भारत हा क्रिकेट प्रेमींचा देश आहे. कारण येथे मोठ्या प्रमाणावर क्रिकेट खेळाला आणि पहिला जातो, त्यामूळे आपले अन्य खेळांकडे दुर्लक्ष होते आणि दुसरे काही खेळ आहेत हे सुद्धा आपण विसरून जातो. आणि त्या खेळांमध्ये सुद्धा विशेष प्राविण्य मिळविणारे खेळाडू असतात आणि आपण त्यांना जो मान जी प्रसिद्धी दिली पाहिजे ती देत नाही.
आज आपण अशाच एका खेळाबद्दल आणि त्या खेळात विशेष प्राविण्य मिळवून आपल्या भारत देशाचे नाव मोठे केलेल्या खेळाडू बद्दल जाणून घेणार आहोत (मीराबाई चानू यांचा जीवन परिचय | Mirabai Chanu Biography In Marath.) त्या खेळाडूचे नाव आहे मीराबाई चानू.
{tocify} $title={Table of Contents}
आज आपण या लेखात मीराबाई चानू यांचा जीवन परिचय पाहणार आहोत.
मीराबाई चानू यांचा जीवन परिचय
| पूर्ण नाव | साइखोम मीराबाई चानू |
|---|---|
| जन्मदिनांक | 8 ऑगस्ट 1994 |
| जन्मस्थान | इंफाळ, मणिपूर (भारत) |
| वडिलांचे नाव | साइखोम कृति मितेई |
| आईचे नाव | साइखोम ओंगबी तोंबी लीमा |
| भावंडे | साईखोम संतोबा मिटेई (भाऊ) आणि साईखोम रंगिता शाय (एकूण 6 भावंडे आहेत) |
| उंची | 1.5 मीटर (4 फूट 11 इंच) |
| वजन | 48 किलो |
| खेळ | भारोत्तोलन (वेट लिफ्टिंग) |
| प्रशिक्षक | कुंजरानी देवी आणि विजय शर्मा |
| छंद | प्रवास करणे आणि संगीत |
| पदक | सुवर्ण (अनाहिम, गोल्ड कोस्ट) आणि रौप्य पदक (ग्लासगो) |
| पुरस्कार | पद्मश्री आणि राजीव गांधी खेलरत्न |
मीराबाई चानू यांचे बालपण
पुढे त्यांनी इंफाळ मध्ये जाऊन स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ट्रेनींग सेंटर जॉईन केल.आणि आर्चरी शिकायला चालू केले. कारण हा खेळ स्टाईलिश आणि कापडे घाण न करता खेळात येणारा खेळ होता. पण त्या ट्रेंनिंग सेंटर मध्ये आर्चरी शिकवायला कोच नसल्यामुळे त्यांनी हा खेळ सोडून दिला.
त्याच ट्रेंनिंग सेन्टर मध्ये त्यांनी वेट लिफ्टिंग मध्ये भारताचे नाव कमावणारी कुंजरानी देवी यांचे विडिओ पाहिले आणि वेट लिफ्टिंग मध्ये आपले करिअर करण्याचा निर्धार त्यांनी केला.
मीराबाई चानू यांचा परिवार
मीराबाई चानू ह्या एका मध्यमवर्गीय कुटूंबातील आहेत. त्यांच्या आईचे नाव साइखोम ओंगबी तोंबी लीमा आहे.त्या गृहिणी आहेत आणि दुकान सुद्धा चालवतात.तसेच त्यांचे वडील पिडबल्यूडी विभागात काम करतात त्यांचे नाव साइखोम कृति मितेई आहे. त्यांच्या भावाचे नाव साईखोम संतोबा मिटेई आहे आणि साईखोम रंगिता शाय या त्यांच्या बहीण आहेत त्यांना एकूण 6 भावंडे आहेत.
मीराबाई चानू यांचे करिअर
2017 मधील जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये अमेरिकेतील अनाहेम येथे आयोजित सुवर्णपदक जिंकणे ही त्याची सर्वात मोठी कामगिरी होती.
चानूने 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत 196 किलो, स्नॅचमध्ये 86 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 110 किलो वजन उचलून भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले. यासह त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 48 किलो गटातील विक्रमही मोडला.
चानूने 24 जुलै 2021 रोजी ऑलिम्पिकमध्ये 49 किलो वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी पहिले रौप्य पदक जिंकले. त्याने स्नॅचमध्ये 87 किलो, क्लीन अँड जर्कमध्ये 115 एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले.या अगोदर सुश्री कर्णम मल्लेश्वरी यांनी सण 2000 मध्ये वेट लिफ्टिंग मद्धे कांस्य पदक जिकंले होते.
सिडनी ऑलिम्पिक 2000 नंतर चानू वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी दुसरी भारतीय वेटलिफ्टर आणि भारताकडून रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय वेटलिफ्टर बनली आहे.
मीराबाई चानू यांना मिळालेले विविध पुरस्कार
2018 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले.
मीराबाई चानू यांना 2018 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.




