच्या डोळे हे जवळपास 100 करोड रंग ओळखू शकतात.
- मानवाच्या तोंडामध्ये जवळपास 6 लाख जीवाणू (बॅक्टरिया) असतात.
- मानवाच्या बोटांचे ठसे (फिंगरप्रिंट), डोळे, आणि चेहरा हा कधीही समान नसतो. अगदी जुळ्या लोकांच्या चेहाऱ्यातही थोडेफार साम्य असते.
- मानवाचे नाक आणि कान हे आयुष्य भर वाढत असतात.
- मानवाच्या डोळ्याचा आकार हा जन्मापासून अगदी मृत्यू पर्यंत एकसारखाच असतो.
- माणूस हा आपल्या जीवन काळातील 5 वर्ष अन्न खाण्यात घालवतो. मानव हा आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्या वजनाच्या 7000 पट अधिक अन्न खातो.
- माणूस जेव्हा झोपतो तेव्हा त्याच्या शरीरातील उर्जा कमी होत असते. कारण माणूस जेव्हा झोपलेला असतो तेव्हा मेंदू काही महत्वपूर्ण माहिती स्टोअर करत असतो. जेव्हा माणूस झोपी जातो तेव्हाच मानवाच्या शरीराला आराम मिळतो आणि त्याच काळात मानवाच्या शरीरातील रेपेरींग चे काम चालू असते. त्याच बरोबर शारीरिक वाढीसाठी आवश्यक हार्मोन्स माणूस झोपतो तेव्हाच तयार होतात. या सर्व क्रिया करण्यासाठी शरीर झोपेत सुद्धा उर्जा घेत असते.
- मानवाच्या दिनकार्यामध्ये झोपेला अधिक महत्त्व आहे. माणसाने जवळपास 6 ते 7 तासाची झोप घेणे गरजचे असते.
- सरासरी, एखाद्या व्यक्तीला झोपायला सात मिनिटे लागतात.
- माणूस जेव्हा गर्भात असतो तेव्हाच तो स्वप्न बघायला सुरवात करतो. स्वप्न पाहण्याने सर्जनशील शक्ती विकसित होते.
- जेव्हा मुले जन्माला येतात तेव्हा त्यांना सर्व काही रंगहीन दिसते, केवळ 12 महिन्यांनंतर ते पूर्णपणे रंग पाहू शकतात.
- मानवाची फुफ्फुसे दररोज 2 दशलक्ष लिटर हवा फिल्टर करत असतात.
- मानवाच्या शरीरात प्रत्येक सेकंदाला 2.5 कोटी नवीन पेशी बनत असतात.
- मानवी शरीरात दररोज 200 अब्जाहून अधिक रक्तपेशी तयार होतात.
- मनुष्याच्या शरीरात 2500 अब्जाहून अधिक रक्तपेशी असतात. रक्ताच्या एका थेंबामध्ये सुमारे 250 दशलक्ष रक्त पेशी असतात.
- मानवाच्या नाकामध्ये नैसर्गिक एअर कंडीशन असते. ज्यामुळे बाहेरील गरम हवा थंड आणि थंड हवा गरम करून फुफ्फुसात पाठवण्यासाठी मदत केली जाते.
- आपल्या शरीरातील 80% उष्णता आपल्या डोक्यातून बाहेर जाते.
- मानवी शरीरातील सर्व रक्तवाहिन्यांची एकूण लांबी सुमारे 100,000 किमी आहे.
- पुरुषाच्या शरीरात सुमारे 6.8 लिटर रक्त असते तर महिलांच्या शरीरात फक्त 5 लिटर रक्त असते.
- स्त्रिया पुरुषांपेक्षा 2 पट जास्त डोळे मिचकावतात.
- मानवी नाक 5000 विविध सुगंध लक्षात ठेवू शकते.
- माणसाचे ओठ त्याच्या हाताच्या बोटांपेक्षा जास्त संवेदनशील असतात.
- मानवाच्या जीवनकाळात, मानवी तोंडातून दोन स्विमिंग पूल भरण्यासाठी पुरेशी लाळ निर्माण होते.
- जर तुमची लाळ अन्नात मिसळत नसेल तर तुम्ही ते अन्न चाखू शकणार नाही.
- शिंकताना बाहेर येणारी हवा ही 166 ते 300 किलो मिटर प्रती घंटा इतकी असते. तसेच शिंकताना डोळे नेहमी बंद होतात. त्यामुळे कधीही जबरदस्तीने येणारी शिंक थांबवू नका किंवा डोळे उघडे करून शिकण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका.
- दात एखाद्या खडकासारखे मजबूत असतात पण ते शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे स्वतःची दुरुस्ती करू शकत नाहीत. जेव्हा दातांमध्ये रोग असतो तेव्हा दात स्वतःला बरे करू शकत नाही.
- मानवाचे केस आणि नखे ही नेहमी वाढत असतात. विशेष म्हणजे मानवाच्या बोटांमध्ये अंगठा हा इतर बोटांच्या तुलनेत कमी वेगाने वाढतो तर मधले बोट हे अधिक वेगाने वाढते.
- पुरुषांमध्ये दाढीचे की हे तुलनेने डोक्यावरील केसांपेक्षा अधिक वेगाने वाढतात. जर एखादा व्यक्ती आपल्या पूर्ण आयुष्यात जर दाढी करत नसेल तर त्या व्यक्तीची दाढी ही 30 फुटांपर्यंत वाढू शकते.
मानवी मेंदूशी संबंधित काही तथ्ये (human brain facts In Marathi)
- मानवी शरीरामध्ये मेंदू हा संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवत असतो त्यामुळे मानवी शरीरामध्ये मेंदूला फार महत्त्वाचे स्थान आहे. कारण मानवी मेंदू मध्ये विचार करण्याची क्षमता असते जी अन्य जीवांमध्ये आढळत नाही.
- मानवी मेंदू लाखो न्यूरॉन पेशींनी बनलेला असतो.
- जर मानवी मेंदूला 5 ते 10 मिनिटे ऑक्सीजन मिळाले नाही तर मानवाचा मेंदू खराब होऊ शकतो.
- मानवी मेंदूची वाढ वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत होत राहते.
- मानवी मेंदूच्या जवळपास 60% भागांमध्ये चरबी असते. मानवी शरीरात मेंदू हा अधिक चरबी असलेला भाग आहे.
- मानवी मेंदू संपूर्ण शरीराच्या फक्त 2% आहे. परंतु मेंदू हा संपूर्ण शरीरातील 20% ऑक्सिजन आणि रक्त एकटा वापरतो.
- वयाच्या 30 वर्षानंतर मानवी मेंदू संकुचित होऊ लागतो.
- मानवी मेंदूमध्ये 1 सेकंदात 1 लाखांहून अधिक रासायनिक अभिक्रिया घडतात.
मानवी डोळ्यांबद्दल काही मनोरंजक तथ्ये (Human Eyes Facts In Marathi)
- मानवी डोळे हे 576 मेगापिक्सलचे असतात.
- मानवी डोळे हे एखाद्या कॅमेरा प्रमाणे काम करतात ते फक्त प्रकाशाला कॅप्चर करतात आणि त्यामधून मिळालेला डेटा मेंदूला पाढवतात.
- मानवी डोळे वस्तू उलटी बघतात पण मानवी मेंदू हे उलटी वस्तू आपल्याला सरळ करून दाखवतो.
- मानवी डोळ्यांची बघण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. म्हणजे एका डोळ्याची बघण्याची शक्ती अधिक तर दुसऱ्या डोळ्याची बघण्याची क्षमता कमी असते.
- पुरुषांच्या तुलनेत महिलांचे डोळे अधिक रंग ओळखू शकतात.
- मानवी डोळ्यांचा आकार हा जन्मापासून मरेपर्यंत समानच असतो.
मानवी हृदयाशी संबंधित काही तथ्ये (Human Heart Facts In Marathi)
- हृदय हे शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. हृदय हे शरीरातील रक्ताभिसरणाचे काम करते.
- हृदय रक्ताभिसरण प्रणालीच्या मध्यभागी स्थित आहे, जे शरीराच्या प्रत्येक भागांपर्यंत रक्त पोहोचवते.
- रक्त शरीरात ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये पाठवते आणि CO² आणि टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर काढते. आणि यामध्ये हृदय महत्वाची भूमिका बजावते.
- हृदय बाहेर काढल्यावरही धडधडत राहते कारण हृदयाच्या स्वतःचा इलेक्ट्रिकल प्रभाव असतो.
- मानवी हृदय दररोज एक लाख वेळा धडधडते. एका मिनिटाला हृदय जवळपास 60 ते 100 वेळा धडधडते. म्हणजे हृदय सरासरी प्रति मिनिट 72 वेळा बीट होते.
- आपले उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा किंचित लहान असण्याचे कारण म्हणजे आपल्या हृदयासाठी जागा करणे.
- मानवाच्या हृदयात रक्ताचा दाब इतका असतो की तो इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पोहोचू शकतो.
निष्कर्ष
मित्रांनो मानवी शरीराशी संबंधित रोचक तथ्य वाचून तुम्हाला नक्की नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. Facts About Human Body in Marathi या लेखामधून तुम्हाला मानवी शरीरसंबंधी नवीन आणि रोचक तथ्य विषयी माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेयर करा. आणि अशा नवनवीन माहितीसाठी आपला ब्लॉग बुकमार्क करून ठेवा.
👉 हे सुध्दा नक्की वाचा 👈
👉 महिलांसाठी घरगुती व्यवसाय कल्पना
👉 विनायक मेटे यांनी जीवन परिचय
