Dilip Kumar Biography in Marathi | दिलीप कुमार यांचा जिवन परिचय


Dilip Kumar Biography in Marathi | Dilip Kumar Information In Marathi | दिलीप कुमार यांचा जिवन परिचय | दिलीप कुमार यांचा जीवन प्रवास | बालपण, परिवार, पत्नी, शिक्षण, करियर, कमाई, मृत्यु


हिंदी सिनेमाच्या इतिहासामध्ये भरपूर कलाकार आले आणि निघून गेले पण एक कलाकार असे सुद्धा आले त्यांनी हिंदी चित्रपट श्रुष्टीचा इतिहास बदलून टाकला.त्यांच्या अदाकारीने अभिनयाची ची परिभाषाच बदलून गेली. त्या महान कलाकाराने हे सिद्ध केले कि सुपरस्टार सुद्धा कोणाला म्हटले जाऊ शकते. आजच्या लेखामध्ये आपण दिलीप कुमार यांचा जीवन परिचय Dilip kumar biography in Marathi पाहणार आहोत. 


Dilip Kumar Biography in Marathi | दिलीप कुमार यांचा जिवन परिचय

{tocify} $title={TABLE OF CONTENTS}


Dilip Kumar Biography in Marathi | दिलीप कुमार यांचा जिवन परिचय


नाव दिलीप कुमार
खरे नाव मुहम्मद युसुफ खान
जन्मतारीख 11 डिसेंबर 1922
मृत्यू दिनांक 7 जुलै 2021
वय 98 वर्षे
जन्म ठिकाण पेशावर
राशि धनु
होम टाऊन मुंबई
नागरिकत्व भारतीय
धर्म मुस्लिम
वैवाहिक स्थिती विवाहित



दिलीप कुमार यांचे बालपण परिवार (Dilip Kumar's childhood And Family) 


दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 मध्ये पेशावर येथे झाला, जे ब्रिटिश काळात भारतात आणि आता पाकिस्तानात आहे.दिलीप कुमार यांचे मूळ नाव मुहम्मद युसूफ खान होते.त्यांच्या वडिलांचे नाव लाला गुलाम सरवर खान आणि आणि आईचे नाव आयशा बेगम होते. त्यांना एकूण 11 भावंडे होती.  


दिलीप कुमार यांची भावंडे :- नासिर खान , एहसान खान, असलम खान, नूर मोहम्मद, अयुब सरबार, फौजिया खान, सकीना खान, ताज खान, फरीदा खान, सईदा खान, अख्तर आसिफ



दिलीप कुमार यांचे शिक्षण (Education of Dilip Kumar) 


दिलीप कुमार यांचे सुरवातीचे शिक्षण बार्न्स स्कूल, देवलाली येथे झाले कारण येथेच जवळ त्यांच्या वडिलांच्या फळांच्या बाग होत्या.राज कपूर हे दिलीप कुमार यांचे लहानपणीचे जिवलग मित्र होते. 



दिलीप कुमार यांचे सुरवातीचे जीवन (Early life of Dilip Kumar) 


1930 मध्ये दिलीप कुमार यांचा परिवार मुंबई मध्ये आला. 1940 मध्ये यांचा त्यांच्या वडिलांजवळ मतभेत झाले त्यामुळे ते एकटे मुंबई सोडून पुणे येथे आले. पुण्याला आल्यावरती त्यांची भेट एका कँटीन मालकाजवळ झाली. त्या कँटीन मालकाच्या मदतीने त्यांनी एका आर्मी क्लब मध्ये सँडविच स्टॉल लावला. दिलीप कुमार यांनी हे काम चालू केले तेव्हा त्यांनी कोणालाही सांगितले नाही कि ते एका श्रीमंत परिवारातून आहेत.कँटीन मध्ये काही काळ काम केल्यावरती ते पुन्हा मुंबईला आपल्या परिवाराजवळ आले आणि आपल्या वडिलांना कामामध्ये मदत करु लागले.आपले स्वतःचे एक स्वतंत्र अस्तित्व असावे असे त्यांना नेहमी वाटायचे त्यामुळे ते नेहमी कामाच्या शोधात असायचे. 



दिलीप कुमार यांचे करियर (Dilip Kumar's career) 


1943 मध्ये दिलीप कुमार यांची भेट डॉ. मसानी यांच्या जवळ झाली. त्यांनी दिलीप कुमार यांची बॉम्बे टॉकीज च्या मालकीण आणि त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री देविका राणी यांच्याशी भेट करून दिली. देविका राणी यांनी दिलीप कुमार यांची हिंदी आणि उर्दू भाषेवरील असलेली चांगली पकड पाहून त्यांना बॉम्बे टॉकीज मध्ये स्क्रिप्ट रायटर म्हणून कामाला ठेवले. त्यावेळी त्यांनी हि कामाची अग्रीमेंट 1250 प्रति वर्ष अशी केली होती. 


बॉम्बे टॉकीज मध्ये स्क्रिप्ट रायटर म्हणून काम करत असताना दिलीप कुमार यांची भेट महान अभिनेता अशोक कुमार यांच्याजवळ झाली.अशोक कुमार हे दिलीप कुमार यांच्या अभिनया वरती खुप प्रभावित होते. सण 1944 मध्ये दिलीप कुमार यांना त्यांच्या करियरची पहिली फिल्म ऑफर झाली. त्या फिल्मचे नाव होते ज्वार भाटा.या फिल्म मध्ये त्यांना मुख्य भूमिका साकारायची होती. याच फिल्म दरम्यान देविका राणी यांच्या सांगण्यावरून दिलीप कुमार यांनी आपले मूळ नाव युसूफ बदलून दिलीप ठेवले. परंतु दिलीप कुमार यांची पहिली फिल्म कि फ्लॉप ठरली.अशा प्रकारे दिलीप कुमार यांच्या फिल्म करियरला सुरवात झाली. 


आपली पहिली फिल्म फ्लॉप गेली म्हणून दिलीप कुमार निराश झाले नाहीत. त्यांनी फिल्म जुगनू मध्ये काम केले. हि त्यांची दुसरी फिल्म होती. त्यांची हि फिल्म लोकांना फार आवडली आणि या मुळे ते रातोरात स्टार बनले. या फिल्म मध्ये केलेल्या कामामुळे त्यांना अजून अनेक फिल्म च्या ऑफर्स येऊ लागल्या. 1949 मध्ये दिलीप जींना राज कपूर आणि नर्गिससोबत अंदाज चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, जो त्या काळातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.त्यामुळे दिलीप कुमार हे लोकांचे हिरो बनले. 


1950 हे वर्ष तर दिलीप कुमार यांचे सुवर्ण वर्ष मानले जाते कारण याच काळात दिलीप कुमार यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. दाग, दीदार , जोगन या फिल्म मधील त्यांच्या कामामुळे त्यांची ओळख ट्रेजडी किंग म्हणून होऊ लागली. भारतामध्ये 1956 साली फिल्मफेर अवॉर्ड ची सुरवात झाली होती.आणि पहिला फिल्मफेर अवॉर्ड दिलीप कुमार यांनाच मिळाला होता. दाग या चित्रपटासाठी त्यांना पहिला फिल्मफेर बेस्ट अक्टर अवॉर्ड मिळाला. 


 ट्रेजडी बरोबरच त्यांनी कॉमेडी चित्रपट सुद्धा केली जे लोकांना फार आवडले होते.या वरून दिलीप कुमार यांची अभिनयावरील असणारी पकड आपण पाहू शकतो. ते कोणताही रोल मधील भूमिका अगदी सहजपणे करत असत.सण 1960 मध्ये पुन्हा कोहिनूर या फिल्म मधील त्यांच्या कामामुळे त्यांना फिल्मफेर अवॉर्ड मिळाला. 


एक वेळ दिलीप कुमार यांना हॉलिवूड मधून चित्रपट ऑफर झाला होता.चित्रपटाचे नाव होते लॉरेन्स ऑफ अरेबिया.आणि ह्याच फिल्म ला 1960 साली सर्वात जास्त ऑस्कर अवॉर्ड मिळाले होते. आणि दिलीप कुमार यांना ज्या भूमिकेसाठी विचारले गेले होते त्या भूमिकेला सुद्धा बेस्ट सपोर्टींग अक्टर चे नॉमिनेशन मिळाले होते.


50 च्या दशकातील दिलीप कुमार हे असे अभिनेते होते जे सर्वात जास्त फी घेत होते. असे म्हटले जाते कि ते जवळ जवळ 1 लाख रुपये फी घेत होते. जे आताच्या काळामध्ये तुलना करायचं झाल तर 50 लाख फी रुपये घेणाऱ्या रजनीकांत यांच्याजवळ होऊ शकते. 


जेव्हा ऑल इंडिया सुपरस्टार राजेश खन्ना यांची चित्रपट श्रुष्टीत पदार्पण झाले तेव्हा दिलीप कुमार यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले. त्यामुळे दिलीप कुमार यांनी 5 वर्ष कोणतेही काम केले नाही. जेव्हा 1981 साली पुन्हा पदार्पण केले तेव्हा त्यांनी पुन्हा आपली जादू लोकांवरती केली. पण या वेळेस ते कॅरेक्टर रोल करू लागले होते. क्रांती , शक्ती, मशाल, धर्माधिकारी, कानुन अपना अपना, सौदागर, किला हे चित्रपट आहेत ज्यामध्ये दिलीप कुमार यांनी कॅरेक्टर रोल केले.आणि आजही हे चित्रपट टीव्ही वरती लागले तर लोक आनंदानी पाहतात. 


1960 ची ऐतिहासिक फिल्म मुघले आझम दिलीप कुमार यांची सर्वाधिक कमाई करणारी फिल्म आहे.दिलीप कुमार यांनी एका इंडियन अक्टर च्या रूपात सर्वाधिक अवॉर्ड जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड बनविला आहे. 1967 मधील राम और श्याम या चित्रपटाने डबल रोल कॅरेक्टर चा इतिहास बदलून टाकला. 


दिलीप कुमार यांनी 1998 मध्ये किला हा शेवटचा चित्रपट केला त्यानंतर ते कोणत्याही चित्रपटात दिसले आणि त्यानंतर त्यांनी अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतली.



दिलीप कुमार यांचे लव्ह अफेअर्स (Dilip Kumar's Love Affairs) 


दिलीप कुमार यांच्या लव्ह अफेयर्स बद्दल आपण जाणून घेऊ या. 


कामिनी कौशल


सण 1948 मध्ये एका फिल्म सेट वरती दिलीप कुमार यांची भेट कामिनी कौशल यांच्याजवळ झाली.आणि पहिल्याच भेटत दिलीप कुमार कामिनी कौशिक यांच्या प्रेमात पडले. दिलीप कुमार कामिनी कौशिक यांच्या जवळ लग्न करणार होते, परंतु अडचण हि होती कि कामिनी कौशिक या विवाहीत होत्या. परंतु कामिनी कौशिक या लग्नाला तयार होत्या परंतु त्यांचे भाऊ हे सैन्यात अधिकारी होते आणि त्यांना हे लग्न मान्य नव्हते. असे म्हटले जाते कि कामिनी कौशिक यांच्या भावाने दिलीप कुमार यांना पिस्तूल दाखवून धमकी सुद्धा दिली होती. त्यामुळे दिलीप कुमार आणि कामिनी कौशिक यांची प्रेम कहाणी हि अर्धवटच राहिली. 


मधुबाला 


कामिनी कौशिक यांच्याशी ब्रेकअप नंतर दहा वर्षांनी दिलीप कुमार यांच्या जीवनात मधुबाला या प्रसिद्ध अभिनेत्री आल्या.दिलीप कुमार मधुबाला यांच्याजवळ लग्न करू इच्छित होते. परंतु दिलीप कुमार आणि मधुबाला यांचे वडील यांमध्ये मतभेद झाले. मधुबाला यांना दिलीप कुमार यांचा आपल्या वडिलांशी असे वागणे पटले नाही त्यामुळे मधुबाला यांनी दिलीप कुमार यांना आपल्या वडिलांची माफी मागायला सांगितले पण दिलीप कुमार यांना ते पटले नाही.हे भांडण असेच वाढत गेले त्यामुळे मधुबाला आणि दिलीप कुमार यांचा ब्रेकअप झाला. 


वैजंतीमाला


दिलीप कुमार यांच्या सुन्या झालेल्या जीवनात फिल्म जगतातील जानिमाणी अक्टरेस आणि डान्सर वैजंतीमाला पुन्हा एकदा बाहेर घेऊन आली. या दोघांनी सहा चित्रपटात सोबत काम केलं होत आणि यांच्या प्रेमाच्या चर्चा सुद्धा चांगल्याच रंगल्या होत्या.परंतु हि लव्ह स्टोरी सुद्धा फ्लॉप गेली. 


वहीदा रहमान


दिलीप कुमार यांच्या सोबत लागोपाठ तीन सुपरहिट चित्रपट देणारी वहीदा रहमान दिलीप कुमार यांच्या जीवनात आली. या वेळेस दिलीप कुमार नाही तर वहीदा रहमान दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. परंतु या दोघांचं प्रेम प्रकरण जास्त काळ टिकलं नाही आणि पुन्हा एकदा दिलीप कुमार यांचा ब्रेकअप झाला. 



दिलीप कुमार यांचे वैवाहिक जीवन (Married life of Dilip Kumar) 


अफेयर्स आणि ब्रेकअप च्या गुंतागुंतीत दिलीप कुमार 44 वर्षाचे झाले होते. सण 1966 मध्ये फिल्म जगतातील प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री सायरा बानू दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडली. एवढच नाही तर सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांच्याजवळ विवाह करण्याचा हट्ट पकडला. शेवटी सायरा बानू सोबत दिलीप कुमार विवाह करण्यास तयार झाले. आणि या दोघांनी लग्न केली. त्यावेळी सायरा बानू यांचे वय फक्त 22 वर्ष होते. 


परंतु सायरा बानू यांच्याशी विवाह झाल्या नंतर सुद्धा त्यांना संतती प्राप्ती होत नव्हती त्यामुळे दिलीप कुमार यांनी पाकिस्तानी आदाकारा आसामा रहमान यांच्याजवळ 1980 साली दुसरा विवाह केला.परंतु त्याच्याकडूनही संतती प्राप्ती झाली नाही त्यामुळे हे लग्न केवळ 2 वर्षच टिकले आणि दिलीप कुमार हे पुन्हा सायरा बानू यांच्याजवळ आले. आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते त्याच्याजवळच राहिले. 



दिलीप कुमार यांना मिळालेले अवॉर्ड्स (Dilip Kumar Awards and Achievements) 


  • 1991 मध्ये दिलीप कुमार यांना देशाचा तिसरा सर्वोच्च पुरस्कार पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले. 


  • 1993 मध्ये दिलीप कुमार यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


  • दिलीप कुमार यांच्याजवळ सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्ड आहेत. त्यांच्याजवळ आठ फिल्मफेअर अवॉर्ड आहेत.हा रेकॉर्ड अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खान यांना सुद्धा मोडता आलेला नाही आहे. 


  • 1994 मध्ये दिलीप कुमार यांना भारतीय चित्रपटातील सर्वोच्य पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सम्मान करण्यात आला. 


  • 1998 मध्ये, दिलीप कुमार यांना पाकिस्तान सरकारने पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार निशान-ए-पाकिस्तान देऊन सन्मानित केले.


  • 2014 मध्ये अभिनय क्षेत्रातील किशोर कुमार पुरस्कार दिलीप कुमार यांना मिळाला आहे. 


  • सर्वाधिक भारतीय फिल्म क्षेत्रातील अवॉर्ड दिलीप कुमार यांच्याकडे असल्याने त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये नोंदविले गेली आहे. 



दिलीप कुमार यांची संपत्ती (Property of Dilip Kumar) 


दिलीप कुमार हे एका चांगल्या श्रीमंत परिवारातून आले होते. त्यांच्या वडिलांचा स्वतःचा फळ विक्रीचा व्यवसाय होता तसेच त्यांचे स्वतःची फळबागा सुद्धा असायाच्या.परंतु स्वतःच्या पायावरती उभे राहून स्व हिमतीवर काही तरी करावे यासाठी ते घरातून बाहेर पडेल होते. चित्रपट श्रुष्टीत त्यांनी चांगले नाव कमावलेच त्याच बरोबर त्यांनी स्वतःच्या मेहनतीने संपत्ती सुद्धा मिळवली.आजच्या ताराखेतील दिलीप कुमार यांची संपत्ती जवळ जवळ 627 कोटी भारतीय रुपये इतकी आहे. 



दिलीप कुमार यांचा मृत्यु (निधन) (Death of Dilip Kumar) 


भारतीय फिल्म जगतातील तारा दिलीप कुमार यांचे निधन 7 जुलै 2021 रोजी झाले.ते 98 वर्षाचे होते. दिलीप कुमार हे बऱ्याच काळापासून आजारी असायचे त्यामुळे त्यांना अनेक वेळा हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागायचे. दिलीप कुमार यांच्या स्वास्थे बद्दल सांगितले जायचे कि त्यांना भरपूर वेळेपासून श्वसनाचा त्रास आहे. अचानक त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले.त्यांनी 7 जुलै 2021 रोजी सकाळी 7:30 वाजता शेवटचा स्वास घेतला. आणि या हुरहुन्नरी कलाकाराचा संघ्याकाळी 5 वाजता अंतिम संस्कार केला गेला. 


दिलीप कुमार आपल्यातून गेले असले तरी त्यांच्या कामातून लोकांच्या हृदयावरती उमटलेले ठसे कधीच मिटणार नाहीत. त्यांनी दिलेले चित्रपट जगातला योगदान हे मोजण्यापलीकडले आहे. अशा या कलाकारास मराठी लिरिक्स कडून मनाचा मुजरा. 


आशा आहे कि दिलीप कुमार यांचा जीवन परिचय आपणास नवीन काही तरी देऊन जाईल. या लेखातून आम्ही दिलीप कुमार यांचे आयुष्य 98 वर्षाचे आयुष्य आम्ही अगदी मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या मधून आपण नक्कीच काहीतरी चांगले घेऊन जाल अशी आशा आहे. 

                                  

                             धन्यवाद ! 



FAQ'S


प्रश्न : दिलीप कुमार यांचा जन्म कधी आणि कोठे झाला ? 

उत्तर : दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर १९२२ मध्ये पेशावर येथे झाला, जे ब्रिटिश काळात भारतात आणि आता पाकिस्तानात आहे.


प्रश्न : दिलीप कुमार यांचे वय किती होते ?

उत्तर : दिलीप कुमार हे 98 वर्षाचे होते.


प्रश्न : दिलीप कुमार यांची पत्नी कोण आहे ?

उत्तर : सायरा बानु, आसमा रहमान


प्रश्न : दिलीप कुमार यांचा धर्म कोणता आहे ?

उत्तर : मुस्लिम


प्रश्न : दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट कोणता ?

उत्तर : ज्वार भाटा


प्रश्न : दिलीप कुमार यांचे खरे नाव काय होते ?

उत्तर : मोहम्मद युसूफ खान


प्रश्न : दिलीप कुमार यांना किती मुले आहेत ? 

उत्तर : दिलीप कुमार यांना मुले नाही आहेत 


प्रश्न : दिलीप कुमार यांचे निधन कधी झाले ? 

उत्तर : 7 जुलै 2021




हे सुद्धा नक्की वाचा 


मीराबाई चानू यांचा जीवन परिचय 


नीरज चोप्रा यांचा जीवन परिचय 


फेसबुक चा शोध कोणी लावला 


स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे फायदे आणि तोटे

Please do not enter any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने