भारताच्या 15 व्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मु याची नेमणूक झाली आहे. द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहेत. पण या द्रौपदी मूर्मु आहेत तरी कोण? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण आर्टिकल वाचावे लागेल.
या आर्टिकल मध्ये आपण Draupadi Murmu Biography In Marathi विषयी माहिती घेणार आहोत. तसेच द्रौपदी मुर्मू कोण आहेत? त्याचे बालपण, शिक्षण, राजकीय प्रवास या संबंधी संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल मधून जाणून घेणार आहोत.
द्रौपदी मुर्मू कोण आहेत?
द्रौपदी मुर्मु या भारतीय राजनेत्री आहेत. 2022 मध्ये भारताच्या राष्ट्रपती पदासाठी नेमणूक करण्याकरिता निवडणूक घेतली गेली. या पदासाठी भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षाकडून द्रौपदी मुर्मु याची निवड करण्यात आली होती. द्रौपदी मुर्मु या भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षाच्या राष्ट्रपती पदासाठी अधिकृत उमेदवार होत्या. त्यांनी यशवंत सिन्हा याचा पराभव केला.त्यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत 50 टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळवून भारताच्या 15 व्या राष्ट्रपती पदाच्या मान मिळविला. विशेष म्हणजे द्रौपदी मुर्मु या भारताच्या पहिल्या महिला आदिवासी (अनुसूचित जमाती) राष्ट्रपती आहेत. देशाच्या सर्वोच्च पदी एक अनुसूचित जमातीची (आदिवासी) महिला असल्याने देश भारत एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
द्रौपदी मुर्मू याचा जीवन परिचय/ संपूर्ण माहिती
| पूर्ण नाव | द्रौपदी मुर्मू |
|---|---|
| वडिलांचे नाव | बिरांची नारायण टुडू |
| व्यवसाय | राजकारणी |
| राजकीय पक्ष | भारतीय जनता पार्टी |
| पतीचे नाव | श्याम चरण मुर्मू |
| जन्मतारीख | 20 जून 1958 |
| वय | 64 वर्षे |
| जन्म ठिकाण | मयूरभंज, ओडिसा, भारत |
| वजन | 74 किलो |
| उंची | 5 पुट 4 इंच |
| जात | आदिवासी |
| धर्म | हिंदू |
| मुलीचे नाव | इतिश्री मुर्मू |
| नेट वर्थ | 9.5 लाख |
द्रौपदी मुर्मू याचे सुरवाचे जीवन
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावातील एका आदिवासी कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांचे नाव बिरंचि नारायण टुडु होते. विशेष म्हणजे त्याचे वडील आणि आजोबा हे त्याच्या गावाचे प्रमुख होते. आजोबा आणि वडील हे गावाचे प्रमुख असल्या कारणाने लहानपणापासून त्यांच्या वरती राजकारणाचे संस्कार झाले असावेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
द्रौपदी मुर्मू यांचे शिक्षण
द्रौपदी मुर्मू याचे सुरवातीपासूनच शिक्षणाकडे जास्त ओढी होती. त्याच्या गावापासून काही अंतरावरती एक सरकारी शाळा आहे जिथे त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. अतिशय कठीण परिस्थिती मध्ये त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्या नंतर माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी कोठे जावे हा त्याच्या समोर एक मोठा प्रश्न होता. कारण त्याच्या गावाजवळ शिक्षणाचे कोणतेही मार्ग उपलब्ध नव्हते. शेवटी माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी त्यांना भुवनेश्वर येथे जावे लागले. तेथेच भुवनेश्वर गर्ल्स हायस्कूल मध्ये त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्या नंतर उच्च शिकण्यासाठी द्रौपदी मुर्मू यांनी रमादेवी वुमेन्स कॉलेज मध्ये एडमिशन घेतले. रमादेवी वुमेन्स कॉलेज आज रमादेवी विश्वविद्यालय झाले आहे.1975 ते 1979 या कालावधीत त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले.
उच्च शिक्षण पूर्ण केल्या नंतर द्रौपदी मुर्मू यांना ओडिसा गव्हरमेंट मध्ये वीज विभागात ज्युनियर असिस्टंट म्हणून नोकरी प्राप्त झाली.1979 ते 1983 पर्यंत त्यांनी ही नोकरी सांभाळली. त्यानंतर 1994 मध्ये त्यांनी रायरंगपूर येथील अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन सेंटरमध्ये शिक्षक म्हणून काम सुरू केले आणि 1997 पर्यंत त्यांनी हे काम केले.
द्रौपदी मुर्मु यांचा परिवार
द्रौपदी मुर्मू या एका आदिवासी घरात जन्मल्या असल्या तरी त्यांच्या घरातले सर्व सदस्य हे शिक्षित होते. त्याच्या वडील आणि आजोबा हे गावाचे प्रमुख असल्यामुळे त्याचा संबंध हा गावातील सर्व लोकांसोबत आला होता त्यामुळे राजकारणाचे आणि समाजकारणाचे धडे त्यांना थेथूनच मिळाले. पुढे द्रौपदी मुर्मू यांचा विवाह श्याम चरण मुर्मू याच्या जवळ झाला. श्याम चरण मुर्मू हे बँकेमध्ये कार्यरत होते. द्रौपदी मुर्मू यांना दोन मुले आणि एक मुलगी असे तीन मुले होती. पुढे दुर्भाग्यावश त्यांची दोनही मुलाचे मृत्यू झाले. त्याच्या मुलीचा विवाह झाला असून त्या भुवनेश्वर येथे राहतात.
द्रौपदी मुर्मूचे राजकीय कारकीर्द
द्रौपदी मुर्मू यांनी 1997 मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीमधून प्रथमच नगरसेवक निवडून जिंकून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आणि त्या भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्याही होत्या.
द्रौपदी मुर्मू भाजपच्या तिकिटावर ओडिसातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर मतदारसंघातून दोनदा आमदार झाल्या आहेत.
द्रौपदी मुर्मू यांना 2000 ते 2004 दरम्यान नवीन पटनायक यांचा पक्ष बिजू जनता दल आणि ओडिशातील भाजप युती सरकारमध्ये वाणिज्य, वाहतूक आणि नंतर मत्स्य आणि प्राणी संसाधन खात्यात मंत्री करण्यात आले.
द्रौपदी मुर्मू यांना मे 2015 मध्ये झारखंडचे राज्यपाल देखील बनवण्यात आले. झारखंड उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश वीरेंद्र सिंह यांनी द्रौपदी मुर्मू यांना राज्यपालपदाची शपथ दिली. द्रौपदी मुर्मू या झारखंड च्या पाहिल्या महिला राज्यपाल होत्या.
2022 मध्ये द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती झाल्या आहेत. द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय महिला आदिवासी राष्ट्रपती आहेत.
द्रौपदी मुर्मू यांना मिळालेले पुरस्कार
द्रौपदी मुर्मू यांना 2007 मध्ये सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून नीलकंठ पुरस्कार मिळाला आहे, हा पुरस्कार ओडिसा विधानसभेने प्रदान केला आहे.
द्रौपदी मुर्मू यांनी कशी केली डिप्रेशनवर मात?
द्रौपदी मुर्मू या राजकीय जीवनात भरपूर सफल झाल्या पण व्यक्तिगत जीवनात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. एक वेळ अशी सुद्धा आली होते की जेव्हा द्रौपदी मुर्मू या डिप्रेशन मध्ये गेल्या होत्या. ही गोष्ट 2009 सालातील आहे जेव्हा त्याच्या एक मुलाचा केवळ 25 वर्षातच असमय मृत्यू झाला. आपला मुलाच्या अकाली निधना नंतर द्रौपदी मुर्मू यांना एवढा सदमा लागला आणि त्या डिप्रेशन मध्ये गेल्या. यामधून बाहेर येण्यासाठी त्यांनी अध्यामाचा सहारा घेतला आणि ब्रह्मकुमारी या संस्थेशी त्या जोडल्या गेल्या.
हळूहळू त्या डिप्रेशन मधून बाहेर येत असतानाच 2013 मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचा एका रोड अपघातात मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यू नंतर काही काळातच त्याच्या आई आणि आणि भावाचा देखील निधन झाले. 2014 मध्ये द्रौपदी मुर्मू यांच्या पतीचा देखील मृत्यू झाला. पतीच्या मृत्यू नंतर त्यांना सामाजिक जीवनात परत येणे कठीण होते. परंतु त्यांनी हार न मानता डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी अध्यात्म आणि योग याचा सहारा घेतला. आणि ही लढाई त्यांनी जिंकून दाखविली. आणि या नंतर त्या झारखंड च्या पाहिल्या महिला राज्यपाल झाल्या.
द्रौपदी मुर्मू नेट वर्थ
द्रौपदी मुर्मू राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्या तरीही त्याच्याजवळ खूप सारी संपत्ती नाही आहे. काही रिपोर्ट्स नुसार द्रौपदी मुर्मू यांच्याजवळ केवळ 9.5 लाख रुपये इतकी संपत्ती आहे. त्यांच्यापाशी कोणत्याही प्रकारचे दागिने वा जमीन जायदाद नाही आहे.
FAQs
Q1. द्रौपदी मुर्मू कोण आहेत?
Ans: द्रौपदी मुर्मू भारताच्या 15 व्या राष्ट्रपती आहेत.
Q2. झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत?
Ans: द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत.
Q3. द्रौपदी मुर्मूच्या पतीचे नाव काय आहे?
Ans: द्रौपदी मुर्मूच्या पतीचे नाव श्याम चरण मुर्मू आहे.
Q4. द्रौपदी मुर्मू कोणत्या समाजाच्या आहेत?
Ans: द्रौपदी मुर्मू आदिवासी समाजाच्या आहेत.
